राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा दौरा
अमरावती, दि. 24 (जिमाका): राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या दि. 3 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
दौऱ्यानुसार, श्रीमती रहाटकर दि. 3 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अमरावती विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेतील. दुपारी 12.30 वाजता अमरावती परिक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील. दुपारी 2.30 वाजता 'महिला जन सुनावणी'चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पॉश प्रशिक्षण आणि 'शी सर्व्हज' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींशी संवाद साधून चर्चा करण्यात येणार आहे.
0000000
आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक दिन साजरा
अमरावती, दि. 24 (जिमाका): महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय ऑलम्पिक दिन मंगळवार, दि. 23 जून रोजी जिल्हा क्रीडा संकुलात साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, तालुका क्रीडा अधिकारी अनिल इंगळे, क्रीडा अधिकारी प्रशिक्षण ममता कोळमकर, क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने उपस्थित होते.
यावेळी श्री. जाधव यांनी खेळाडुंना ऑलम्पिक संघटनेची माहिती दिली. दि. 23 जून रोजी आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक दिन साजरा करण्याबाबतचे महत्त्व आणि इतिहासावर प्रकाश टाकला. खेळाडुंना क्रीडा व एकतेच्या माध्यमातून जगभरात एकता, मैत्री आणि शांतता वाढविण्याच्या उद्देशाने हा दिवस क्रीडा शक्तीला समर्पित केला जात असल्याचे सांगितले.
यावेळी मान्यवरांनी आर्चरी, तायक्वाँदो, खो-खो, टेबल टेनिसमधील गुणवंत खेळाडुंचा सत्कार केला. यावेळी ऑलम्पिक दिनाबाबत चित्रफित दाखविण्यात आली. खेलो इंडीया, अमरावती आर्चरी केंद्राची खेळाडू कुमकूम मोहोड हिने अंटलिया आंतरराष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक प्राप्त करून दिल्याची कामगिरी चित्रफितीद्वारे दाखविण्यात आली.
स्वप्नील चांदेकर यांनी सूत्रसंचालन केले. तालुका क्रीडा अधिकारी शेख सलीम शेख हुसेन यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयातील आर. बी. वडते, त्रिवेणी चौधरी, वैशाली इंगळे, धनंजय भारसाकळे, शिपाई प्रणिती भिमटे, शेख अकील, शुभम मोहतुरे, अमोल लांडे, राजपाल इंगळे, सागर बोरकर, वैभव पातुर्डे यांनी पुढाकार घेतला.
0000000000
रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
अमरावती, दि. 24 (जिमाका) : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात रविवार, दि. 28 जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण राबविण्यात येणार आहे. यात पाच वर्षापर्यंतच्या बालकांचे लसीकरण करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
ही मोहिम शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओपासून सुरक्षित करण्यासाठी राबविण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने जिल्ह्यातील ग्रामीण आणि नागरी भागातील 1 लाख 45 हजार 540 बालकांना पोलिओची लस देण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. यासाठी जिल्ह्यात 1 हजार 998 बुथ लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. बुथवर लसीकरण केल्यानंतर ग्रामीण भागात तीन दिवस आणि शहरी भागात पाच दिवस घरोघरी जाऊन घरभेटीद्वारे लसीकरण केले जाणार आहे.
या मोहिमेत पालकांनी शून्य ते पाच वर्षे वयोगटातील मुलांना केंद्रावर नेऊन पोलिओची डोज द्यावा, असे आवाहन जिल्हा आरोगय अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांनी केले आहे.
00000000
वसंतराव नाईक महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
अमरावती, दि. 24 (जिमाका) : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग विकास महामंडळांतर्गत विविध महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी पात्र व्यक्तींनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
यात राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (रामोशी समाज), पैलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ (वडार समाज), श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ (गवळी समाज), ब्रम्हलिन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (लोहार समाज, विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ (विणकर समाज), श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ (नाथपंथी, नाथपंथी, डवरी, गोसावी, भराडी जोगी, किंगरीवाले, मरीआईवाले, बहुरुपी. गोसावी, स्मशान जोगी, बाळसंतोषी किंगरीवाले, गोंधळी, डोंबारी, चित्रकथी समाज) या महामंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे. यात वैयक्तिक व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, 25 टक्के वीज भांडवल कर्ज योजना, 1 लाख रुपयांचे थेट कर्ज योजना संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. या योजनांसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता पात्र व्यक्तींकडून ऑनलाईन योजनेअंतर्गत vnvjntdc.org या वेबसाईटवर अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज करण्याकरीता शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधारकार्ड, महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी दाखला, पॅनकार्ड, व्यवसाय परवाना, व्यवसायाचे दरपत्रक, वाहनासंदर्भात लायसन्स परवाना कागदपत्रे आवश्यक आहे.
योजनांबाबत अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळमजला, ए-विंग, पोलीस आयुक्तालयामागे, अमरावती दुरध्वनी क्र. 0721- 2551191 येथे संपर्क करावा, तसेच महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट vnvjntdc.org ला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आधार ताजणे यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment