Thursday, October 31, 2024

DIO NEWS AMRAVATI 31.10.2024

 

धारणी विधानसभा मतदार संघातील उमेदवाराच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर

अमरावती, दि. 31 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने खर्च निरीक्षक यांच्याशी चर्चा करून प्रत्येक उमेदवाराची खर्च नोंदवही तपासणीसाठी  वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. यासाठी धारणी  विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन 41-मेळघाट क्षेत्र धारणीचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी  यांनी केले आहे.

            पहिली तपासणी दि. 8 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी  3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, दुसरी तपासणी दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3 ते सायंकाळी  5 वाजेपर्यंत, तिसरी तपासणी दि. 16 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील. तपासणीचे ठिकाण उपकोषागार कार्यालय धारणी जि. अमरावती येथे राहील.

            जर उपरोक्त दिनांकाला सर्व उमेदवारांच्या लेख्यांची तपासणी वेळेअभावी पूर्ण होऊ शकली नाही, तर उर्वरित उमेदवारांच्या लेख्याची तपासणी त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येईल.

            मेळघाट विधासभा मतदारसंघ, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मधील सर्व उमेदवारांनी आपले खर्चाचे लेखे आवश्यक त्या सर्व अभिलेख्यासह तपासणीसाठी स्वत: किंवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत उपलब्ध करून द्यावे. तपासणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनिवार्य असल्याने कोणत्याही उमेदवाराने किंवा प्राधिकृत प्रतिनिधीने अनुपस्थित राहू नये, अन्यथा नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

00000

 

तिवसा विधानसभा मतदार संघातील उमेदवाराच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर

अमरावती, दि. 31 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने खर्च निरीक्षक यांच्याशी चर्चा करून प्रत्येक उमेदवाराची खर्च नोंदवही तपासणीसाठी  वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. यासाठी तिवसा  विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन तिवसा उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मिन्नु पी. एम. यांनी केले आहे.

            पहिली तपासणी दि. 8 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी  2.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, दुसरी तपासणी दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी  5 वाजेपर्यंत, तिसरी तपासणी दि. 16 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील. तपासणीचे ठिकाण तहसिल कार्यालय तिवसा  येथे राहील.

            जर उपरोक्त दिनांकाला सर्व उमेदवारांच्या लेख्यांची तपासणी वेळेअभावी पूर्ण होऊ शकली नाही, तर उर्वरित उमेदवारांच्या लेख्याची तपासणी त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येईल.

            तिवसा विधासभा मतदारसंघ, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मधील सर्व उमेदवारांनी आपले खर्चाचे लेखे आवश्यक त्या सर्व अभिलेख्यासह तपासणीसाठी स्वत: किंवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत उपलब्ध करून द्यावे. तपासणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनिवार्य असल्याने कोणत्याही उमेदवाराने किंवा प्राधिकृत प्रतिनिधीने अनुपस्थित राहू नये, अन्यथा नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

00000

अचलपूर विधानसभा मतदार संघातील उमेदवाराच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर

अमरावती, दि. 31 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने खर्च निरीक्षक यांच्याशी चर्चा करून प्रत्येक उमेदवाराची खर्च नोंदवही तपासणीसाठी  वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. यासाठी अचलपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन 42-अचलपूर विधानसभा मतदार संघ, निवडणूक निर्णय अधिकारी बळवंत अरखराव  यांनी केले आहे.

            पहिली तपासणी दि. 8 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी  10 ते दुपारी  12 वाजेपर्यंत, दुसरी तपासणी दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत, तिसरी तपासणी दि. 16 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी  12 वाजेपर्यंत राहील. तपासणीचे ठिकाण नविन प्रशासकीय इमारत, उपविभागीय अधिकारी कार्यालय, परिसर, अचलपूर  येथे राहील.

            जर उपरोक्त दिनांकाला सर्व उमेदवारांच्या लेख्यांची तपासणी वेळेअभावी पूर्ण होऊ शकली नाही, तर उर्वरित उमेदवारांच्या लेख्याची तपासणी त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येईल.

            42-अचलपूर विधासभा मतदारसंघ, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मधील सर्व उमेदवारांनी आपले खर्चाचे लेखे आवश्यक त्या सर्व अभिलेख्यासह तपासणीसाठी स्वत: किंवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत उपलब्ध करून द्यावे. तपासणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनिवार्य असल्याने कोणत्याही उमेदवाराने किंवा प्राधिकृत प्रतिनिधीने अनुपस्थित राहू नये, अन्यथा नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

00000

बडनेरा मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन

अमरावती, दि. 31 : बडनेरा विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून रवि रंजन कुमार विक्रम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीशी संबंधित तक्रारींसाठी त्यांच्याशी संपर्क करता येणार आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ३७ बडनेरा विधानसभा मतदारसंघासाठी रवि रंजन कुमार विक्रम यांची सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९०२१७९८०५५ असा आहे. निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून विजय संतान यांची नियुक्ती झाली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९०२८९४५५५८ असा आहे. निवडणूक निरीक्षक यांना भेटण्याची वेळ सकाळी १० ते ११ अशी आहे. त्यांना चंद्रभागा कक्ष, शासकीय विश्राम गृह, अमरावती याठिकाणी भेटाता येणार आहे.

