सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांचे आगमन
अमरावती, दि. 29 (जिमाका) : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांचे आज अमरावती येथील बेलोरा विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी खासदार बळवंत वानखेडे, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, उपविभागीय अधिकारी श्रद्धा उदावंत आदी उपस्थित होते.
00000
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा
अमरावती, दि. 29 (जिमाका): उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गुरुवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचा दौरा आहे.
दौऱ्यानुसार, सकाळी 7.45 वाजता बेलोरा विमानतळ, अमरावती येथे आगमन होईल. त्यानंतर ते यवतमाळकडे हेलिकॉप्टरने प्रयाण करतील. यवतमाळ येथून निघून दुपारी 2.25 वाजता बेलोरा विमानतळ, अमरावती येथे हेलिकॉप्टरने आगमन होईल. त्यानंतर दुपारी 3 वाजता दिवंगत नेते रा. सू. (दादासाहेब) गवई स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतील. कार्यक्रमानंतर सायंकाळी 4.45 वाजता बेलोरा विमानतळ येथून विमानाने नांदेडकडे प्रयाण करतील.
00000
राष्ट्रीय उपशामक काळजी जनजागृती मोहिमेंतर्गत वृद्धांसाठी आरोग्य शिबिर संपन्न
अमरावती, दि. 29 (जिमाका): राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 'उपशामक काळजी' ( पॅलिएटीव्ह केअर कार्यक्रम ) राबविला जातो. उपशामक काळजी कार्यक्रमांमध्ये दुर्धर आजारांनी त्रस्त रुग्णांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना शारीरिक मानसिक तसेच सामाजिक आधार दिला जातो.पॅलिएटिव्ह केअर ही रुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यावर आणि सन्मानाने जगण्यावर लक्ष केंद्रित करते. जागतिक उपशामक काळजी दिवसाच्या (11 ऑक्टोबर) निमित्ताने, नुकतेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली 'मधुबन वृद्धाश्रम', कोंडेश्वर रोड येथे वयोवृद्ध नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात पॅलिएटीव्ह केअर वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली. परिचारिका पल्लवी जाधव व पल्लवी बोरकर यांनी तपासणीसाठी सहकार्य केले. श्रीमती पायल ठाकूर यांनी आरोग्य मार्गदर्शन तसेच शिबिराचे आयोजन केले. रुग्णांना आवश्यकतेनुसार औषधींचे यावेळी वितरणही करण्यात आले. ही सेवा ओ.पी.डी., आय.पी.डी. आणि गृहभेटी दरम्यान पुरविली जाते. जिल्हा सामान्य रुग्णालयात नियमित पॅलिएटीव्ह केअर ओ.पी.डी. सुरु आहे.
000000
शहरात कलम 37 (1) व (3) लागू
अमरावती, दि. 29 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून आजपासून ते 12 नोव्हेंबर 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर) अरविंद चावरिया यांनी कळविले आहे.
00000
सैनिक कल्याण विभागातील सरळसेवेमार्फत
लिपिक टंकलेखक (गट-क) पदांची भरती
अमरावती, दि. 29 (जिमाका):सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट- क) एकूण 72 पदांसाठी फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. वरील पदांपैकी 1 पद हे अपंग संवर्गातून किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता, उपलब्धतेनुसार भरण्यात येईल.
सदर भरती प्रक्रिया टिसीएस-आयओएन यांच्या मार्फत होणार आहे. प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवारांना वेब-बेस्ड (Web-based) ऑनलाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.
00000
राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांची कागदपत्रे डिजी लॉकर प्रणालीत उपलब्ध
अमरावती, दि. 29 (जिमाका): महाराष्ट्र शासन, वित्त विभाग संचालनालय, लेखा व कोषागारे यांच्या वतीने सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना e-PPO, e-GPO, e-CPO DigiLocker प्रणालीत उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व संबधित निवृत्तीवेतन धारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. आपली निवृत्तीवेतन विषयक कागदपत्रे डिजी लॉकर (DigiLocker) प्रणालीत जतन करून ठेवावी. अधिक माहितीसाठी सहसंचालक लेखा व कोषागारे अमरावती विभाग अमरावती यांच्या https://jdatamt.blogspot.com या ब्लॉगस्पॉटला भेट द्यावी, असे आवाहन निवृत्ती वेतन कोषागार अधिकारी अमोल इखे यांनी केले आहे.
0000
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा
अमरावती, दि. 29(जिमाका) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुरुवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचा दौरा आहे.
दौऱ्यानुसार, गुरूवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.30 वाजता बेलोरा विमानतळ, अमरावती येथे आगमन होईल. त्यानंतर ते दुपारी 3 वाजता दिवंगत नेते रा. सू. (दादासाहेब) गवई स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतील. कार्यक्रमानंतर सायंकाळी 5.30 वाजता बेलोरा विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
00000
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा
अमरावती, दि. 29 (जिमाका): पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा गुरुवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचा दौरा आहे.
दौऱ्यानुसार, गुरूवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 वाजता सांस्कृतिक भवन येथील अभिनंदन अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड, अमरावतीच्या अभिनंदन हाईट्स मुख्य कार्यालय इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता दिवंगत नेते रा. सू. (दादासाहेब) गवई स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतील. कार्यक्रमानंतर सायंकाळी 4.30 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.
00000
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौराअमरावती, दि. 29 (जिमाका): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गुरुवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचा दौरा आहे.
दौऱ्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुरूवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.40 वाजता अमरावती विमानतळ येथे आगमन होईल. दुपारी 1.30 वाजता कॅम्प रोड येथील अभिनंदन अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड, अमरावतीच्या मुख्य कार्यालय नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 1.50 वाजता सांस्कृतिक भवन येथील अभिनंदन अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड, अमरावतीच्या मुख्य कार्यालय नूतन इमारतीचे लोकार्पण सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 3 वाजता अमरावती-मार्डी रस्ता येथील दिवंगत नेते रा. सू. (दादासाहेब) गवई स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतील. कार्यक्रमानंतर सायंकाळी 4.55 वाजता अमरावती विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
00000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

No comments:
Post a Comment