Friday, August 9, 2024

मेळघाट हाट येथे 15 ऑगष्टपर्यंत खादी महोत्सव

 

 

मेळघाट हाट येथे 15 ऑगष्टपर्यंत खादी महोत्सव

अमरावती, दि. 09 (जिमाका):  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर दि.10 ते 15 ऑगष्टपर्यंत मेळघाट हाट, सायन्सकोर मैदान येथे खादी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या विकेंद्रीत सोलर चरखा समुह कार्यक्रमातंर्गत उत्पादीत विविध दर्जेदार खादी उत्पादने तसेच महाबळेश्वर येथील मधुबन मध आणि मेळघाटातील महिला बचत गटांनी उत्पादीत केलेली विविध दर्जेदार उत्पादने या महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. खादी महोत्सव 15 ऑगष्टपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 8 पर्यंत सुरु राहणार असून या महोत्सवाला अमरावतीकरांनी मोठ्या संख्यांनी भेट द्यावी, असे  आवाहान खादी व ग्रामोद्योग मंडळ व महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...