अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन
अमरावती, दि. 09 (जिमाका): पोलिस ठाणे
सिटी कोतवाली अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाला दर्यापूर येथून उपचाराकरीता
इर्विन येथे दाखल केले होते. या इसमाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. मृतकाचे अंदाजे वय 55 ते 60 वर्षे असून मृतकाचा उंची 5 फुट 7 इंच, अंगात पांढरा मळकट शर्ट, निळा
जीन्स पॅन्ट घातलेला होता.
मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी
इसमाची ओळख पटविण्यास पोलीस नियंत्रण कक्ष, अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक -
0721-2672001 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अमरावती
यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment