शहरात कलम 37 (1)
व (3) लागू
अमरावती, दि. 16 (जिमाका) : शहरात शांतता
व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त
(अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक
आदेश जारी केला आहे.
सदर
प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या
परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून दि.
19 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील.
या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त
(अमरावती शहर) नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment