Posts

Showing posts from June, 2019

एकही जि. प. शाळा विनाशिक्षक नाही - मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री

Image
            अमरावती, दि. 27 : जिल्हा परिषदेची कोणताही शाळा विनाशिक्षक राहणार नाही, अशी व्यवस्था प्रशासनाकडून करण्याचे आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी स्पष्ट केले आहे.    शाळांमध्ये वीजपुरवठाही पूर्ववत करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.                    जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये वीज पुरवठा नसल्याने शैक्षणिक कार्यक्रमात व्यत्यय, तसेच शिक्षकांअभावी अडचणी येत असल्याच्या तक्रारी होत आहेत.    शाळाखोल्यांची स्थिती व वीजपुरवठा, थकित देयकांबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी    कार्यालयाकडून आढावा मार्च-एप्रिल या कालावधीत घेण्यात आला होता. त्यानंतर निवडणूक मतदान केंद्रांच्या उपयोगासाठी असलेल्या शाळा, तसेच थकित देयकाअभावी वीजपुरवठा खंडित झालेल्या शाळा यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. गट शिक्षणाधिकारी स्तरावरील उपलब्ध निधीमधून ही देयके देण्याबाबत निर्देशही देण्यात आले, असे श्रीमती खत्री यांनी नमूद केले आहे.              ज्या शाळेतून शिक्षकांच्या बदल्या झाल्या. तिथे शिक्षकांची पर्यायी व्यवस्था गट शिक्षणाधिका-यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे एकही शाळा व

समता दिंडीला शहरात मोठा प्रतिसाद

Image
अमरावती, दि. 26 : राजर्षी शाहू महाराज यांची जयंती अर्थात समतादिनानिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे काढण्यात आलेल्या समता दिंडीला आज शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इर्विन चौकापासून सकाळी आठच्या सुमारास या दिंडीला सुरुवात झाली. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इर्विन चौकातील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, श्रीमती वसुधाताई बोंडे यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून समता दिंडी मार्गस्थ झाली. दिंडीत विविध शाळा- महाविद्यालयांच्या सुमारे अडीचशे विद्यार्थी- विद्यार्थिनींचा सहभाग होता.   इर्विन चौक, दुर्गावती चौक, मालटेकडी चौक ते सामाजिक न्यायभवन असा दिंडीचा मार्ग होता.    सहायक समाजकल्याण आयुक्त मंगला मून, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रशांत थोरात, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप काळे यांच्यासह अनेक मान्यवर दिंडीत सहभागी झाले होते.

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
अमरावती,   दि.   26   : राजर्षी शाहू महाराज यां च्या   जयंतीनिमित्त अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात     त्यांच्या   प्रतिमे स   पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विधी अधिकारी नरेंद्र बोहरा    यांनी व विविध अधिकारी- कर्मचा-यांनी पुष्प अर्पण करून राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन केले. 00000
Image
सामाजिक न्याय दिनानिमित्त सामाजिक न्यायभवनात कार्यक्रम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या क्रांतिकारी कार्याने परिवर्तनाला गती -वित्त सहसंचालक उत्तमराव सोनकांबळे अमरावती, दि. 26 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे देशातील परिवर्तनाच्या चळवळीला गती मिळाली, असे प्रतिपादन वित्त व कोषागार सहसंचालक उत्तमराव सोनकांबळे यांनी आज येथे केले. राजर्षी शाहू महाराज यांची जयंती अर्थात सामाजिक न्याय दिनानिमित्त सामाजिक न्याय भवनात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे, वित्त व लेखा सहसंचालक डॉ. प्रकाश दासे, समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. दिलीप काळे, सहायक समाजकल्याण आयुक्त मंगला मून, प्रा. प्रवीण खांडवे आदी यावेळी उपस्थित होते. श्री. सोनकांबळे म्हणाले की, महापुरुषांचे कार्य पाठ्यपुस्तकातून नव्हे, तर समाजाच्या विद्यापीठातून चांगले कळते. शाहू, फुले, आंबेडकरांनी मोठ्या सामाजिक सुधारणांसाठी शिक्षणाच्या क्षेत्रात महत्वाचे कार्य केले. राजर्षी शाहू महाराज यांनी शिक

खरीप पीक कर्ज वितरणाचा लाभ अधिकाधिक शेतक-यांना द्यावा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
अमरावती, दि. 25 : मान्सून व पेरणीचा हंगाम लक्षात घेता खरीप पीक कर्ज वितरणाला गती देऊन कर्ज वितरणाचा लाभ अधिकाधिक शेतक-यांना मिळावा यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिले. जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी अग्रणी बँक व संबंधित यंत्रणेच्या अधिका-यांशी आज जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करून निर्देश दिले. ते म्हणाले की,  शेतक-यांना वेळेवर   पीक   कर्ज   वाटप करण्याबाबत यापूर्वीच वेळोवेळी निर्देश देण्यात आले आहेत.   पीक   कर्ज   वाटपाला प्राधान्य देऊन बँक अधिका-यांनी काम करावे. सर्वांनी संवेदनशीलपणे कामे करावीत. शेतकरी बांधवांना मेळाव्याच्या माध्यमातून आवश्यक कागदपत्रे व संपूर्ण माहिती द्यावी, असे जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी सांगितले.  शेतकरी बांधवांना माहिती मिळण्यासाठी मेळाव्याची सर्वदूर प्रसिद्धी करावी, असेही निर्देश त्यांनी दिले. बँकांनी   पीक   कर्जासाठी अनावश्यक कागदपत्रे मागू नयेत.  शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करणे हे बँकांचे महत्वाचे काम आहे .   त्यामुळे   बँकांनी  संवेदनशीलता बाळगून  शेतकऱ्यांपर्यंत पोहचून त्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन  द्

कृषी मंत्री यांचा जिल्ह्यात पहिला कार्यक्रम उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान योजनांचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नरत - कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे

Image
अमरावती, दि. 23 : शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यादृष्टीने शासन प्रयत्नरत असून कृषी प्रशासनानेही गतीने कार्य करावे, असे कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे सांगितले.                         कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानात तालुकास्तरीय शेतकरी व कृषी मित्र प्रशिक्षण कार्यक्रम वरुड तालुक्यातील मुसळखेडा येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. कृषी मंत्री पद मिळाल्यानंतर त्यांचा जिल्ह्यातील हा पहिलाच कार्यक्रम होता. संत योगीराज महाराज, वरुडच्या नगराध्यक्षा स्वाती आंडे,    श्रीमती वसुधाताई बोंडे, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी कुर्बान तडवी आदी उपस्थित होते.            ज्या मातीने मला पहिल्यांदा आमदार केले, तिचे पहिल्यांदा दर्शन घेणार हे ठरवले होते. त्यामुळे इथे पहिला कार्यक्रम घेतला, असे सांगून डॉ. बोंडे म्हणाले की, कृषी मंत्री पदाच्या रूपाने मोठी जबाबदारी मिळाली आहे. सध्या महाराष्ट्र दुष्काळाच्या परिस

जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक आजारी उद्योगांच्या पुनर्वसनासाठी सर्वंकष प्रयत्न करावे - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
अमरावती, दि. 25 : औद्योगिक वसाहतीतीतल आजारी व बंद उद्योगांच्या पुनवर्सनासाठी सर्वंकष प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संजय बांगर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राहूल बनसोड, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक एल. के. झा यांच्यासह मनपा प्रशासन व विद्युत विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. श्री. नवाल म्हणाले की, लघुउद्योगांच्या विकासासाठी शासनाव्दारे विविध उपक्रम राबविण्यात येतात. आजारी व बंद स्थितीत असलेल्या उद्योगांबाबत आवश्यक उपाययोजना वेळोवेळी राबविल्या पाहिजेत. त्यामुळे संबंधित यंत्रणेने अशा उद्योगांची    सद्य:स्थिती तपासावी व आवश्यक उपाययोजना कराव्यात. एनपीए युनिट म्हणून आढळलेल्या उद्योगांबाबत योग्य कार्यवाही तत्काळ करावी.            ते पुढे म्हणाले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व उद्योगात पर्यवेक्षीय श्रेणीत क

जिल्ह्यात ठिकठिकाणी योग प्रात्यक्षिके निरामय जीवनासाठी योग आवश्यक - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
अमरावती,दि.   21: शरीर आणि मन या दोन्ही बाबी संतुलित ठेवण्यासाठी योग हा उत्तम पर्याय आहे. योगशास्त्रातून आयुष्यात संयम व शिस्त येते. निरोगी व निरामय जीवन जगण्यासाठी योग कलेचा दैनंदिन आयुष्यात समावेश करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे सांगितले. जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, शिक्षण विभाग, भारत स्वाभिमान (न्यास) पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग, जेसीआय सेंच्युरियन व योग क्षेत्रात कार्यरत विविध संस्था यांच्या सहकार्याने विभागीय क्रिडा संकुलात आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिके व साधनेचा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय क्रीडा संकुलात आज योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी सकाळी साडेसहापासूनच शहरातील अनेक मान्यवर, व्यावसायिक, गृहिणी, विविध शाळा- महाविद्यालयांचे विद्यार्थी आदी विविध क्षेत्रातील व्यक्तींची मोठी उपस्थिती होती. सातच्या सुमारास संकुलातील सभागृहात योग प्रात्यक्षिकांना सुरुवात झाली.   आर्ट ऑफ लिव्हिंगचे जिल्हा समन्वयक व योगप्रशिक्षक निरज अग्रवाल व त्यांच्या सहका-यांनी योग प्रात्यक्षिका

पुनर्वसन प्राधिकरणाच्या उपाध्यक्षांकडून पुनर्वसितांच्या प्रश्नांचा आढावा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कायमस्वरुपी सोडविणार - माधव भांडारी

Image
*पुनर्वसनाच्या प्रश्नांसंबंधी थेट संवादातून तोडगा अमरावती, दि. 21 : प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक निधी व पॅकेजची तरतूद यापूर्वीच करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी प्रकल्पग्रस्तांचे सुनियोजित पुनर्वसन होण्यासाठी त्यांच्याशी समन्वय ठेवून वेगाने कामे पूर्ण करावी. येत्या दोन वर्षात प्रकल्पग्रस्तांच्या पुनवर्सनाचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यात येईल, असे राज्य पुनवर्सन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी आज येथे सांगितले.             विभागीय आयुक्त कार्यालयात अमरावती विभागातील सिंचन प्रकल्प व पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात आढावा बैठक श्री. भांडारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, पुनर्वसन उपायुक्त प्रमोद देशमुख, अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अमरावती जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, यवतमाळ जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते.             श्री. भांडारी म्हणाले की, विभागात 28 प्रकल्पांच्या पुनर्वसनाची कामे सुरु आहेत. ज्या

कृषी योजनांसाठी शेतकऱ्यांना एकच अर्ज करावा लागणार कृषी मंत्र्यांनी घेतला महाडीबीटी पोर्टलचा आढावा

Image
मुंबई, दि. 20 : शेतकऱ्यांकरीता असलेली पीक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, दुष्काळी मदत, या योजनांचा समावेश नव्यानेच विकसीत करण्यात येत असलेल्या महाडीबीटी पोर्टल मध्ये करावा. कृषीविषयक सर्व योजनांचे लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना एकच अर्ज करावा लागेल अशी सुविधा या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे दिले. विधानभवनात आयोजित करण्यात आलेल्या कृषी विभागाच्या बैठकीत ते बोलत होते.    कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संचालक विकास रस्तोगी उपस्थित होते. शेतकऱ्यांना कृषीविषयक योजनांची संपूर्ण माहिती व्हावी आणि योजनांमधील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करता यावे याकरिता ‘महाडीबीटी’ हे नव पोर्टल विकसीत करण्यात येत आहे. विभागाच्या वतीने पोर्टलबाबत सादरीकरण यावेळी कृषीमंत्र्यांना करण्यात आले. महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचा या पोर्टलमध्ये समावेश करता येईल याबद्दलही विचार करावा, अशी सूचना डॉ. बोंडे यांनी केली. या पोर्टलमध्ये सध्या 11 योजनांची माहिती संकलीत करण्यात आली आह

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना एकही पात्र व्यक्ती वंचित राहता कामा नये - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
अमरावती, दि.    18 :       आयुष्यमान भारत कार्यक्रमाद्वारे प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राबविण्यात येत असून, एकही पात्र नागरिक त्यापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले. योजनेबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.  श्री. नवाल म्हणाले की, लाभार्थी कुटुंबांना प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंत सर्जिकल आणि मेडिकल उपचार मान्यताप्राप्त खासगी आणि शासकीय रुग्णालयामार्फत उपलब्ध होणार आहे.   योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व विविध घटकांच्या सहभागासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वाक्षरीचे पत्र आशासेविका, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत पाठविण्यात आली आहेत.   लाभार्थी कुटुंबांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थींना स्वतःची ई-कार्ड तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी सेतू केंद्र किंवा आरोग्य मित्रांना भेटून कार्ड तयार करून घेण्याबाबत संबंधित नागरिकांमध्ये जागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले.            शिधापत्रिका तसेच प्रधान

पालकमंत्र्यांच्या हस्ते सुमारे सात कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन

Image
           जिल्ह्यातील महत्वाच्या दोन रस्त्यांच्या सुधारणा कामांचे भूमिपूजन आज पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते झाले.   आमदार रमेश बुंदिले,    जि. प. सदस्य प्रवीण तायडे, जयंत आमले यांच्यासह अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.                दर्यापूर ते आसेगाव राज्यमार्ग सुधारणा कामाचे, मार्की- निरूळ गंगामाई- मिर्झापूर- महिमापूर रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. दर्यापूर ते आसेगाव मार्ग सुधारणा कामाचे मूल्य चार कोटी रु., तर    मार्की महिमापूर रस्ता सुधारणा कामाचे मूल्य तीन कोटी रु. आहे.               केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याला मोठा विकासनिधी मिळवून दिला आहे. त्यामुळे अनेक विकासकामांना चालना मिळाली. या रस्त्यांच्या सुधारणेमुळे परिसरातील नागरिकांना लाभ मिळेल. ही कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी यावेळी दिले. अधिकारी व कर्मचा-यांसह परिसरातील नागरिकही यावेळी उपस्थित होते.

अंजनगाव सुर्जी पंचायत समितीच्या इमारतीचे भूमिपूजन जिल्ह्यात सर्वदूर पायाभूत सुविधांचा विकास - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

Image
अमरावती, दि. १५ : कृषी,   उद्योग, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रांसह रस्तेविकास व पायाभूत सुविधांसाठी जिल्ह्यात सुमारे 25 हजार कोटी रूपये निधीतून अनेक विकासकामे होत आहेत. जिल्ह्यात सर्वदूर व समतोल विकास याद्वारे होत आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे केले.               अंजनगाव सुर्जी पंचायत समितीच्या इमारतीचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. आमदार रमेश बुंदिले, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, जि. प. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, महिला व बालकल्याण सभापती वनिता पाल, आरोग्य सभापती बळवंत वानखेडे, पंचायत समितीच्या सभापती प्रियंकाताई दाळू, उपसभापती महेश खारोडे,     जि. प. सदस्य प्रवीण तायडे, विठ्ठल चव्हाण, जयंत आमले, गटविकास अधिकारी धोत्रे, दाळू महाराज आदी उपस्थित होते.              पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, गत पावणेपाच वर्षात जिल्ह्यात सर्वच भागात विविध विकासकामांना चालना देण्यात आली. पालकमंत्री पांदणरस्ते योजनेसारखी योजना ग्रामविकासात महत्वपूर्ण ठरली आहे. जलपुनर्भरणासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग व शोषखड्ड्याच्