कावड
यात्रा उत्सवाच्या दिवशी दर्यापूर ते मुर्तिजापूर वाहतूक मार्गात बदल
अमरावती,
दि.29 (जिमाका) : श्रावणातील शेवटच्या सोमवारी अमरावती जिल्हयातील दर्यापूर शहरात मोठ्या
प्रमाणावर कावड यात्रा उत्सव साजरा होतो. कायदा व सुव्यवस्थाच्या अनुषंगाने दर्यापूर
ते मुर्तिजापूर मार्गावर वाहतुकीत बदल करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी सौरभ कटियार
यांनी जारी केला आहे.
दर्यापूर ते मुर्तिजापूर या रोडवर
कावड यात्रा मंडळ व शिवभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. सदर रोडचे रुंदीकरण झाल्याने
रोडवर वाहतुक वेगाने सुरू राहते. या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणेकरिता तसेच
कावड यात्रा मिरवणूक शांततेत पार पडावी या करीता दर्यापूर ते मुर्तिजापूर मुख्य मार्ग
रविवार दि. 1 सप्टेंबर 2024 चे रात्री 10 वाजेपासून ते 2 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी
दोन वाजेपर्यंत दर्यापूर-आमला-आसरा फाटा-बोटा-हिरापूर ते मुर्तिजापूर मार्गे (फक्त
एस.टी. बस वाहतुक वगळून) वळविण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहे. या आदेशाचे
उल्लंघन करणाऱ्यावर मोटार वाहन कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कारवाई करण्यात
येईल.
0000
No comments:
Post a Comment