जनगणनेसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षणाला सुरवात
जनगणनेचे काम गांभीर्यपूर्वक करावे – जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 16 (जिमाका): संपूर्ण देशात जनगणनेला सुरवात करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळाला प्रशिक्षण देण्यात येत आहे. देशाचे खरे चित्र या जनगणनेतून समोर येणार असल्याने यात सहभागी सर्वांनी जनगणनेचे काम गांभीर्यपूर्वक करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.
जनगणना 2027च्या अनुषंगाने आजपासून नियोजन भवनात तीन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात येत आहे. या प्रशिक्षण वर्गाचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त सौम्या शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, महापालिका उपायुक्त योगेश पिठे, सहआयुक्त विकास खंडारे, जिल्हा सूचना अधिकारी मनिषकुमार, तसेच मार्गदर्शक म्हणून जनगणना संचालनालाचे सहायक व्यवस्थापक प्रविण भगत, ऋषीकेश पाथरे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, भारतातील जनगणनेला समृद्ध वारसा आहे. या जनगणनेमधून आलेल्या निष्कर्षावर निती आयोग काम करीत असते. यातून येणाऱ्या बाबींतून देशाचे प्रतिबिंब उमटत असते. जनगणनेला आकडेवारीचा आधार असल्याने ती तथ्यांवर खरी उतरणारी असते. यावेळी पहिल्यांदाच ॲपवर ही जनगणना होणार आहे. त्यामुळे बदलांची नोंद घेऊन कार्य करावे लागणार आहे. ही जनगणना कायद्याच्या आधारे होत असल्याने काम करणे बंधनकारक असून नागरिकांना माहिती द्यावी लागणार आहे. यावेळी जातनिहाय जनगणना होणार असून यात काळजीपूर्वक नोंदी घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
श्रीमती शर्मा यांनी यावर्षीची जनगणना ही 16 वर्षानंतर होत आहे. यातून निर्माण होणारा डाटा हा देशाच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. जनगणनेच्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रातील घरभेटीचे नियोजन करण्यात आले आहे, त्यामुळे जनगणनेच्या कामात अडचण निर्माण होणार नसल्याचे सांगितले.
कार्यक्रमासाठी जणगणना कक्षाच्या राधिका देशमुख आणि भावना जिचकार यांनी सहकार्य केले. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी सूत्रसंचालन केले. महापालिकेचे सहायक आयुक्त भूषण पुसदकर यांनी आभार मानले.
000000
ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा
अमरावती, दि. 16 (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे बुधवार, दि. 18 मार्च रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
दौऱ्यानुसार, बुधवार, दि. 18 मार्च रोजी दुपारी 12 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयातील मिशनच्या कार्यालयात उपस्थित राहतील त्यानंतर दुपारी 4 वाजता चांदूर रेल्वे येथील
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतील. सोईनुसार काटोलकडे प्रयाण करतील.
0000000
कौशल्य विकास केंद्राचा धारणी येथे रोजगार मेळावा
येत्या शुक्रवारी
अमरावती, दि. 16 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे शुक्रवार, दि. 20 मार्च 2026 रोजी आयोजन करण्यात आले आहे. व्हिजन एज्युकेशन अकादमी, जयस्तंभ चौक, रंगभवन, मातोश्री इंदिरा महाविद्यालय, धारणी येथे हा मेळावा होणार आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटरतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येतो. मेळाव्यात योजनेसाठी विविध आस्थापना, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.
मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या
0000000
चिखलदरा येथे कौशल्य विकास केंद्राचा रोजगार मेळावा
येत्या सोमवारी
अमरावती, दि. 16 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या’चे आयोजन सोमवार, दि. 23 मार्च 2026 रोजी सिपना महाविद्यालय, चिखलदरा, ता. चिखलदरा जि. अमरावती येथे करण्यात आले आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटरतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येतो. मेळाव्यात योजनेसाठी विविध आस्थापना, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.
मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या
0000000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment