Monday, July 27, 2026

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ मध्ये शेतकरी कर्जमुक्ती संदर्भात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची मुलाखत..


 ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ मध्ये शेतकरी कर्जमुक्ती संदर्भात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची मुलाखत

राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांच्या आशा-आकांक्षांना नवी उमेद देणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ या महत्त्वपूर्ण निर्णयाविषयी सविस्तर माहिती देणारी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या लोकप्रिय कार्यक्रमांमधून प्रसारित होणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत दि. २७ व २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून; तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमामध्ये ही विशेष मुलाखत मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे; तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत उपलब्ध होईल. या मुलाखतीचे निवेदन डॉ.मृण्मयी भजक यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती आणि १२ उपाययोजनांद्वारे दिलासा. आव्हानाच्या काळात शासन आपल्या सोबत! #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare

  राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती आणि १२ उपाययोजनांद्वारे दिलासा. आव्हानाच्या काळात शासन आपल्या सोबत! #दुष्काळ #शेतक...