Tuesday, August 6, 2024

अमरावती विधानसभा मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द: 20 ऑगस्टपर्यंत आक्षेप नोंदवावा

 

अमरावती विधानसभा मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द: 20 ऑगस्टपर्यंत आक्षेप नोंदवावा

        अमरावती, दि. 06 (जिमाका): आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुक - 2024 च्या अनुषंगाने दि. 1 जुलै 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित प्रारुप मतदार यादी आज दि. 06 ऑगस्ट रोजी  038- अमरावती विधानसभा मतदारसंघातील सर्व 322 मतदान केंद्र तसेच अमरावती महानगरपालिका, तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या मतदार यादीबाबत काही आक्षेप असल्यास दि. 20 ऑगस्ट 2024 पर्यंत नोंदवावा, असे आवाहन अमरावती विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.

 

           सदरची प्रारुप मतदार यादी शासकीय कामाकाजाचे वेळेत 038- अमरावती विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी, अमरावती यांचे कार्यालयात अवलोकनाकरीता उपलब्ध करण्यात आलेली आहे. सर्व संबंधित मतदारांनी या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या नावाबाबत किंवा कोणत्याही तपशिलाबाबत काही आक्षेप असल्यास दि. 20 ऑगस्ट, 2024 रोजी किंवा त्यापुर्वी मतदार नोंदणी अधिकारी, 038- अमरावती विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी, अमरावती यांचे कार्यालयास आक्षेप दाखल करता येतील. तसेच जर आपले नाव मतदार यादीमध्ये नसेल तर नाव समाविष्ट करण्याकरीता नमुना 6 तसेच नाव किंवा इतर तपशिलात दुरूस्ती करावयाची असल्यास नमुना-8 भरून व नाव वगळायचे असल्यास नमुना- 7 भरुन मतदार नोंदणी अंधिकारी, 038 - अमरावती विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी, अमरावती यांचे कार्यालयास दि. 20 ऑगस्ट, 2024 रोजी किंवा त्यापुर्वी सादर करावे.

 

           अमरावती विधानसभा मतदारसंघाची दि. 01 जुलै, 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारीत कार्यक्रमानुसार सर्व मतदान केंद्रावर शनिवार दि. 10 ऑगस्ट, 2024, रविवार दि. 11 ऑगस्ट, 2024, शनिवार दि. 17 ऑगस्ट व रविवार दि. 18 ऑगस्ट, 2024  रोजी विशेष मतदार नोंदणी शिबीर राबविण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित मतदान केंद्रावर उपस्थित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बिएलओ) यांचेकडे नविन मतदार नोंदणी, तपशिलात दुरुस्ती अथवा नाव वगळणी करता येईल.

 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...