जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावी
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी
अंमलबजावणीसाठी पाऊल
अमरावती, दि.६ : जिल्ह्यातील ज्या खाजगी कार्यालयांमध्ये १० किंवा १० पेक्षा अधिक महिला कर्मचारी असतील अशा आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावी तसेच सीबॉक्स पोर्टलवर त्याची नोंदणी करण्यात यावी असे आवाहन, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय गट यांनी केले आहे. ज्या शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी अशी समिती स्थापन केली नाही व पोर्टलवर नोंद केली नाही त्यांनी तातडीने हे कार्य पार पाडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
महिला व बाल विकास आयुक्तालयाने कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध ,मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ (पॉश कायदा) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या कायद्याच्या कलम -४ अन्वये ज्या खाजगी कार्यालयांमध्ये १० किंवा १० पेक्षा अधिक महिला कर्मचारी असतील अशा आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करून आस्थापनेतील अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी सीबॉक्स पोर्टलवर (https://shebox.wcd.gov.in ) करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार जिल्हयातील सर्व खाजगी आस्थापनांनी अशा समिती स्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पॉश कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शासकीय,निमशासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे व त्याची नोंद सीबॉक्स पोर्टलवर करणे बंधनकारक असून सीबॉक्स पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. ज्या आस्थापनांनी अद्यापपर्यंत ही कार्यवाही केली नाही त्यांनी ही कार्यवाही पूर्ण करावी तसेच संबंधीत आस्थापनेवरील पीडित महिलेला तक्रार नोंदविण्यासाठी https://shebox.wcd.gov.in ही लिंक कार्यालयाच्या दर्शनी भागात तसेच कार्यालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर देण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
००००००
रक्षाबंधनानिमित्त रेल्वे डाक सेवा काउंटरवर रात्री उशिरापर्यंत
बुकिंग सुविधा
अमरावती,दि.६ : रक्षाबंधन सणा निमित्ताने राखी,भेटवस्तू, पार्सल आणि इतर टपाल वस्तूंच्या बुकिंगसाठी नागरीकांच्या सोयीकरिता अमरावती रेल्वे स्थानकावरील रेल्वे डाक सेवा काउंटर दुपारी ४ ते रात्री १०.३० पर्यंत सुरु ठेवण्यात आल्याचे रेल्वे डाक सेवा नागपूरचे अधीक्षक गणेश अंभोरे यांनी कळविले आहे.
ग्राहकांना रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर राखीचे पार्सल वेळेवर रवाना व वितरीत करता यावे म्हणून कार्यालयीन वेळेनंतरही रात्री उशिरापर्यंत रेल्वे डाक सेवा काउंटरवर बुकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या काउंटरवर ग्राहकांसाठी स्पीड पोस्ट, पार्सल सेवा, आंतरराष्ट्रीय टपाल व पार्सल सेवा उपलब्ध असणार आहेत. या सेवेचा जास्तीत-जास्त लाभ घेवून देश व परदेशातील आपल्या प्रियजनांपर्यंत राखी ,भेटवस्तू , मिठाई व इतर सणासुदीच्या वस्तू वेळेवर पोहचविण्यासाठी ग्राहकांना आगावू बुकींग करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
००००
आयआयएमसीत इंग्रजी
व मराठी पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी स्पॉट प्रवेश प्रक्रिया 13 ऑगस्टला
अमरावती: भारतीय
जन संचार संस्थानच्या अमरावती परिसरातील इंग्रजी आणि मराठी पत्रकारिता पदव्युत्तर पदविका
अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता रिक्त जागांवरील प्रवेशासाठी स्पॉट (वाक
इन) प्रवेश प्रक्रिया गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात
आली आहे. प्रवेश रिक्त जागांच्या उपलब्धतेनुसार व निर्धारित आरक्षण धोरणानुसार गुणवत्ता
यादीच्या आधारे दिले जाणार आहेत.
केंद्रीय विद्यापीठे
प्रवेश परीक्षा (सीयुईटी-पीजी ) २०२६ अंतर्गत जन संवाद आणि पत्रकारिता (COQP17) या
विषयात मेरीट प्राप्त उमेदवारांना गुणवत्ता क्रमवारीनुसार प्रवेश दिला जाईल. तसेच,
सीयुईटी-पीजी मार्फत परीक्षा देऊ न शकणारे, मात्र कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षेत
किमान ५० टक्के गुण मिळविलेल्या पात्र उमेदवारांनाही स्पॉट (वाक इन) प्रवेश प्रक्रियेत
सहभागी होता येणार आहे. अशा उमेदवारांना प्रवेशासाठी १३ ऑगस्ट रोजी लेखी प्रवेश परीक्षा
द्यावी लागेल. लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना गुणवत्ता व निर्धारित आरक्षणाच्या
निकषांनुसार प्रवेश दिला जाईल. प्रवेश करीता वयोमर्यादेची अट असून अनारक्षित प्रवार्गासाठी
२५ वर्ष, ओबीसी करीता २८ वर्ष तर अनुसूचित जाती / जमाती आणि दिव्यांग उमेदवारा करीता
३० वर्ष आहे.
प्रवेशासाठी
इच्छुक उमेदवारांनी दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता आयआयएमसी, अमरावती परिसरात
सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे, त्यांची स्वसाक्षांकित छायाप्रती, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे
तसेच आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन आयआयएमसी तर्फे करण्यात आले आहे.
प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी भारतीय जन संचार संस्थानच्या अमरावती कार्यालयाशी
संपर्क साधावा. प्रवेश अडचणी संदर्भात डॉ. राजेश सिंह कुशवाहा (9415862377), डॉ. विनोद
निताळे (9860046706), रोहन तायडे (8275734035) कार्यालय (0721-2668180), यांच्याशी
दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. अशी माहिती संस्थानचे क्षेत्रीय संचालक डॉ. राजेश
सिंह कुशवाहा यांनी दिली आहे.
00000




No comments:
Post a Comment