Thursday, August 20, 2026

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे महाराष्ट्रवासीयांना महत्त्वाचे आवाहन !

 


राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे महाराष्ट्रवासीयांना महत्त्वाचे आवाहन !

आपला महाराष्ट्र जलसमृद्ध आणि हिरवागार असावा, हे आपले सर्वांचे स्वप्न आहे. हेच स्वप्न साकारण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त, म्हणजेच 21 ऑगस्ट रोजी राज्यभर 'जलसंधारण दिन' साजरा केला जात आहे. या निमित्ताने सकाळी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये 'महा वॉकेथॉन फॉर वॉटर' या ऐतिहासिक मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या जनजागरणात प्रत्येक नागरिकाने आणि विशेषतः तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री महोदयांनी केले आहे. याच मोहिमेअंतर्गत जलसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या राज्यव्यापी 'मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धे'त सहभागी होऊन तुम्हीही या जनजागृतीचा एक महत्त्वाचा भाग होऊ शकता.

चला तर मग, सर्वजण एकत्र येऊया आणि 'जलदूत' बनून पाण्यासाठी चालूया. 'पाणी अडवा, पाणी जिरवा' या मूलमंत्राला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अधिकृत QR कोड स्कॅन करून या मोहिमेत नक्की सहभागी व्हा.

#SaveSoilSave Water #Maharashtra

#ReelChallenge2026 #MahaWalkathon2026

#SecureTomorrow

No comments:

Post a Comment

अभिनेता पृथ्विक प्रताप यांचे सर्वांना महत्त्वाचे आवाहन!

  अभिनेता पृथ्विक प्रताप यांचे सर्वांना महत्त्वाचे आवाहन! बदल हवा असेल तर बदलाची सुरुवात नेहमी स्वतःपासून करावी लागते, याच विचाराने आपल्या...