संविधान जागृती प्रश्नमंजूषा उपक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
अमरावती, दि. 19 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या संविधान जागृती प्रश्नमंजूषा 2025-26 या उपक्रमांतर्गत ऑनलाईन संविधान प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत आयोजित विशेष सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश (नागपूर खंडपीठ) न्या. एम. एस. जावळकर यांनी विद्यार्थ्यांना संविधान विषयक मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, मुंबई यांच्या पुढाकारातून आयोजित संविधान जागृती प्रश्नमंजूषा 2025-26 या राज्यव्यापी उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. संविधानाबद्दल सखोल ज्ञान, लोकशाही मूल्यांची जाणीव आणि सामाजिक न्यायाची बांधिलकी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर येथील डॉ. कैलास वसावे, डॉ. दिविता कोठेकर, डॉ. आरती तायडे, डॉ. व्ही. पी. तिवारी तसेच महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई येथील डॉ. जगदीश खोब्रागडे, डॉ. साहिली सुरजुसे व डॉ. अमोल चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
न्या. श्रीमती एम. एस. जावळकर यांनी विद्यार्थ्यांना संविधान विषयक अमूल्य मार्गदर्शन केले. त्यांनी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये, समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
या विशेष सत्रात न्या. आर. सी. चव्हाण, न्या. पृथ्वीराज चव्हाण, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित तसेच माजी आयुक्त समाज कल्याण इ. झेड. खोब्रागडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाल अ. थुल यांनी केले. कार्यक्रमास डॉ. जगदीश खोब्रागडे, डॉ. साहिली सुरजुसे व डॉ. आरती तायडे यांची उपस्थिती लाभली. विशेष म्हणजे राज्यातील विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविण्यात आला.
000000
जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन
अमरावती, दि. 19 (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक शिवाजी शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, अल्पेश हाते आदी उपस्थित होते. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
00000
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे व्हीएलएसआय चिप डिझाइन कार्यशाळा संपन्न
अमरावती, दि. 19 (जिमाका): तंत्रज्ञानाच्या युगात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची व्याप्ती वाढत असताना, या क्षेत्रातील तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी विभाग आणि पुणे येथील 'एजूस्फियर सिस्टिम्स' यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली ‘इलेक्ट्रॉनिक डिसाईन ऑटोमेशन टूल्सचा वापर करून सेमीकंडक्टर संकल्पना ते फ्रंट-एंड आणि बॅक-एंड इंडस्ट्री रेडी व्हिएलयसआय (VLSI) चिप डिझाइन’ ही तीन दिवसीय कार्यशाळा येथे नुकतीच संपन्न झाली.
प्राचार्य डॉ. आशिष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना चिप डिझाइनमधील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि उद्योगक्षेत्रातील गरजांशी अवगत करणे हा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने भारत सरकार देशात सेमीकंडक्टर क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यातील अभियंत्यांना या क्षेत्रातील मूलभूत संकल्पना, ऑपरेटिंग तत्त्वे आणि हार्डवेअर प्रोग्रामिंगचे सखोल ज्ञान मिळावे यासाठी हे हँड्स-ऑन प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरले.
या तीन दिवसांच्या कालावधीत सुमारे 120 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना मायक्रोविंड , डिव्हाईस स्केमॅटिक, स्पाइस आणि व्हिवाल्डो यांसारख्या अद्ययावत सॉफ्टवेअर्सचा वापर करून चिप डिझाइन आणि प्रोग्रामिंगचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. तसेच एफपीजिये (FPGA) आणि ऍसिक (ASIC) यांसारख्या जटिल प्रणाली कशा कार्य करतात, याचे प्रात्यक्षिक ज्ञानही त्यांना देण्यात आले.
विभागाचे प्रमुख डॉ. पी. आर. देशमुख यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचे नियोजन समन्वयक प्रा. विवेक राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी वृंदाने विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांचे आणि विभागाच्या उपक्रमाचे प्राचार्य डॉ. महल्ले यांनी कौतुक करून सर्वांचे अभिनंदन केले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक कौशल्येच मिळाली नाहीत, तर उद्योगांमध्ये थेट प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वासही प्राप्त झाला आहे.
000000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment