निवृत्तीवेतन धारकांसाठी "पेन्शन समाधान उपक्रम"
अंतर्गत 30 ऑगस्ट रोजी पेन्शन अदालत
अमरावती दि. 23 (जिमाका) : जिल्ह्यातील
सर्व राज्यशासकीय निवृत्तीवेतनधारक, कुटूंब निवृत्तीवेतनधारक यांच्या अडचणींचे निराकरण
करण्यासाठी तसेच अद्यावत प्रणालीबाबत माहिती देण्याकरीता "पेन्शन समाधान उपक्रम"
अंतर्गत पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पेन्शन अदालत शुक्रवार दि. 30 ऑगस्ट
रोजी दुपारी अडीच वाजता बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे होणार असून त्यांचा लाभ निवृत्तवेतन धारकांनी घ्यावा,
असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाचे कोषागार अधिकारी निवृत्तीवेतन अमोल ईखे यांनी
केले आहे.
महालेखापाल
कार्यालय नागपूर व जिल्हा कोषागार कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने पेन्शन
अदालतीचे आयोजन करण्यात आले असून अदालतीमध्ये अमरावती कोषागारामधुन निवृत्त स्विकारलेल्या
निवृत्तीवेतनधारकांचे अडचणीचे निराकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे कुटुंबनिवृत्ती
धारकांच्या अडचणी असल्यास निवेदन पूराव्यासह
सादर करावे, असे कोषागार अधिकारी यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment