Posts

Showing posts from April, 2017
Image
  पालकमंत्री प्रविण पोटे यांच्या हस्ते  आठ कोटीच्या कामाचे भुमीपुजन              अमरावती, दि.23 (जिमाका)  अमरावती कॅम्प शार्ट रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाचे भुमीपुजन आज पालकमंत्री प्रविण पोटे यांच्या हस्ते झाले.यावेळी खासदार आनंदराव अडसुळ,आमदार  डॉ.सुनिल देशमुख,आमदार ॲड.यशोमती ठाकूर उपस्थित  होते. अमरावती कॅम्प शार्ट रस्त्याच्या चौपदरीकरणा होणार असुन  विदर्भ महाविद्यालय ते चांगापुर फाटा या दरम्यानच्या कामासाठी अंदाजीत रक्कम 8 कोटी खर्च होणार आहेत. यामुळे  या रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरीकांची सुविधा होणार आहे. यावेळी पालकमंत्र्याच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 00000
Image
मोजणीसाठी भुमीअभिलेख कार्यालयाला तीन मशीन देणार         भुमीअभिलेख कार्यालयाने तालुकास्तरावर शिबीर आयोजित करावे                                                     पालकमंत्री प्रविण पोटे अमरावती, दि.16 –जिल्ह्यात सध्या भुमापनासाठी तीन मशीन उपलब्ध आहेत व मोजणीचे प्रकरणांची संख्या मोठी आहे. यामुळे जमीन मोजणी लवकर होण्यासाठी जिल्हा नियोजन समीतीमधुन तीन मशीन भुमीअधीक्षक कार्यालयाला देण्याचे निर्देश पालकमंत्री प्रविण पोटे पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिले. महाराजस्व अभियानाच्या धर्तीवर तालुकास्तरावर शिबीरांचे आयोजन 18 ते 20 मे दरम्यान करण्याबाबत ही त्यांनी स्पष्ट निर्देश दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेसी, लाचलुचपत प्रतीबंधकचे अधिक्षक महेश चिमटे,भुमीअभिलेख उपअधीक्षक मंगेश पाटील व संबंधीत अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागातील भुमी अभिलेख कार्यालयाशी  प्रलंबित संबधित प्रकरणांची संख्या वाढत आहे. या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी  उपलब्ध तीन मशीनवर कार्यभार  वाढलेला होता असे चर्चेअंती लक्षात येताच बैठकीत  त्यांनी जिल्हाधिकाऱ्य
Image
रासायनिक खतविक्री करीता थेट लाभ हस्तांतरण जून महीन्यापासुन होणार सुरूवात * खरीप हंगाम आढावा बैठक * 7 लक्ष 28 हजार हेक्टर एकुण खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र अमरावती, दि.15 – येत्या खरीप हंगामापासुन रासायनिक खतविक्रीकरीता  जिल्हयात थेट लाभ हस्तांतरण प्रकल्प येत्या 1 जुनपासुन राबविण्यात येणार आहे.आतापर्यत खतउत्पादक कंपन्यानी जेवढी खतनिर्मीती केली व विक्री केंद्राना खत वितरीत केले त्यानुसार कंपन्याना अनुदान देण्यात येत होते. मात्र आता या प्रकल्पाच्या माध्यमातुन खत खरेदी केले त्या आधारावरच खत उत्पादक कंपनीला अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे शासनाच्या निधीमध्ये मोठी बचत होणार आहे मात्र शेतकऱ्यांना खत खरेदी करतांना स्वतच्या आधार कार्डाचा वापर करणे आवश्यक आहे अशी माहिती पालकमंत्री प्रविण पोटे यांनी आज दिली. नियोजन भवन येथे आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते.या बैठकीला आमदार सर्वश्री विरेंद्र जगताप,रमेश बुदींले,डॉ.अनिल बोंडे ,जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेसी,विभागीय कृषी अधिकारी चव्हाळे,जिल्हा कृषी अधिक्षक दत्तात्रय मुळे ,आत्मा संचालक मिसाळ उपस्थित होते. यासाठी खरेदी