बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तु संचाचे वितरण सुरु;
वाटपाच्या ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 23 (जिमाका): महाराष्ट्र इमारत
व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबईमार्फत जिल्ह्यातील नोंदणीकृती सक्रिय(जिवीत)
बांधकाम कामगारांना मे. मफतलाल इंडस्ट्रीज मुंबई कंपनीमार्फत गृहपयोगी वस्तु संच वितरण
करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंडळामध्ये दि. 1 ऑगस्ट 2023 ते 31 जुलै 2024 कालावधीत
नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना संच मिळणार असून त्याचे वितरण होणार आहे. त्यामुळे
बांधकाम कामगारांनी वाटपाच्या ठिकाणी गर्दी करु नये, असे आवाहन जिल्हा कार्यकारी अधिकारी
तथा सहायक कामगार आयुक्त यांनी केले आहे.
जिल्ह्यातील नोंदणीकृती जिवित पात्र बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तु संच
वाटप नोंदीत जिवित पात्र बांधकाम कामगारांच्या कुटुंबातील एकाच व्यक्तीला देण्यात येणार
आहे. सदर बांधकाम कामगारांना व्यवस्थापक मे. मफतलाल इंडस्ट्रीज मुंबई यांचे भ्रमणध्वनी
क्रमांक 7249442793, 7558627997, 75559438338, 8390221431, 8055841147,
8408082235 वरून संपर्क साधून नियोजित ठिकाणी ज्या दिनांकास बोलविण्यात येईल, त्यादिवशी
सदर ठिकाणी सकाळी 10 वाजता स्वत: बांधकाम कामगाराने संबंधित मुळ कागदपत्रासह उपस्थित
राहुन सर्व प्रथम बायोमॅट्रीक करून घ्यावे. तद्नंतर गृहपयोगी वस्तु संच प्राप्त करून
घ्यावे. दुरध्वनी क्रमांकावरून संपर्क करण्यात येईल, अश्याच कामगारांची गृहपयोगी वस्तु
संच वाटप ठिकाणी उपस्थित राहावे. कायदा व सुव्यवस्था
अबाधित राहील याची दक्षता घ्यावी. सदर मंडळाची योजना ही निशुल्क असून त्रयस्त व्यक्तिव्दारे आपली दिशाभूल
व फसवणूक करण्यात येत असेल तर नजिकच्या पोलीस स्टेशन मध्ये रितसर तक्रार दाखल करावी.
000000
No comments:
Post a Comment