00000

 

 

Wednesday, October 30, 2024

DIO NEWS AMRAVATI 30.10.2024

 







परवानगी, तक्रारींचा निपटारा तातडीने करावा

*निवडणूक निरीक्षकांच्या सूचना

अमरावती, दि. 30 (जिमाका) : निवडणुकीतील प्रत्येक उमेदवारांना सहकार्य करावे. त्यांना प्रचारासाठी आवश्यक असलेली परवानगी तातडीने देण्याची व्यवस्था करण्यात यावी. यासाठी एक खिडकी कार्यान्वित करण्यात यावी. परवानगी, तसेच तक्रारींचा निपटारा तातडीने करावा, अशा सूचना निवडणूक निरीक्षकांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या चारही सामान्य निरीक्षकांनी आज आढावा घेतला. यावेळी निवडणूक सामान्य निरीक्षक रवि रंजन कुमार विक्रम, श्याम लाल पुनिया, लक्ष्मीशा जी, बिधानचंद्र चौधरी यांच्यासह जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महोपात्रा, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.

निवडणूक निरीक्षक यांनी मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा निर्माण करण्यात याव्यात. प्रामुख्याने उमेदवारांना देण्यात येणाऱ्या विविध परवानगीसाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी. उमेदवारांना प्रचाराची परवानगी सुलभरित्या मिळाल्यास ते खर्चही व्यवस्थित देतील. मतदानासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, यासाठी कमी मतदान असलेल्या आणि शहरी भागामध्ये जनजागृतीचे अभियान राबविण्यात यावे, अशा सूचना केल्यात.

बैठकीत जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघाची माहिती दिली. प्रामुख्याने मेळघाट विधानसभा मतदारसंघ हा जंगल आणि रिमोट असल्याने यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. येथील सर्व मतदान केंद्र पर्यायी व्यवस्थेने संपर्कात राहतील, याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मतदार यादी अंतिम करण्यात येत असून नव्याने गेल्या कालावधीत एक लाखाहून अधिक नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. मतदानासाठी पुरेशा प्रमाणात ईव्हीएम मशीन्स उपलब्ध असून त्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहे.

मतदानावरील बहिष्काराची अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. परंतु जिल्हा प्रशासन यावर पूर्ण लक्ष ठेऊन आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या भागात स्वीपचे उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या लोकसभेच्या मतदानात तीन टक्के वाढ झाली आहे. नियंत्रण कक्ष, स्ट्राँगरूम सुसज्ज आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारी आणि परवानगीसाठी जिल्हास्तरावर सुविधा निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना कोणताही त्रास होणार नाही. निवडणूक निरीक्षकांची माहिती आणि संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक त्यांच्या समस्यांबद्दल थेट संपर्क साधू शकतील, असेही श्री. कटियार यांनी सांगितले.

 

00000

तिवसा विधासभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक

श्याम लाल पुनिया यांच्या भम्रणध्वनी क्रमांकामध्ये बदल

        अमरावती, दि. 30 (जिमाका): विधासभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे अनुषंगाने 38-अमरावती विधानसभा मतदार संघ व 39-तिवसा विधासभा मतदार संघासाठी श्याम लाल पुनिया  हे निवडणूक निरीक्षक म्हणून अमरावतीत दाखल झालेले आहे.

            श्याम लाल पुनिया, निवडणूक निरीक्षक यांच्या मुक्काम आज दि. 29 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर 2024 या कालावधीत मुख्य शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे राहील. 038-अमरावती विधासभा मतदार संघ व 039-तिवसा विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत त्यांची नियुक्ती केलेली असून सामान्य नागरिकांच्या निवडणूक विषयक काही तक्रारी किंवा सूचना असतील तर श्याम लाल पुनिया, निवडणूक निरीक्षक यांच्याशी सकाळी 10 ते 11 वेळेत पूर्णा कक्ष, मुख्य शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे संपर्क साधता येईल. त्यांचा संपर्क क्रमांक 9172760284 हा राहील. तसेच त्यांचा मेल आयडी shyamlal.poonja@ias.nic.in यावरही सामान्य नागरिकांना आपल्या निवडणूकविषयक काही तक्रारी किंवा सूचना असल्यास सादर करता येईल, अशी माहिती 38-अमरावती विधासभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी, अमरावतीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.

00000






संशयास्पद बँकीग व्यवहाराची माहिती तातडीने

सादर करण्याबाबत खर्च निरीक्षकांचे आदेश

अमरावती, दि. 30 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची अधिसूचना निर्गर्मित केलेली आहे. त्याअनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात दिनांक 20 नोव्हेंबर2024 रोजी निवडणूक होणार असून निवडणुका शांततापूर्ण, भयमुक्त व पारदर्शकरित्या पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे. 

