इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत 20 ते 29 ऑगस्ट
दरम्यान तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन; लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा
अमरावती, दि. 12 (जिमाका): इतर मागास बहुजन
कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजनीची माहिती
लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दि. 20 ते 29 ऑगस्ट 2024 या कालावधीत तालुकास्तरीय
मेळावा आयोजित करण्यात आले आहे. नियोजित मेळाव्यास नागरीकांनी नोंदणी करुन शासनाच्या
योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक माया केदार यांनी
केले आहे.
नियोजित मेळावे याप्रमाणे : मंगळवार दि.
20 ऑगस्ट 2024 रोजी मोर्शी व वरूड तालुक्याचा मेळावा पंचायत समिती सभागृह मोर्शी येथे,
बुधवार दि. 21 ऑगस्ट 2024 रोजी दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्याचा मेळावा पंचायत
समिती सभागृह दर्यापूर येथे, गुरुवार दि. 22 ऑगस्ट 2024 रोजी चांदुर रेल्वे व धामणगाव
तालुक्याचा मेळावा पंचायत समिती सभागृह चांदुर रेल्वे येथे, शुकवार दि. 23 ऑगस्ट
2024 रोजी अचलपूर व चांदुर बाजार तालुक्याचा मेळावा पंचायत समिती सभागृह अचलपूर येथे,
सोमवार दि. 26 ऑगस्ट 2024 रोजी चिखलदरा व धारणी तालुक्याचा मेळावा पंचायत समिती सभागृह
चिखलदरा येथे, मंगळवार दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी तिवसा तालुक्याचा मेळावा पंचायत समिती
सभागृह तिवसा येथे, बुधवार दि. 28 ऑगस्ट 2024 रोजी नांदगाव खंडेश्वर तालुक्याचा मेळावा
पंचायत समिती सभागृह नांदगाव खंडश्वर येथे तर अमरावती व भातकुली तालुक्याचा मेळावा
गुरुवार दि. 29 ऑगस्ट 2024 रोजी पंचायत समिती सभागृह अमरावती येथे होईल.
00000
No comments:
Post a Comment