Sunday, November 22, 2026

एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे उद्भवणारी #पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्यात जलसंधारणाची कामे वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे उद्भवणारी #पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्यात जलसंधारणाची कामे वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३० जून २०२७ पर्यंत जास्तीत जास्त गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, मृद व जलसंधारण, कृषी, ग्रामविकास, महसूल आदी विभागांच्या समन्वयातून ही कामे राबविण्यात येणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली. राज्यात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, साठवण तलाव, सिमेंट नाला बांध, पाझर तलाव तसेच गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार यांसारखी जलसंधारणाची कामे सुरू आहेत. ग्रामीण भागात शेतकऱ्यांशी थेट संपर्क असलेल्या कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे या कामांचा विस्तार आणि गती वाढणार आहे. हा निर्णय विभागांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास नसून, सामूहिक जबाबदारीतून उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी घेतलेला आहे, असे मंत्री राठोड यांनी स्पष्ट केले. जलसंधारणाच्या कामांमध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकता राखण्यासाठी #जलदर्पण पोर्टल, एमएच-युआयडी (MH-UID) आणि जिओ-टॅगिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना या प्रणालींच्या वापराबाबत तसेच कामांच्या तांत्रिक प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य देण्यात येईल. पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या संभाव्य संकटावर मात करून राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले.


 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 22.11.2026

                                                पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा   अमरावती, दि. 22 (जिमाका): पालकमंत्री चंद्रशेखर बा...