Friday, October 24, 2025

DIO NEWS AMRAVATI 24-10-2025

 अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ: मतदार नोंदणीसाठी 'फॉर्म 19'

सादर करण्याची अंतिम मुदत 6 नोव्हेंबरपर्यंत

अमरवती, दि. 24 (जिमाका): महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी पात्र असलेल्या पात्र मतदारांनी (फॉर्म 19) मधील अर्ज वेळेत सादर करावा. मतदार नोंदणी नियम, 1960 नुसार, मतदार नोंदणी अधिकारी यांनी आवाहन केले आहे की, ज्या व्यक्तींची नावे यापूर्वी मतदार यादीत समाविष्ट नाहीत, त्यांनी हा अर्ज दिनांक 06 नोव्हेंबर, 2025 (गुरुवार) पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. हा नमुना 19 अर्ज मतदार नोंदणी नियम, 1960 मधील दुसऱ्या अनुसूचीमध्ये उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी व तपशीलासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे www.ceo.maharashtra.gov.in तसेच विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांचे संकेतस्थळ www.amravatidivision.gov.in यावर संपर्क साधावा.  सर्व पात्र शिक्षकांनी या अंतिम मुदतीची नोंद घेऊन आपली मतदार नोंदणी वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

000000

महादेवा फुटबॉल योजना: लिओनेल मेस्सीसोबत खेळण्याची संधी

 अमरावती, दि. 24 (जिमाका): महाराष्ट्र शासन, क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्फॉर्मेशन, सिडको आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात फुटबॉल खेळाचा विकास, प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने महादेवा ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील युवा खेळाडूंना फुटबॉलमध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेचा भाग म्हणून राज्यातील 13 वर्षांखालील मुले, मुलींसाठी (जन्मतारीख दि. 01.01.2012 ते 31.12.2013) जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर फुटबॉल निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या निवडचाचणीतून निवड होणाऱ्या खेळाडूंना 14 डिसेंबर 2025 रोजी मुंबई येथे जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्यासोबत खेळण्याची संधी मिळणार आहे. तरी सदर निवड चाचणीस्थळी येण्यापूर्वी यासोबत जोडलेल्या गुगल

 लिंकद्वारे (https://forms.gle/ctCMRZ4FZDxwYEvA7) नोंदणी करावी. आपल्या शाळा, संस्थेतील जास्तीत जास्त फुटबॉल खेळाडूंना सहभागी होण्यास प्रोत्साहित करून फुटबॉल या खेळात करिअर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. अंतिम निवड झालेल्या खेळाडूंना राज्यशासनातर्फे प्रोत्साहन म्हणून 5 वर्ष स्कॉलरशिप, निवासी प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्हास्तर निवड चाचणी स्थळ हे पोलिस ग्राउंड, पोलिस पेट्रोल पंप मागे, अमरावती आहे.  चाचणी दिनांक दि. 29 ऑक्टोबर 2025, सकाळी 9.30 वाजता राहील. आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड व जन्माचा दाखला सोबत आणावा. अधिक माहितीसाठी अमरावती जिल्हा फुटबॉल संघटना सचिव सुशिल सुर्वे (मो. 7875652527) यावर संपर्क साधावा,. जास्तीत -जास्त खेळाडूंनी उपस्थित राहण्याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी आवाहन केले आहे.

000000






ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधी शिबिर संपन्न

विविध बँकांच्या 148 खातेदारांचे 3.52 कोटी रुपयांचे खाते पुर्नजीवित

अमरावती, दि. 24 (जिमाका) : ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधी अंतर्गत मिळाली नसलेल्या आर्थिक मालमत्तांच्या निकालीकरणासाठी आज जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता फंड या शिबिराचे आयोजन जिल्हाची अग्रणी बँक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने अभिनंदन को ऑपरेटिव बँकेच्या सभागृहामध्ये करण्यात आले. या शिबिरामध्ये विविध बँकांच्या 148 खातेदारांचे 3.52 कोटी रुपयांचे खाते पुर्नजीवित (ॲक्टिवेट) केले गेले.

 अभिनंदन बँकेचे अध्यक्ष विजय बोथरा, रिजर्व बँकेचे सहायक महाप्रबंधक विनोद कुमार के., अभिनंदन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी देठे, अभिनंदन बँकेचे व्यवस्थापकीय अध्यक्ष सुदर्शन गांग,  सेंन्ट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक सुनील पांडेय,  स्टेट बँकेचे नवीन उप्प्‍लवार, अग्रणी बँक जिल्हा व्यवस्थापक नरेश हेडाऊ यावेळी उपस्थित होते.

 या उपक्रमामुळे खातेदारांना त्यांच्या हक्काच्या ठेवी परत मिळवण्याची संधी मिळत आहे. 10 वर्षांहून अधिक काळ ज्या ठेवींवर दावा केलेला नाही, अशा ठेवी 'ठेवीदार शिक्षण व जागरूकता निधी'मध्ये हस्तांतरित करण्यात येतात. खातेदारांना त्या परत मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे. याबाबत जनजागृती व्हावी यासाठी या शिबिराच्या आयोजन करण्यात आले.

 शिबिरात खातेदारांच्या दावा न केलेल्या ठेवींचे निराकरण करणे तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासंबंधी मार्गदर्शन  शिबिरात करण्यात आले. वित्तीय सेवा विभाग आणि राज्यस्तरीय बँकर्स समिती यांच्या निर्देशानुसार हे शिबिर घेण्यात आले.

ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधी अंतर्गत  नामनिर्देशित, लाभार्थी या शिबिरास उपस्थित होते. शिबिराचे प्रास्ताविक सेन्ट्रल बैंक ऑफ इंडिया क्षेत्रीय प्रबंधक सुनील पांडेय यांनी केले. संचालन नरेश हेडाऊ जिल्हा व्यवस्थापक अग्रणी बँक यांनी तर लीड बँकेचे रोहन पोंक्षे यांनी केले.

 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 12-11-2025

                                                         'अमृत दुर्गोत्सव 2025'ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान! शिवछत्रपतींना दिली ...