"पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात" 347 उमेदवारांची प्राथमिक निवड
अमरावती, दि. 20 (जिमाका) : स्वामी विवेकानंद विद्यार्थी भवन अमरावती विद्यापीठ परिसर येथे 18 ऑगस्ट रोजी आयोजित 'पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध कंपन्या व बँकांनी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे एकूण 347 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती विद्यार्थी विकास विभाग,कौशल्य विकास विभागीय आयुक्तालय अमरावती आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून 721 उमेदवारांनी नोंदणी केली. यातील 562 उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती दिल्या. आदित्य अनधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., अभिनंदन को-ऑपरेटिव्ह बँक लि., जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक लि., महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स प्रा. लि., क्रेडिट एक्सेस ग्रामीण लि. आणि श्रीराम फायनान्स लि. या सहा कंपनी व बँकांच्या प्रतिनिधींनी या रोजगार मेळाव्यात सहभागी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेवून विविध पदांसाठी 347 उमेदवरांची प्राथमिक निवड केली आहे.
विभागीय रोजगार मेळावा समन्वयक समितेचे अध्यक्ष किरण पातुरकर यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन झाले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.महेंद्र ढोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कृषी विभागाचे सहसंचालक गणेश घोरपडे, जिल्हा स्तरीय रोजगार मेळावा समन्वय समितीचे अध्यक्ष भूषण काळमेघ आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब मोगले यांनी केले तर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी आभार मानले.
00000
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर
अमरावती, दि.20 (जिमाका) : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारीत कार्यक्रमानुसार 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मतदान केंद्रांची पुनर्रचना 24 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. 31 ऑगस्ट रोजी मतदार याद्यांची प्रारुप प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यानंतर 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहे. 31 ऑगस्ट ते 29 नोव्हेंबर पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली आहे.
22 ऑगस्ट रोजी परतवाडा येथे "पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा"
थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी
अमरावती, दि. 20 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडल करिअर सेंटर अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ऑगस्ट 2026 रोजी परतवाडा येथील कोर्ट रोड स्थित कल्याण मंडपम मध्ये 'पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या'चे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील जास्तीत-जास्त युवक-युवतींना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित या रोजगार मेळाव्यात वेगवेगळया पात्रतेसाठी महिंद्रा अँड महिंद्रा प्रा.ली.नागपूर, जाधव गियर्स ली.अमरावती,वैभव एन्टरप्राईजेस प्रा.लि.नागपूर,जाबील सर्किट इंडिया प्रा.लि. पुणे, नवभारत फर्टिलायझर प्रा.लि. नागपूर, बीव्हीजी पुणे, कोअर प्रोजेक्ट इंजिनियर अमरावती,धूत ट्रान्समिशन प्रा.लि., श्रीराम फायनान्स, ब्लिंकिट,कृपा कन्सल्टनसी पुणे, प्रिसिजन मॅपिंग सोल्युशन अमरावती यांच्याकडून थेट मुलाखती घेण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत गट विकास अधिकारी ,पंचायत समिती अचलपूर,नगरपरिषद अचलपूर,सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर,शासकीय तंत्रनिकेतन अचलपूर आदी कार्यालयांचे प्रतिनिधी प्रतिनिधी वेगवेगळ्या पात्रतेच्या पदाकरिता उपस्थित सुशिक्षित तरुणांची मुलाखत घेऊन निवड करणार आहेत. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरी व प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.
युवक युवतींसाठी रोजगाराची ही उत्तम संधी असून जास्तीत-जास्त उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यास आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे. उमेदवारांना कुठलाही प्रवास भत्ता दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी काही अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066/7620 560 125/8308956236 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे असे सांगण्यात आले आहे.
०००००
महिला शेतकरी गटांना अवजार बँकेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 20 (जिमाका) : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2.0 अंतर्गत गावस्तरावर ‘कृषी अवजारे बँक स्थापन करण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प गावांतील महिला शेतकरी गटांना 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांनी केले आहे आहे.
अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना कृषी अवजारांच्या उच्च किमतीमुळे उद्भवणाऱ्या समस्सेवर मात करण्यासाठी व यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून कृषी उर्जेचा वापर वाढविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमांतर्गत प्रकल्प गावातील महिला शेतकरी गटाना कृषी यांत्रिकीकरणासाठी कृषी औजारे बँकेद्वारे आवश्यक कृषी औजारे उपलब्ध करून देण्यात येतात. याचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र महिला शेतकरी गटांनाही अर्ज मागविण्यात आले आहेत.
प्रकल्प गावातील एमएसआरएलएस किंवा माविम पुरस्कृत महिला बचतगट व गाव संघ अर्ज करण्यास पात्र राहतील. अर्जदार गटात वेगवेगळया कुटुंबातील किमान 10 सदस्य असणे आवश्यक आहे. यापूर्वी कोणत्याही योजनेतून कृषी अवजारे बँकेचा लाभ घेतलेले गट अपात्र राहतील. एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास निवड प्रक्रिया ऑनलाइन लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे.
या योजनेद्वारे कृषी अवजारे बँकेसाठी प्रकल्प मूल्याच्या 60 टक्के अर्थात कमला 24 लाखांच्या अनुदानाची तरतूद आहे. प्रकल्प मूल्य 20 लाखांपेक्षा जास्त असल्यास राष्ट्रीयकृत बँकेकडून प्रकल्प मुल्याच्या 75 टक्के कर्ज घेणे बंधण कारक आहे. निवड झालेल्या गटांना गावस्तरावर कृषी अवजार बँक स्थापन करण्यासाठी औजारे व यंत्र निवडण्याची मुभा आहे. प्रकल्प क्षेत्रातील पात्र महिला गटांनी या योजनेच्या लाभासाठी dbtndksp.mahapocra.
००००००
आज ‘महा वॉकेथॉन’चे आयोजन ; नागरिकांना सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
सहभागासाठी ऑनलाइन नोंदणी
अमरावती, दि. 20 (जिमाका): जनसामान्यांपर्यंत जलसंधारणाचे महत्त्व पोहोचविण्यासाठी अमरावती शहरात आज 21 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता ‘महा वॉकेथॉन : ‘वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. क्युआर कोड व अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून नागरिकांना सहभागी होता येणार आहे. जलसंवर्धन, पाणी बचत आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश वॉकेथॉनद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय व मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने ‘एक पाऊल जलसंधारणासाठी, एक पाऊल शाश्वत भविष्यासाठी’हा संदेश सर्वदूर पोचविण्यासाठी शनिवारी सकाळी 6 वाजता या ‘महा वॉकेथॉन : ‘वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. या वॉकेथॉनला श्री.शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयापासून सुरुवात होणार आहे. पुढे गर्ल्स हायस्कुल चौक, जिल्हा कोषागार कार्यालय आणि सिंचन भवन असा मार्गे शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथेच वॉकेथॉनचा समारोप होणार आहे.
या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि जलसंवर्धन क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत जलसंधारणाच्या लोकचळवळीला बळ देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाईन नोंदणी
नागरिकांनी महा वॉकॅथॉन - वॉक फॉर वॉटरमध्ये सहभागी होण्यासाठी दिलेल्या क्युआर कोडद्वारे किंवा https://register.mahaevent.co.
0000000
राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात 'सद्भावना दिवस' प्रतिज्ञा
अमरावती, दि. 20 (जिमाका): भारताचे दिवंगत पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त जिल्ह्याधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘सद्भावना दिवस’ प्रतिज्ञा दिली.
जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची तसेच सर्व प्रकारचे मतभेद हे हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडविण्याची प्रतिज्ञा उपस्थितांना दिली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, अधिक्षक निलेश खटके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा आदि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)




.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment