Monday, August 5, 2024

जिल्ह्यातील 12 तालुक्यात 80 नवीन रास्त भाव दुकान; संस्थांनी अर्ज करण्याचे पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन

 

जिल्ह्यातील 12 तालुक्यात 80 नवीन रास्त भाव दुकान; संस्थांनी अर्ज करण्याचे पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन

         अमरावती, दि. 5 (जिमाका) : अमरावती जिल्ह्यातील 12  तालुक्यातील 80  गावांमध्ये नवीन रास्त भाव दुकाने सुरू करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. नवीन रास्त भाव दुकानांसाठी इच्छुक संस्था व गटांनी 16 ऑगस्टपूर्वी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी केले आहे.

            नवीन दुकानांची क्षेत्रे - अमरावती ग्रामीण तालुक्यातील नांदुरा लष्करपूर, कराळे मोगरा, कुऱ्हाड, नांदुरा बु., लोनटेक.  भातकुली तालुक्यातील बोकुरखेडा, काकरखेडा, उदापूर, मक्रमपूर, देगूरखेडा, अडवी, कृष्णापूर, मक्रंदाबाद, कोलटेक, पोहरा, पुर्णा, सरमपूर, इब्राहिमपूर, उमरापूर. तिवसा तालुक्यातील घोटा, आलवाडा, जहांगीरपूर. चांदुर बाजार तालुक्यातील अब्दलपूर, मौजखेडा, पिंपरी तळेगाव, पांढरी, हिरापूर, वारोळी, खरवाडी. अचलपूर तालुक्यातील मेघनाथपूर, खानापूर. दर्यापूर तालुक्यातील शहापूर, नांदुरा, चांदूर जाहनपूर, चंद्रपूर. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सर्फाबाद, औरंगपूर. वरूड तालुक्यातील जामगाव (महेंद्री), पिंपलागड, वरूड. चांदुर रेल्वे तालुक्यातील चांदुर खेडा, कोदोरी हरक, चांदुर वाडी. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जसापूर, बोरगाव, पिंप्री पोच्छा, निंभोरा लाहे, भगुरा. चिखलदरा तालुक्यातील कुही, भुत्रुम, भिंरोजा, केशरपूर, भांडुम, ढाकणा, खिरपाणी, पांढराखडक, खटकाली ख., सोमठाणा खुर्द, सलिता, सुमिता, डोमी, चिलाटी, माडीझडप, लाखेवाडा, लवादा, टेटू, लवादा वन, मोझरी, बागलिंगा, रामटेक, कुलंगना बु, मांजरकापडी, चौऱ्यामल, खुटीया, मेमना. मोर्शी तालुक्यातील सिंभोरा, अंबाडा, शिरूळ, कोळविहीर, निंभार्णी, हाशमपूर  या 80 गावांमध्ये रास्तभाव दुकानांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

            निवडीचा प्राथम्यक्रम - नवीन रास्तभाव दुकानांसाठी संस्थेची निवड करताना ग्रामपंचायत किंवा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा न्यास यांना अर्ज करता येईल. याच प्राथम्यक्रमानुसार रास्तभाव दुकान परवाने मंजूर केलेल्या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदयाव्दारे करणे आवश्यक राहिल.

            अर्जाची प्रक्रिया - इच्छुक संस्था, गटांना विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तहसिल  कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी  11 ते सायंकाळी  6 वाजेदरम्यान प्राप्त होऊन दाखल करता येतील. अर्जाची विक्री व स्वीकृत करण्याची मुदत  दि. 16 ऑगस्टपर्यंत राहील. त्यानंतर प्राप्त अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. रास्त भाव दुकानाचा परवाना मंजूर करण्याची कार्यवाही जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल. रास्त भाव दुकानाचे अर्ज 100 रूपये चलानाव्दारे लेखाशीर्ष 4408 व्दारे भरणा करून संबंधित तहसिल कार्यालयामधून प्राप्त करून घेता येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...