उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
यांचा 4 ऑगस्ट रोजी अमरावती दौरा
अमरावती, दि. 3 (जिमाका) : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय
कार्ये मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा उद्या, रविवार, (दि. 4 ऑगस्ट 2024) रोजीचा अमरावती दौरा पुढीलप्रमाणे:
रविवार, दि. 4 ऑगस्ट रोजी सकाळी 8.55 वाजता नागपूर
विमानतळ येथून वाहनाने अमरावतीकडे प्रयाण.
सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे आगमन व राखीव. दुपारी 12.45
वाजता शासकीय विश्रामगृह येथून वाहनाने नियोजन भवनाकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता नियोजन भवन सभागृह पहिला माळा, नियोजन भवन
जिल्हाधिकारी कार्यालय, येथे आगमन व अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस
उपस्थिती. दुपारी 3 वाजता नियोजन भवन सभागृह पहिला माळा, नियोजन भवन जिल्हाधिकारी
कार्यालय, येथे ग्राम रिध्दपूर येथील
पोलीस चौकीच्या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता महसूल भवन
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे आगमन व शासनाच्या महत्तवकांक्षी योजनांच्या
अंमलबजावणी संदर्भात विविध प्रशासकीय प्रामुख्याची आढावा बैठकीस उपस्थिती. सोयीनुसार
शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे आगमन व राखीव. संध्याकाळी 6.30 वाजता शासकीय
विश्रामगृह येथून वाहनाने अमरावती रेल्वेस्थानकाकडे प्रयाण. संध्याकाळी 6.45 वाजता
अमरावती रेल्वेस्थानक येथे आगमन व राखीव. संध्याकाळी 7.10 वाजता अमरावती
रेल्वेस्थानक येथून अमरावती एक्सप्रेसने ट्रेन क्र. 12112 जळगावकडे प्रयाण.
0000
No comments:
Post a Comment