इतर
मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी
नांदगाव खंडेश्वर व तिवसा येथे मेळावा; लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अमरावती, दि. 30 (जिमाका): इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत मागास बहुजनासाठी
शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी
यासाठी नांदगाव खंडेश्वर व तिवसा तालुकात मेळाव्याचे
आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
असून योजनेची सविस्तर माहिती मेळाव्याच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात
आली.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांची
माहिती सर्व विद्यार्थी, लाभार्थी, पालकांपर्यंत तसेच सर्व शाळा प्रमुखांपर्यत पोहोचविण्यासाठी
नांदगांव खंडेश्वर तालुक्यातील विनायक विज्ञान विद्यालय येथे तर तिवसा तालुक्यात यादव
देशमुख कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी योजनेची माहिती तसेच योजनेचा लाभ घेण्याकरीता आवश्यक पात्रता, अर्ज कुठे व कसे
करायचा याची सविस्तर माहिती विद्यार्थी व पालकांना
देण्यात आली. तसेच योजनेच्या अनुषंगाने मान्यवरांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले.
000000
No comments:
Post a Comment