अमरावती जिल्ह्यात मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज 'ड्राय डे'; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
अमरावती, दि. 17 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या विधान परिषदेची द्विवार्षिक निवडणूक घोषित केली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आदेश जारी केले असून, त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात 'कोरडा दिवस' पाळण्यात येणार आहे.या आदेशानुसार, उद्या गुरुवार, 18 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत म्हणजेच मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अमरावती जिल्ह्यातील सर्व ठोक आणि किरकोळ मद्यविक्रीची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पूर्वी जारी करण्यात आलेल्या आदेशांमध्ये अंशतः बदल करून प्रशासनाने हा सुधारित निर्णय घेतला आहे. संबंधित सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी या आदेशाची काटेकोरपणे नोंद घ्यावी, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या शासकीय आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या किंवा अंमलबजावणीत कुचराई करणाऱ्या मद्यविक्रेत्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्यांवर 'महाराष्ट्र दारूबंदी कायद्या’न्वये कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.
000000
नशा मुक्त सप्ताहाला आजपासून सुरवात; ऑनलाईन शपथ घेण्याचे आवाहन
अमरावती, दि. 17 (जिमाका): देशातील अमली पदार्थांची मागणी कमी करण्यासाठी भारत सरकारचे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय नोडल विभाग म्हणून काम पाहत आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यात 'नशा मुक्त भारत अभियाना’ला आज 17 जूनपासून सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, आगामी 26 जून रोजी साजरा होणाऱ्या 'आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिना'चे औचित्य साधून जिल्ह्यात ‘नशा मुक्त भारत अभियान, विकसित भारत की पहचान’ या संकल्पनेवर आधारित विशेष 'नशा मुक्त सप्ताह' आयोजित करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे, व्यसनमुक्ती केंद्रे, प्रतिष्ठित नागरिक आणि सर्वसामान्य जनतेला या मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत नागरिकांनी अमली पदार्थ मुक्तीचा संकल्प करावा आणि केंद्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://nmba.dosje.gov.in/
00000000
No comments:
Post a Comment