Monday, February 16, 2026

DIO NEWS AMRAVATI 16-02-2026

 बुधवारी तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम

नागरिकांच्या समस्या गावातच ऐकल्या जाणार

अमरावती, दि. 06 (जिमाका) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. तसेच नागरिकांच्या समस्या निवारणासाठी बुधवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये 'तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण' कार्यक्रम होणार आहे. यात नागरिकांच्या समस्या गावातच ऐकून घेतल्या जाणार आहे.

या कार्यक्रमात नागरिकांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक तक्रारी, विविध विकास कामांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रस्ताव आणि स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. या दिवशी तहसील, जिल्हा परिषद, तसेच संबंधित तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसचिव आणि कृषी सहाय्यक उपस्थित राहणार आहेत.

प्रशासनाने तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रमासाठी समन्वयक अधिकारी तालुकानिहाय जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यासोबतच जिल्हा परिषद, तसेच संबंधित तालुक्यातील इतर सर्व विभागाचे अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसचिव, कृषी सहायक यांच्या उपस्थितीत तालुक्यातील जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम पार पाडावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले आहे.

00000000

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2025

साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

        अमरावती, दि. 16 (जिमाका) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2025 ते 31 डिसेंबर, 2025 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च, 2026 असा आहे.

            राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

00000

No comments:

Post a Comment

मेळघाटातील आदिवासी महिलांना मिळाले आरोग्य कवच भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम अमृत आहार योजना

मेळघाटातील आदिवासी महिलांना मिळाले आरोग्य कवच भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम अमृत आहार योजना # नारीशक्तीवंदन # महिला _ सक्षमीकरण #NariSha...