Wednesday, August 21, 2024

शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाईन अर्ज 31 ऑगस्टपर्यंत मागविले

 

शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाईन अर्ज 31 ऑगस्टपर्यंत मागविले

       अमरावती, दि. 20 (जिमाका): राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस) व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी नवीन व नुतनीकरण अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरणे सुरु झाले आहे. या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी NSP 2.0 पोर्टलवर शनिवार दि.31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी(योजना) निखील मानकर यांनी केले आहे.

             राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती(एन.एम.एम.एस) सन 2023-24  मध्ये परिक्षेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची (इयत्ता 9 वी) नवीन अर्ज आधारनुसार भरणे आवश्यक आहे. तसेच इयत्ता दहावी व बारावी मधील विद्यार्थ्यांनी नुतनीकरण अर्ज भरणे आवश्यक आहे. अमरावती जिल्ह्यामधील नवीन 309 विद्यार्थी तर नुतनीकरणमध्ये 680 विद्यार्थी पात्र आहेत. सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन NSP 2.0 पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. एन.एम. एम.एस व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीचे नवीन व नूतनीकरण अर्ज शाळास्तरावर दि. 15 सप्टेंबर 2024 तर जिल्हास्तरावर अर्ज पडताळणी दि. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण करावे. विहित मुदतीपूर्वी शाळास्तरावर नवीन व नुतनीकरण अर्जाची पडताळणी करणे आवश्यक आहे. डिफेक्ट केलेले अर्ज आवश्यक ती दुरुस्ती करुन मुदतीपुर्वी ऑनलाईन भरुन पडताळणी पुर्ण करावी. विहित कालावधीमध्ये नवीन व नुतनीकरणचे अर्ज ऑनलाईन NSP 2.0 पोर्टलवर भरणे व पडताळणी करणे तसेच पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास संबंधितावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी यांनी दिली.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...