Wednesday, August 14, 2024

स्वातंत्र दिनी (दि.15) वाहतूक व्यवस्थेत बदल; नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन

 

स्वातंत्र दिनी (दि.15) वाहतूक व्यवस्थेत बदल;

नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन

 

      अमरावती, दि. 14 (जिमाका): शहरात गुरूवार, दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र दिनाच्या 77 वा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र दिनानिमित्त शाळेतील लहान मुले, पालक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या वाहनांची रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशावेळी वाहतुकीची कोंडी होवून अपघातासारखा अनुचित प्रकार घडू नये तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

 

 विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अमरावती शहरातील सर्व हलक्या व जड वाहनांची वाहतुक  नियंत्रित करण्यासाठी मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 33 (1)(ब) तसेच मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये मंगळवार, दि. 15 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत शहरातील सर्व प्रकारचे मालवाहू हलकी व जड वाहने यांना शहरात सर्व बाजूने प्रवेश बंदीचे आदेश पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी निर्गमित केले आहे.  तसेच शहरातील गाडगेनगर समाधीपासून ते जिल्हा स्टेडियम येथील उड्डानपुल, इर्विन चौक ते राजापेठ पोलीस स्टेशन तसेच कुथे हॉस्पिटल ते नंदा मार्केट आणि कुशल ऑटोकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावरुन गुरूवार, दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपावतो आवागमन करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदीचे आदेश पारित करण्यात आले आहे.

 

         या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द मोटार वाहन कायदा 1988 व मुंबई पोलीस कायदा 1951 नुसार कार्यवाही करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त (मुख्यालय) कल्पना बारवकर यांनी कळविले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...