निवडणुक काळातील संशयास्पद बँकीग व्यवहाराची माहिती खर्च निरीक्षक यांना उपलब्ध करुन देण्याबाबत अग्रणी बँक, सर्व शासकीय व खाजगी बँक तसेच सह निबंधक, सहकारी पतसंस्था, अमरावती यांची सभा खर्च निरीक्षक वेंकन्ना तेजावथ यांच्या अध्यक्षतेखाली  नुकतीच आयोजित करण्यात आली. या सभेत उपस्थित सर्व बँक अधिकारी व सह निबंधक यांना निवडणुक आयोगाने निर्देशीत केल्याप्रमाणे सर्व संशयास्पद व्यवहारांची माहिती विनाविलंब सादर करण्याची सूचना देण्यात आल्या.

            नोडल अधिकारी विजय देशमुख, सहायक नोडल अधिकारी दिनेश मेतकर, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अतुल खानजोडे तसेच विविध बँकेचे प्रतिनिधी,  सहकारी पतसंस्थांचे सह निबंधक  आदी यावेळी उपस्थित होते.

00000

बडनेरा विधानसभा मतदार संघातील उमेदवाराच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर

            अमरावती, दि. 30 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने खर्च निरीक्षक यांच्याशी चर्चा करून प्रत्येक उमेदवाराची खर्च नोंदवही तपासणीसाठी  वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन 37 -बडनेरा विधानसभा, मतदार संघाचे उपजिल्हाधिकारी महसूल तथा निवडणूक निर्णय अधिकारी विवेक जाधव यांनी केले आहे.

पहिली तपासणी दि. 7 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, दुसरी तपासणी दि. 11 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, तिसरी तपासणी दि. 15 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील. तपासणीचे ठिकाण निवडणूक खर्च तपासणी कक्ष,उपविभागीय अधिकारी कार्यालय, जुनी अमरावती तहसिल कार्यालय, अमरावती येथे राहील.

            जर उपरोक्त दिनांकाला सर्व उमेदवारांच्या लेख्यांची तपासणी वेळेअभावी पूर्ण होऊ शकली नाही तर उर्वरित उमेदवारांच्या लेख्याची तपासणी त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येईल.

            बडनेरा विधासभा मतदारसंघ, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मधील सर्व उमेदवारांनी आपले खर्चाचे लेखे आवश्यक त्या सर्व अभिलेख्यासह तपासणीसाठी स्वत: किंवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत उपलब्ध करून द्यावे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, तपासणी अनिवार्य असल्याने कोणत्याही उमेदवाराने किंवा प्राधिकृत प्रतिनिधीने अनुपस्थित राहू नये, अन्यथा नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल

00000

अमरावती विधानसभा मतदार संघातील उमेदवाराच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर

अमरावती, दि. 30 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने खर्च निरीक्षक यांच्याशी चर्चा करून प्रत्येक उमेदवाराची खर्च नोंदवही तपासणीसाठी  वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. यासाठी अमरावती विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन

 अमरावती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी  अनिल भटकर यांनी केले आहे.

            पहिली तपासणी दि. 7 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी  10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत, दुसरी तपासणी दि. 11 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत, तिसरी तपासणी दि. 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत राहील. तपासणीचे ठिकाण अमरावती उपविभागीय अधिकारी कार्यालय येथील पहिला माळ्यावरील सभागृह, नवीन प्रशाकीय इमारत, संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन समोर, अमरावती येथे राहील.

            जर उपरोक्त दिनांकाला सर्व उमेदवारांच्या लेख्यांची तपासणी वेळेअभावी पूर्ण होऊ शकली नाही, तर उर्वरित उमेदवारांच्या लेख्याची तपासणी त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येईल.

            अमरावती विधासभा मतदारसंघ, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मधील सर्व उमेदवारांनी आपले खर्चाचे लेखे आवश्यक त्या सर्व अभिलेख्यासह तपासणीसाठी स्वत: किंवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत उपलब्ध करून द्यावे. तपासणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनिवार्य असल्याने कोणत्याही उमेदवाराने किंवा प्राधिकृत प्रतिनिधीने अनुपस्थित राहू नये, अन्यथा नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

00000

सोयाबीन विक्रीसाठी आणण्यापूर्वी तपासून आणण्याचे

जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांचे आवाहन

            अमरावती, दि. 30 (जिमाका): शासनमान्य हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी आणण्यापूर्वी व्यवस्थित वाळवून त्यामधील आद्रतेचे प्रमाण 12 टक्केपेक्षा कमी असल्याची व एफएक्यू दर्जाचे सोयाबीन असल्याची खात्री करावी. त्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनचे नमुने खरेदी केंद्रावर आणून त्यातील आर्द्रता तपासावी व ती 12 टक्केपेक्षा कमी असल्यासच सोयाबीन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावे. जेणेकरून जास्त आर्द्रतेमुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन परत न्यावे लागणार नाही, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी केले आहे.

00000




जिल्हाधिकारी यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाहणी दौरा

 

अमरावती, दि. 30 (जिमाका):  जिल्हाधिकारी  सौरभ कटियार यांनी नुकताच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती येथे पाहणी व निरीक्षण दौरा केला.   यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन), जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन), शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रशासकीय इमारत, मुलींचे वसतिगृह, मुलांचे वसतिगृह, ग्रंथालय, व्याख्यान गृह इत्यादींची प्रत्यक्ष पाहणी केली. दौऱ्यादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत आढावा घेतला. जिल्हाधिकारी यांनी इर्विन व डफरीन येथील वैद्यकीय महाविद्यालयांशी संबंधित ऑपरेशन थिएटर, स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र कक्ष, इर्विन येथे नवीन तयार होणारे ह्दययरोग अतिदक्षता विभाग या इमारतींना भेट देऊन आवश्यक सुधारणा करण्याबाबत मार्गदर्शन केले.

त्यानंतर डफरिन रुग्णालय येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या शैक्षणिक इमारत, व्याख्यानकक्ष, ग्रंथालय, वसतिगृहे इत्यादी ठिकाणी भेट देऊन पाहणी केली .व तेथे उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांबाबत आढावा घेतला.

 जिल्हाधिकारी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक असलेल्या बाबींचा पुरवठा करण्यासाठी  जिल्हा वार्षिक योजना तसेच  इतर उपलब्ध निधीतून आवश्यक बाबी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगितले.  अमरावती येथे सुसज्ज कम्प्युटराइज व्याख्यान कक्ष, मायनर ओटी येथील सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता श्री. गिरी, उप अभियंता बांधकाम विभाग श्री. काळे,  आरोग्य विभागाचे उप अधिष्ठाता डॉ. नितीन अंभोरे, प्रशासकीय अधिकारी संजय मैदानकर, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, जिल्हा स्त्री रुग्णालय डफरिन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार आदी यावेळी  उपस्थित होते.

00000




जिल्हा स्वीप कक्ष व फटाका असोसिएशनमार्फत

मतदार जनजागृती

 अमरावती, दि.30 (जिमाका): जिल्हा स्वीप कक्ष व फटाका असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्सकोर मैदानावर मतदान जनजागृती उपक्रम नुकताच राबविण्यात आला. तसेच जिंगल्सव्दारे मतदान जनजागृती करण्यात आली. फटाका खरेदी करणाऱ्या ग्राहकांना यावेळी खरेदीत विशेष सुट मिळणार आहे.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस, सामान्य प्रशासन अधिकारी संजय राठी,प्रशासन अधिकारी राहुल पवार, चिल्लर फटाका विक्रेते सचिव राजाभाऊ उंबरकर, जिल्हा स्वीप कक्षाचे ज्ञानेश्वर घाटे, संजय राठी, नितिन माहोरे, श्रीकांत मेश्राम, हेमंतकुमार यावले, राजेश सावरकर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मतदारांना मतदानाची शपथ देण्यात आली.

जिल्हा स्वीप कक्षाव्दारे आगामी काळात विविध जनजागृती कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा स्तरावर सर्व शासकीय यंत्रणा, सर्व सामाजिक, व्यापारी, औद्योगीक, शैक्षणिक संघटना इत्यादीच्या सहभागाने व महानगर पालिका तथा क्रीडा विभागाच्या सहकार्याने जवळपास 50 हजार नागरिकांची मतदान जनजागृती रॅली आयोजित करण्यात येणार आहे. सर्व विधानसभा मतदार संघाअंतर्गत मतदान जनजागृती संदर्भात तालुका स्वीप नोडल अधिकारी व चमूमार्फत  विविध उपक्रम, मतदान जनजागृती उपक्रम, महिला व बाल कल्याण विभाग, आरोग्य व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर व बचत गटातील महिला यांचा पिंक फोर्स तयार करुन गृह भेटीव्दारे महिला मतदारांमध्ये जनजागृती करणे या बाबींचा समावेश आहे.

0000

 

 

 

 

 

 

 

 

Tuesday, October 29, 2024

DIO NEWS AMRAVATI 29.10.2024

 

विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक जिल्ह्यात दाखल

*चार सामान्य निरीक्षक, दोन खर्च निरीक्षक, एक पोलीस निरीक्षक

अमरावती, दि. 29 (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षकांची नेमणूक केली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी चार सामान्य निरीक्षक, दोन खर्च निरीक्षक आणि एक पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणुकीतील तक्रारींच्या अनुषंगाने 36 धामणगाव रेल्वे, 37 बडनेरा या मतदारसंघासाठी रवी रंजन कुमार विक्रम, संपर्क क्रमांक 9021798055, 38 अमरावती आणि 39 तिवसा मतदारसंघासाठी श्याम लाल पुनिया, संपर्क क्रमांक 9172760284, 40 दर्यापूर मतदारसंघासाठी लक्ष्मीशा जी, संपर्क क्रमांक 9226465559, 42 अचलपूर आणि 43 मोर्शी मतदारसंघासाठी बिधान चंद्र चौधरी, संपर्क क्रमांक 9021796356 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

खर्च निरीक्षक म्हणून धामणगाव, बडनेरा, अमरावती आणि । तिवसासाठी वेंकान्ना तेजावथ, संपर्क क्रमांक 7666243468 आणि दर्यापूर, मेळघाट, अचलपूर, मोर्शी या मतदारसंघासाठी उमा माहेश्वरी 7666791114 यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक म्हणून बत्तुला गंगाधर, संपर्क क्रमांक 7276027550 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने तक्रारीचे निराकरण करण्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीसंदर्भात नागरिकांना तक्रारी, समस्या असल्यास संबंधित निरीक्षकांकडे मांडता येणार आहे.

000000









उत्सव लोकशाहीचा सन्मान मतदारांचा दिपोत्सव एक दिवा मतदारांच्या सन्मानासाठी

अमरावती, दि. 29 (जिमाका): जिल्हा स्वीप कक्ष जि.प.अमरावती, महीला आर्थिक विकास महामंडळ व महीला व बाल विकास कार्यालय अमरावती तर्फे सोमवार दिनांक 28ऑक्टोबरला अमरावती येथे दीपोत्सव व मतदान जनजागृती कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी नोडल अधिकारी(SVEEP) तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महोपात्रा यांचे शुभ हस्ते दिवा लावून उदघाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला जिल्हा समन्वयक माविम सुनील सोसे, विलास मरसाळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उमेश टेकाडे, शिक्षणाधिकारी तथा महिला व बालविकास अधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, युवा प्रशिक्षणार्थी, माविम तालुका संघटक, स्वीप टीमचे ज्ञानेश्वर घाटे, संजय राठी, नितीन माहोरे, हेमंतकुमार यावले, राजेश सावरकर उपस्थित होते. यावेळी सर्वांनी दीप प्रज्जवलित करुन फटाक्यांच्या आतिश बाजित दीपोत्सव साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांना जिल्हा नोडल अधिकारी संजीता महोपात्रा यांनी दिवाळी सणा निमित्य शुभेच्छा देऊन मतदान जनजागृती करण्याबाबत आवाहन केले.

0000

तिवसा विधासभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक अमरावतीत दाखल

        अमरावती, दि. 29 (जिमाका): विधासभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे अनुषंगाने 38-अमरावती विधानसभा मतदार संघ व 39-तिवसा विधासभा मतदार संघासाठी मुळचे राजस्थान व दिल्ली येथे भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेले श्याम लाल पुनिया  हे निवडणूक निरीक्षक म्हणून आज अमरावतीत दाखल झालेले आहे.

            श्याम लाल पुनिया, निवडणूक निरीक्षक यांच्या मुक्काम आज दि. 29 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर 2024 या कालावधीत मुख्य शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे राहील. 038-अमरावती विधासभा मतदार संघ व 039-तिवसा विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत त्यांची नियुक्ती केलेली असून सामान्य नागरिकांच्या निवडणूक विषयक काही तक्रार किंवा सूचना असतील तर श्याम लाल पुनिया, निवडणूक निरीक्षक यांच्याशी सकाळी 10 ते 11 वेळेत पूर्णा कक्ष, मुख्य शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे संपर्क साधता येईल. त्यांचा वैयक्तिक संपर्क क्रमांक 7085481617 व स्थानिक संपर्क क्रमांक 9317283159 असा राहील. तसेच त्यांचे मेल आयडी shyamlal.poonja@ias.nic.in यावरही सामान्य नागरिकांना आपल्या निवडणूक विषयक काही तक्रारी किंवा सूचनाअसल्यास सादर करता येईल, अशी माहिती 38-अमरावती विधासभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी, अमरावतीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.

00000

शिष्यवृत्तीचे अर्ज  तातडीने निकाली काढण्याचे आवाहन

 

अमरावती, दि.29 (जिमाका) : सामाजिक न्याय विभाग यांच्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित 

जाती प्रवर्गातील विविध योजना राबविण्यात येतात. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण की परीक्षा फी योजना, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजना राबविण्यात येतात.

शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी महाडीबीटी पोर्टलवरून नवीन व नुतनीकरणाच्या अर्जांची ऑनलाईन स्वीकृती सुरू करण्यात आलेली आहे.

संबंधित महाविद्यालयांनी दि. 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत या कार्यालयास परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. दि. 15 नोव्हेंबर नंतर कुठल्याही महाविद्यालयाचा प्रस्ताव स्वीकारण्यात येणार नाही.

 

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले पात्र अर्ज जिल्हा लॉगिन वर पाठवावे. तसेच विद्यार्थ्यांनी लॉगिनकडे त्रुटी पूर्ततेसाठी परत केलेले अर्जाची संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून त्वरित त्रुटिपूर्तता करून पात्र अर्ज जिल्हा लॉगिन वर पाठविण्यात यावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र व्ही. जाधवर यांनी केले आहे.

0000

निवृत्ती वेतन धारकांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावेत

            अमरावती, दि. 29 (जिमाका) : कोषागारामधून निवृत्तीवेतन स्वीकारत असलेल्या राज्य शासनाच्या सर्व निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतनधारक, माजी आमदार तसेच इतर राज्य निवृत्तीवेतनधारकांना कळविण्यात येते की, माहे नोव्हेंबर महिन्यात संबंधित बँक शाखेत निवृत्तीवेतनधारकांची यादी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. निवृत्तीवेतनधारकांनी त्यांच्या पेंशन संबंधित बँक शाखेत जाऊन कोषागार कार्यालयाकडून प्राप्त असलेल्या बँकेच्या निवृत्तीवेतनधारकांच्या हयात यादीवरच स्वाक्षरी करावी तसेच विहित नमुन्यात संपूर्ण माहिती भरावी. बँकेत जातांना आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक सोबत घेऊन जावे. निवृत्तीवेतनधारकांनी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत हयात प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांचे माहे डिसेंबर 2024 चे निवृत्ती वेतन काढता येणार नाही. याबाबत निवृत्तीवेतनधारक, कुटुंबनिवृत्तीवेतन धारक यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाचे कोषागार अधिकारी अमोल ईखे  यांनी केले आहे.

0000



मेळघाटातील स्वयंसेवी संस्थांसोबत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचा संवाद

अमरावती, दि. 29 (जिमाका): मेळघाट विकास समन्वय समिती, आरोग्य सेवा अमरावती व महिला बाल कल्याण विभाग यांच्या सोबत माता मृत्यू व बाल मृत्यू या विषयावर आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी संवाद साधून आवश्यक उपाययोजनेबाबत चर्चा केली. धारणी तालुक्यातील कुसुमकोट खु. येथे उपस्थित डॉ. आरती कुलवाल, डॉ. सुरेश असोले, सहा प्रकल्प अधिकारी धारणी श्री. ठोंबरे, जिल्हा सामान्य रुग्णालय डॉ. संदीप हेडाऊ, डॉ. रमेश बनसोड, डॉ. तिलोत्तमा वानखडे, वनिता शिंदे, श्री. पिंजरकर यावेळी उपस्थित होते.

आरोग्य विभागासह एनजीओ व आयसीडीएस विभाग तसेच गावातील नागरिकांचा सहभाग यात महत्त्वपूर्ण आहे.यामुळे माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. ज्या गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही, पावसाळयात गावांचा संपर्क तुटतो, रोजगार उपलब्ध नसल्यामुळे लोकांचे स्थलांतराचे प्रमाण मोठया प्रमाणात आहेत, भुमका पडीयार अंधश्रध्दा यांच्यावर लोकांचा मोठ्या प्रमाणात विश्वास आहे, कमी वयात लग्नाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने कुपोषित बालके आहेत त्याकरिता उपाययोजना करण्यात यावी.

जेथे संतती प्रतिबंधात्मक वापरचे प्रमाण कमी आहे, दोन अपत्यामधील अंतरचे प्रमाण कमी आहे, मातामध्ये अॅनिमियाचे प्रमाण जास्त आहे, गरोदर माता व स्तनदा माता नियमित आयर्न फॉलिक गोळयांचे सेवन करीत नाही अशा ठिकाणी अति दुर्गम भागात आरोग्य सहायक, आरोग्य सेविका व आरोग्य सेवक यांची भूमिका महत्त्वाची आहे. घरी होणा-या प्रसुती तसेच दुर्गम आदिवासी भागात लोक संदर्भ सेवा घेण्यासाठी तयार होत नाही, यासाठी ग्रामसेवक, सरपंच व तलाठी यांच्या माध्यमातून ठोस उपाययोजना करण्यात याव्यात. गावातील उकरडे, गटारे, नळदुरुस्तीसाठी आरोग्य सेवक वगळता ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा प्रकल्प अधिकारी कार्यालय उपाययोजना करण्यात याव्यात. मातामृत्यू, बालमृत्यू, कुपोषण या बाबींवर तसेच या अनुषंगाने विविध बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली.

0000

 

Monday, October 28, 2024

DIO NEWS AMRAVATI 28.10.2024

 






अमरावती विधानसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांसाठी

विशेष सुविधा आणि जनजागृती उपक्रम

अमरावती, दि. 28 (जिमाका):  आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने, अमरावती जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेत दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या उद्देशाने स्वीप (सिस्टेमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन) उपक्रमांतर्गत मतदार जनजागृती आणि सुविधा केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. याचे उद्घाटन स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांच्या हस्ते करण्यात आले.

या केंद्रांत दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रियेबद्दल आणि उमेदवारांच्या चिन्हांची माहिती ब्रेल लिपीतून दिली जात आहे. अमरावती जिल्ह्यात दहा हजारांहून अधिक दिव्यांग मतदार आहेत, आणि त्यांना सुगम पद्धतीने मतदान करता यावे यासाठी विशेष सुविधा पुरवण्यात येणार आहेत. प्रत्येक दिव्यांग मतदारापर्यंत पोहोचून त्यांचे मतदान सुनिश्चित करण्याचा संकल्प स्वीप विभागाने व्यक्त केला आहे.

दिव्यांग मतदार नोडल अधिकारी जया राऊत यांनी सांगितले की, दिव्यांग मतदारांना मतदानाचा अनुभव सोपा आणि सुगम होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. या कार्यक्रमात सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर, सहाय्यक दिव्यांग नोडल अधिकारी मुद्गगल, निरीक्षक पुरुषोत्तम शिंदे, तसेच अनेक दिव्यांग मतदार उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज मुद् गल यांनी तर सुञसंचालन संकेत पाटिल यांनी आभार पी.डी.शिंदे यांनी मानले,यावेळी जिल्हातील समाज कल्याण विभागाचे अधिकारी,कर्मचारी,दिव्यांग प्रतिनिधी उपस्थित होते.तसेच जिल्हा स्वीप कक्षाचे ज्ञानेश्वर घाटे,संजय राठी,नितिन माहोरे,हेमंतकुमार यावले,राजेश सावरकर यांचे सहकार्य लाभले.

0000










अमरावतीत दिवाली विथ माय भारत

अमरावती, दि. 28 (जिमाका): ‘दिवाळी विथ माय भारत’ अंतर्गत मेरा युवा भारतच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त  27 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरपर्यंत नेहरू युवा केंद्राच्या समन्वयाने बाजाराची स्वच्छता, वाहतुक नियम, वाहतुक व्यवस्थापन, दवाखान्यातील  प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची माहिती याबाबबत जनजागृती नेहरू युवा केंद्राचे, सरस्वती इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग आणि मातोश्री विमलाबाई देशमुख विद्यालयाचे स्वयंसेवक करणार आहेत.

दिवाळी विथ माय भारत अंतर्गत कृषी उत्पन्न् बाजार समिती येथे स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी मंदा नांदुरकर आणि नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर यावेळी उपस्थित होत्या. स्वयंसेवकांनी मार्केटमधील विक्रेत्यांना सिंगल युज प्लास्टिकच्या दुष्परिणामाबाबत जागरूक केले. स्वयंसेवकांना सहायक पोलीस आयुक्त संजय खताले यांनी वाहतुक नियम आणि व्यवस्थापन याविषयी माहिती दिली आणि मार्गदर्शन केले.

दिवाळी विथ माय भारत अंतर्गत जिल्हा सामान्य रूग्णालय व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये सरस्वती नर्सिंग इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थ्यांनी प्रधान मंत्री जन आरोग्य योजना बाबत  रूग्णांना माहिती दिली आणि आभा आयडी कार्ड बनवून दिले. दिवाळी विथ माय भारत हा युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयचे एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. यात युवकांना उद्योजकता आणि करिअरशी संबंधित प्रशिक्षण घेता येईल,  असे श्रीमती बासुतकर यांनी सांगितले.

00000

सणउत्सव कालावधीत पोलीस अधिनियम कलम 36 अन्वये आदेश जारी

अमरावती, दि. 28(जिमाका): जिल्ह्यात आगामी काळात सण उत्सव साजरा होणार आहे. तसेच नामांकन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यादिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवार नामांकन पत्र दाखल करणार आहेत. सभांचे आयोजन व शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मिरवणूक काढण्यात येतात व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू करण्यात आली आहेत. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 36 अन्वये सर्व पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील सर्व पोलिस ठाणेदार, अंमलदार व त्यांच्यावरील अधिकाऱ्यांना दि. 29 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत अधिकार प्रदान करण्याचे आदेश पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी निर्गमित केले आहे.

 

रस्त्यावरून जाणारी मिरवणूक सुरळीत ठेवणे, उपासनास्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळ्याचा संभव असेल तर अडथळा होऊ न देणे, सर्व मिरवणूकाच्या व जमावाच्या प्रसंगी व पूजा-अर्चा या ठिकाणी कोणताही रस्ता किंवा अडथळा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा न होवू देण्यासाठी याठिकाणी बंदोबस्त ठेवणे, सर्व रस्त्यांवर किंवा रस्त्यात, सर्व धाब्यावर आणि सार्वजनिक ठिकाणच्या कपडे धुण्याचा व उतरविण्याचा जागेच्या ठिकाणी व इतर सर्व सार्वजनिक किंवा लोकांच्या येण्याच्या जागेमध्ये बंदोबस्त राहण्यासाठी, वाद्यांबाबत नियम व नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक जागेत ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत नियम व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सक्षम अधिका-यांनी या अधिनियमाच्या कलम 33, 35, 37 ते 40, 44 व 45 अन्वये कार्यवाही करावी, असे पोलीस आयुक्त यांच्या आदेशात नमूद केले आहे.

 

0000


 















जिल्ह्यात आज 77 उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल

अमरावती, दि. 28 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज 77 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. धामणगाव रेल्वे – 9, बडनेरा – 13, अमरावती - 10,  तिवसा – 12, दर्यापूर – 11, मेळघाट – 7,  अचलपूर – 8,  मोर्शी – 7 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

36 धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात विजय शामराव शेंडे – अपक्ष, मनिष वीरेंद्र जगताप, हर्षवर्धन बळीराम खोब्रागडे – बहुजन महा पार्टी, योगेंद्र एकनाथ पाटील – बहुजन समाज पार्टी, अभिलाषा चंद्रशेखर गजभिये – अपक्ष, विरेंद्र वाल्मिक जगताप – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, अमोल प्रभाकर बिरे – अपक्ष, संदिप कृष्णराव वाट – अपक्ष, सुभाष रामाजी भोयर – अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

