पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा
अमरावती, दि. 6 (जिमाका) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शनिवार, दि. 7 मार्च रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यात श्री. बावनकुळे हे सायन्सकोर मैदान येथे दुपारी 1.30 वाजता जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय एकल महिला महासंमेलन आणि वैदर्भी जिल्हास्तरीय प्रदर्शनाला भेट देतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता सांस्कृतिक भवन येथे अमरावती महानगरपालिका आणि एमएआयडीसी यांच्यातील सामंजस्य कराराप्रसंगी उपस्थित राहून त्यानंतर दुपारी 4 वाजता महिला मेळाव्यास मार्गदर्शन करतील. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव राहिल. सायंकाळी 6 वाजता मोर्शी येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता मोर्शी येथे दत्तापाटील गेडाम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील.
00000
कौशल्य विकास केंद्राचा आज रोजगार मेळावा
अमरावती, दि. 06 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे शनिवार, दि. 7 मार्च 2026 रोजी आयोजन करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर सभागृह, मोर्शी रोड, अमरावती येथे हा मेळावा आयोजित काण्यात आला आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटरतर्फे या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येतो. मेळाव्यात विविध आस्थापना, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.
मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या
0000000
प्रलंबित टपाल तक्रारींसाठी आज 'डाक अदालत'चे आयोजन
अमरावती, दि. 06 (जिमाका): भारतीय डाक खात्याच्या वतीने अमरावती विभागातील ग्राहकांच्या प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यासाठी उद्या, शनिवार, दिनांक 7 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयात 'डाक अदालत' आयोजित करण्यात आली आहे. टपाल सेवा हा जनजीवनाचा अविभाज्य भाग असून, सेवा पुरवताना येणाऱ्या त्रुटी किंवा संवादाच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या तक्रारींचे प्रभावीपणे निराकरण करणे हा या अदालतीचा मुख्य उद्देश आहे.
या डाक अदालतीमध्ये प्रामुख्याने स्पीड पोस्ट, नोंदणीकृत पार्सल, काऊंटर सेवा, बचत बँक खाते आणि मनीऑर्डर यांसारख्या सेवांशी संबंधित तक्रारी विचारात घेतल्या जातील. विशेषतः अशा तक्रारी, ज्यांचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झाले नसेल किंवा ज्यांना विभागाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा प्रकरणांची दखल येथे घेतली जाणार आहे.
तक्रारदारांनी आपला अर्ज सादर करताना त्यामध्ये मूळ तक्रार केल्याची तारीख, संबंधित अधिकाऱ्याचे नाव व पद, आणि तक्रारीचा संपूर्ण तपशील नमूद करणे आवश्यक आहे. हे अर्ज 'प्रवर अधीक्षक डाकघर, अमरावती विभाग, अमरावती - 444602' यांच्या नावे पाठवावेत. सर्व संबंधित अर्ज 7 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी कार्यालयात पोहोचणे अनिवार्य आहे; त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.
0000000

No comments:
Post a Comment