आधार
कार्डबाबत येणाऱ्या अडचणीचे आधार केंद्रावरच होणार निराकरण
अमरावती, दि. 20 (जिमाका): शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी आधार
कार्ड असणे आवश्यक आहे. आधार कार्ड काढताना किंवा त्या बाबत येणाऱ्या अडचणीसाठी जिल्हाधिकारी
कार्यालयात येथे पाठविण्यात येते. त्यामुळे नागरिकांचा रोजगार बुडतो व त्यांना आर्थिक,
मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आधारबाबतच्या अडचणीचे संबंधित आधार केंद्रावरील
आधार ऑपरेटर यांच्या स्तरावर तक्रारीचे निराकरण करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तरी
नागरिकांनी अतिमहत्त्वाच्या तक्रारीसाठीच जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपर्क करावे,
असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.
नागरिकांना आधार बाबतच्या येणाऱ्या छोट्या
छोट्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आधार संबंधित जिल्हा व्यवस्थापक,
सीएससी, जिल्हा महिला व बाल विकास, शिक्षण
व क्रीडा, राष्ट्रीयकृत बँक, इंडियन पोस्ट बॅक, बीएसएनएल यांना निर्देश दिलेले
आहे. तरी नागरिकांनी आधार केंद्रावरच आपल्या अडचणीचे निराकरण करावे, असे आवाहन करण्यात
आले आहे.
000000
No comments:
Post a Comment