37 बडनेरा विधानसभा मतदारसंघातून मुन्ना नारायणसिंग राठोड - अपक्ष, सुरज नारायण घरडे – अपक्ष, श्रीकांत बाबुराव फुलसावंदे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), प्रशांत पंजाब जाधव  - अपक्ष, उत्तम किसनराव तिरपुडे - पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक), नितीन बाबाराव कदम - अपक्ष, राहुल प्रकाश श्रृंगारे - अपक्ष, सुरेश पुंडलिक मेश्राम - अपक्ष, मंजुषा प्रशांत जाधव - अपक्ष, गिरीश हरिदास बारबुद्धे - अपक्ष, संजय देवरावजी महाजन - राष्ट्रीय समाज पक्ष, प्रीती संजय बंड - अपक्ष, सुनंदा जयराम अभ्यंकर - अपक्ष यांनी नामांकन अर्ज सादर केले.

38 अमरावती विधानसभा मतदारसंघात सैय्यद अबरार सैय्यद मजीद - प्रहर जनशक्ती पार्टी, जगदिश मोतीलाल गुप्ता – अपक्ष, पुरूषोत्तम किसन बागडी – अपक्ष, सुलताना परवीन मोहम्मद जाकीर – अपक्ष, मेराजुनिस्सा अब्दुल शकील - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), शेख युसुफ – अपक्ष, बबल हरिभाऊ रडके – अपक्ष, पाटील पप्पु उर्फ मंगेश मधुकरराव – महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विजय माणिकराव ढाकुलकर – अपक्ष, अविनाश हरिशचंद्र धनवटे - पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

39 तिवसा विधानसभा मतदारसंघात विनोद किसन भालेराव - अपक्ष, शुभम विजय गजभिये - भारतीय युवा जन एकता पार्टी, दिनकर रामदास सुंदरकर - अपक्ष, राजीव बक्षी जामनेरकर - विकास इंडिया पार्टी, शिल्पा नरेंद्र कठाणे - जनवादी पार्टी, प्रवीण मारोतराव देशमुख - अपक्ष, युसुफ शा बिस्मिल्ला शा - अपक्ष, राजेश श्रीरामजी वानखडे - भारतीय जनता पक्ष, सुयश पांडुरंग श्रीखंडे - अपक्ष, अर्जुन सुखदेवराव युवनाते - अपक्ष, वासुदेव विठ्ठलराव कळसकर - अपक्ष, सुरज निरंजन लांडगे - आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

40 दर्यापूर विधानसभा मतदारसंघात बबन महादेव विल्हेकर – अपक्ष, रमेश झिंगुजी अंभोरे – अपक्ष, राक्षसकर निलेश गजानन – अपक्ष, मनोहर अमृतराव चौथमल – अपक्ष, गजानन मोतीराम लवटे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), नागोराव वामन हंबर्डे – बहुजन समाज पार्टी, मनोहर कृष्णाजी कुऱ्हाडे – अपक्ष, रमेश गणपतराव बुंदिले – राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी, श्रीराम श्रावण नेहर – अपक्ष, कैलास उत्तमराव मोरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ), रविकिरण देविदास तेलगोटे – अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

41 मेळघाट विधानसभा मतदारसंघात राजेश किसन दहीकर – अपक्ष, विपीन छोगालाल पटेल – अपक्ष, केवलराम तुळशीराम काळे - भारतीय जनता पार्टी, रामचरण माणिकराव चव्हाण - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, हेमंत नंदा चिमोटे - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राजकुमार दयाराम पटेल - प्रहर जनशक्ती पार्टी, प्रवीण रामू मावसकर - अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

42 अचलपूर विधानसभा मतदारसंघात ठाकूर प्रमोदसिंह जियालाल गड्रेल – अपक्ष, तमीज शाहा उमर शाहा – अपक्ष, गिरीधर नथ्थूजी रौराळे – अपक्ष, अक्षरा रूपेश लहाने – अपक्ष, रवि गुणवंत वानखडे – बहुजन समाज पार्टी, गौरव ओमप्रकाश किटुकले – अपक्ष, बच्चू कडू – प्रहर जनशक्ती पक्ष, रूकसाना सैय्यद निसार – अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

43 मोर्शी विधानसभा मतदारसंघात उमेश प्रल्हादराव शहाणे – अपक्ष, देवेंद्र महादेवराव भुयार – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, प्रमोद सुभाषराव कडू – अपक्ष, सुशिल सुरेशराव बेले – आझाद समाज पार्टी (कांशीराम), गिरीश रंगराव कराळे - नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (श. प.), कमलनारायण जानराव उईके – बहुजन समाज पार्टी, महेंद्र उत्तमराव भातकुले – अपक्ष, यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

000000

DIO NEWS AMRAVATI 12.11.2024

  दर्यापूर विधानसभा क्षेत्राची दुसरी खर्च तपासणी *सर्व उमेदवारांनी सादर केला खर्च अमरावती, दि. 12 (जिमाका) : दर्यापूर विधानसभा मतदारसंघा...