जिल्हाधिकारी कार्यालयात दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त भ्रष्टाचार निर्मूलन प्रतिज्ञा
अमरावती, दि. 27 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी अधिकारी, कर्मचारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा दिली.
यावेळी उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, ज्ञानेश्वर घ्यार, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, अधिक्षक निलेश खटके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. देशाच्या आर्थिक, सामाजिक तथा राजकीय प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा एक मोठा अडथळा असून सर्व कामे प्रामाणिकपणे करण्याची प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांनी घेतली.
00000
लेख –
“आयोडीन न्युनता विकार ही एक सामाजिक समस्या”
आधुनिक आणि धकाधकीच्या जीवनात काही आजाराचे प्रमाण बरेच अंशी वाढलेले आहे. अशाच आजारापैकी गलगंड हा एक आजार आहे. आयोडीन न्युनतेमुळे मानवाला सर्वसाधारण किंवा अतिशय गंभीर असे शारीरिक व मानसिक आजार होऊ शकतात. सहजासहजी दिसणारा आणि ओळखता येणारा गलगंड हे आयोडीन न्युनतेचे एक लक्षण आहे. आहारात आयोडीन न्युनता असणाऱ्या स्त्रियांमध्ये वारंवार गर्भपात व उपजत मृत्यु होतात. हायपोथॉयरडीझम मेंदुची वाढ खुंटणे बुध्द्यांक कमी होणे व बाल जिवित्वात घट असे दुष्परिणाम आय आयोडीनच्या कमतरतेमुळे होण्याची शक्यता असते.
गर्भवती स्त्रियांमध्ये जर गर्भपणात आयोडीनची कमतरता असेल तर गर्भाला पण आयोडीन कमतरता भासते आणि त्यांचे दुष्परिणाम थॉयरॉक्झिनच्या निर्मितीवर होतात. थॉयरॉक्झिनची निर्मिती योग्यरित्या न झाल्याने गर्भाची बौध्दिक व शारीरिक वाढ ही कायम स्वरुपाची व भविष्यात बौध्दिक विकासाला आळ घालणारी ठरु शकते.
सर्वेक्षणात असे सिध्द झाले की, आयोडीनच्या कमतरतेमुळे सर्व शाळांमधील मुलांचा बुध्द्यांक हा १० ते १५ गुणानी कमी असतो.
आयोडीनच्या न्युनतेमुळे होणारे विकार :-
जीवनातील टप्पे व त्यावर होणारे परिणाम
गर्भ :- गर्भपात उपजत मृत्यु जन्मजात दोष. प्रसूती पश्चात बालमृत्यु मध्ये वाढ, अर्भक मृत्यु मधील वाढ.
मज्जासंस्थेतील होणारे विकार, मतीमंदापणा, मानसिक पंगूत्व, ग्रंथीदोषामुळे येणारा मतीमंदापणा, खुंटकेपणा, खुजेपणा, मानसिक व शारीरिक दोष.
नवजात :- नवजात गलगंड, नवजात हायपोथायराडीझम गलगंड
बालक :- बाल्यवस्थेतील हायपोथैयराडीझम
प्रौढ :- मानसिक दुर्बलता, शारीरिक वाढ खुंटणे
तरुण : गलगंड व हायोथॉयरडीझम मानसिक दुर्बलता.
बालकांना मतिमंदत्व का येते ?
आईच्या गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाला त्याच्या मेंदुच्या व शरीराच्या सर्वसाधारण वाढीसाठी आणि विकासासाठी योग्य प्रमाणात नियमित आयोडीनचा पुरवठा आवश्यक असतो. बाळाला फक्त आईच आवश्यक आयोडीनचा पुरवठा करु शकते. जर आईच्या शरीरामध्ये आयोडीनची कमतरता असेल तर गर्भाला सुध्दा आयोडीनचा पुरवठा होऊ शकत नाही. जर आईच्या शरीरात आयोडीनची कमतरता जास्त प्रमाणात असेल तर बाळाची शारीरिक व बौध्दिक वाढ कायमस्वरुपाची खुंटते आणि बाळ मतिमंद होतो. तसेच इतरांप्रमाणे बोलु चालु व विचार करु शकत नाही जर आईच्या शरीरातील आयोडीनची कमतरता सौम्य प्रमाणात असेल तर त्याचा परिणाम बाळावर होतो. आईच्या शरीरतील आयोडीन कमतरतेचा परिणाम बाळाच्या भावी आयुष्यात दिसुन येतो.
भविष्यामध्ये अशा समस्या टाळता याव्यात म्हणुन प्रत्येकांने जेवनात आयोडीनयुक्त मिठाचा वापर करावा. आयोडीनयुक्त मिठ हे साधेच मिठ असते. ज्यामध्ये आयोडीन हे संयुगाच्या स्वरुपात योग्य प्रमाणात मिसळलेले असते. आयोडीनयुक्त मिठ हे दिसायाला, चवीला आणि वासाला नेहमीच्या साध्या मिठा प्रमाणेच असते. ते आपण आपल्या रोजच्या जेवणात नेहमी प्रमाणे वापरु शकतो. हे मिठ अन्न शिजवतांना तसेच खाण्यासाठी सुध्दा वापरु शकतो.
साधारणतः जवळपास १५० मायक्रोग्रॅम एवढे मिठ रोज आहारात वापरले जाते. जर १५ पी.पी. एम.एवढे आयोडीनचे प्रमाण उपलब्ध असलेले आयोडीनयुक्त मीठ तयार करुन बाजारात उपलब्ध करुन दिले जात आहे.
आयोडीनयुक्त मिठातील आयोडीन हे हवेतील उष्णता व दमटपणा यामुळे निघुन जाते म्हणून घसरगुती वापराकरिता वापरले जाणारे आयोडीनयुक्त मीठ हे उष्णतेपासुन लांब, हवाबंद आणि आर्द्रता विरहित बरणीमध्ये साठवून ठेवावे.
वाहतुकदार, घाऊक विक्रेते आणि किराकोळ विक्रेत्यांनी सुध्दा आयोडीनयुक्त मीठ वाहतुक करताना आणि साठवून ठेवताना त्याचा बाहेरिल वातावरणाशी (जसे सुर्यप्रकाश आणि पाऊस) संपर्क येऊन त्यातील आयोडीन निघुन जाणार नाही याची काळजी घ्यावयास हवी. आयोडीनयुक्त मिठ हे रोजच्या वापरात खुपच कमी लागते. हे लक्षात घेता आयोडीन न्युनता विकार यापासुन बचाव हा मोठा फायदा होण्यासाठी कुटुंबाला खुपच कमी किंमत मोजावी लागते. आधी नमुद केल्याप्रमाणे भविष्यात माता आणि मुले यांच्यावर कोणतेही दूरगामी परिणाम होऊ नयेत म्हणुन समाजातील प्रत्येक कुटुंबात आयोडीनयुक्त मिठाचाच वापर करावा.
डॉ. ज्योत्सना पोटपिटे
प्राचार्य
आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र,
अमरावती

No comments:
Post a Comment