मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धा
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील १५ ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांसाठी जिल्हास्तरीय रील्स स्पर्धा.
थीमः Save Soil, Save Water, Secure Tomorrow
विषयः माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे, पारंपरिक मृद व जलसंधारण पद्धती, माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना, आजचे संवर्धन - उद्याचे सुरक्षित भविष्य.
यातील कोणत्याही एका विषयावर रील करू शकता !
रील अपलोड कालावधीः १५ ते १९ ऑगस्ट रीलची वेळः ३० ते ६० सेकंद रीलच्या सुरुवातीला रीलचा उद्देश, तुमचे नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक. रील स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी. #SaveSoilSave Water हा हॅशटॅग वापरणे आणि विभागाच्या अधिकृत अकाउंट mahawalkathon2026 Tag करणे आवश्यक.
रील पोस्ट केल्यानंतर अधिकृत QR Code स्कॅन करून Registration Form भरावा आणि रीलची लिंक Submit करावी.
प्रत्येक जिल्ह्यातील बक्षिसे
प्रथम विजेताः २५,००० रुपये
द्वितीय विजेताः १५,००० रुपये
तृतीय विजेताः १०,००० रुपये
३६ जिल्ह्यातील युवकांच्या कल्पनेसाठी मोठं व्यासपीठ.
बक्षीस वितरणः २१ ऑगस्ट
तुमची रील बनवा, माती आणि पाणी संवर्धनाचा संदेश द्या आणि महाराष्ट्राच्या जलसंधारण चळवळीत सहभागी व्हा.
#SaveSoilSaveWater
#Maharashtra
#ReelChallenge2026
#MahaWalkathon2026












No comments:
Post a Comment