Posts

Showing posts from March, 2021
Image
  कार्यालयांनी विशाखा समिती न स्थापल्यास कारवाई ; जिल्हा समिती करणार तपासणी प्रत्येक कार्यालयाने पाच दिवसांत अनुपालन अहवाल सादर करावा   जिल्ह्यात स्थानिक समित्यांच्या संनियंत्रणासाठी आता तालुकास्तरीय समित्या -           जिल्हाधिकारी शैलेश नवाल   अमरावती , दि. 31 : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध , मनाई व निवारण) अधिनियमानुसार सर्व कार्यालयात तक्रार निवारण समिती स्थापित असणे अनिवार्य आहे. समितीकडून प्राप्त तक्रारींवरील कार्यवाहीबाबत अनुपालन अहवाल पुढील पाच दिवसांत सर्व कार्यालयांनी जिल्हास्तरीय समितीला सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले. तालुकास्तरावरील स्थानिक समित्यांच्या संनियंत्रणासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समित्याही स्थापण्यात येतील , असे जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगितले.                 कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध , मनाई व निवारण) अधिनियमानुसार   जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समिती कार्यान्वित असून , त्याची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली , त्यावेळी ते ब

डॅशिंग अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली

Image
       डॅशिंग अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी वनाधिकारी रेड्डी यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी यासाठी महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली .   मा.मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.         पालकमंत्री म्हणाल्या की,राज्यातल्या आयाबहिणींना त्रास देणाऱ्या रोड रोमीयो बरोबरच सरकारी तसंच खाजगी कार्यालयांमध्ये लैंगिक शोषण करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगला धडा शिकवण्याची वेळ आहे. या राज्यात अशा गुन्ह्यांना आणि गुन्हेगारांना माफी नाही. सगळ्यांना शिक्षा मिळेल, कडक शिक्षा मिळेल. सगळ्या कार्यालयांमधल्या विशाखा समित्यांचा आढावा आम्ही घेणार आहोत. एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही.   हा जिजाऊॅचा महाराष्ट्र आहे. गुन्हेगार आणि त्याला वाचवायचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे. माझी विनंती आहे राज्यातील पोलिसांना, लोक कायदा हातात घ्यायची भाषा बोलतायत, लोकांचा कायद्यावर विश्वास बसेल असा धडा शिकवा एकेकाला.   दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येमुळे अवघा महार

अल्पसंख्याकबहुल ग्रामीण क्षेत्रातील विकासकामांसाठी २५ लक्ष निधी वितरित सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

Image
  अल्पसंख्याकबहुल ग्रामीण क्षेत्रातील विकासकामांसाठी २५ लक्ष निधी वितरित सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर   अमरावती , दि. २८ : _ राज्यातील अल्पसंख्याकबहुल ग्रामीण भागात अनेक विकासकामे हाती घेण्यात आली असून , टप्प्याटप्प्याने निधी वितरित करण्यात येत आहे. त्याद्वारे अमरावती जिल्ह्यातही विविध विकासकामांना चालना मिळणार असून , २५ लक्ष निधी वितरित झाला आहे. सकल समाजाचा सर्वसमावेशक विकास व्हावा यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे , असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज सांगितले. _   राज्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्याक लोकसमूहातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार अल्पसंख्याक विभागाकडून राज्यातील विकासकामांसाठी ५७ कोटी ३३ लाख रुपये अर्थसंकल्पित करण्यात आले आहेत.   त्यात अमरावती जिल्ह्यातील मोर्शी व तिवसा तालुक्यातील विविध कामांचा समावेश आहे. ही कामे वेळेत पूर्ण व्हावी म्हणून निधी मिळण्यासाठी पालकमंत्र्यांनी वेळो
Image
  वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण जबाबदार अधिका-यांवर कठोर कारवाई व्हावी - पालकमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन   प्रत्येक कार्यालयात विशाखा समिती कार्यान्वित नसल्यास कार्यालयप्रमुखावर कारवाई -   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. 26 : वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिका-यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत वन्यजीव विभागातील महिला वनरक्षक, वनपाल यांना शासकीय कर्तव्य बजावत असताना कामाच्या ठिकाणी येत असलेल्या समस्यांची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करण्याबाबत पालकमंत्र्यांनी यापूर्वीच जिल्हाधिका-यांना पत्र दिले असून, जिल्हाधिकाऱ्यांनीही वन प्रशासनाला तसे सूचित केले होते. त्याबाबत वन प्रशासनाने केलेल्या   कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.                कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम – 2013 नुसार प्रत्येक शासक
Image
  जिल्हाधिका-यांकडून ‘इर्विनची ’ पाहणी रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार सुविधा पुरवाव्या -           जिल्हाधिकारी शैलेश नवाल Ø    जिल्हाधिकाऱ्यांनी साधला रुग्णांशी संवाद अमरावती, दि. 23 : जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांना दर्जेदार सुविधा पुरविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिले. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात नेत्र प्रत्यारोपणासाठी स्थापित सुविधेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले. जिल्हाधिका-यांनी आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम    अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अतुल नरवणे, अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद चव्हाण, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे आदी    उपस्थित होते. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यावेळी रुग्णालयातील सोयी सुविधांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, उपचारप्रणाली व यंत्रणा अद्ययावत करण्याबरोबरच रुग्णालयांत स्वच्छता व आवश्यक तिथे इमारतीची
Image
  धामोरी येथील विकासकामांसाठी दुस-या टप्प्यातील निधी प्राप्त विकासकामांना मिळणार गती -           पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. 23 : प्रादेशिक पर्यटन योजनेत सांसद आदर्श ग्राम धामोरी येथील नियोजित विकासकामांसाठी दुस-या टप्प्यात 30 लाखांचा निधी वितरीत झाल्याने तेथील पायाभूत सुविधा व सौंदर्यीकरणाच्या कामांना गती मिळणार आहे. पुढील टप्प्यातील निधीही वेळेत मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. जिल्ह्यात विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली. प्रादेशिक पर्यटन योजनेत भातकुली तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम धामोरी येथील विकासकामांसाठी 2 कोटी 5 लक्ष रूपयांचा निधी मंजूर आहे. त्यापैकी 30 लक्ष रूपये निधी यापूर्वी प्राप्त झाला. उर्वरित सर्व कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, निधी उपलब्ध नसल्याने कामात अडथळे आले. हे लक्षात घेऊन पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन पाठवून याबाबत पाठपुरावाही केला. त्यानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागात

‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजनेबाबत परिपूर्ण नियोजन सादर करा - पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांचे कृषी विभागाला निर्देश

Image
  पालकमंत्र्यांकडून विविध कृषी योजनांचा आढावा ‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजनेबाबत परिपूर्ण नियोजन सादर करा -           पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांचे कृषी विभागाला निर्देश   अमरावती, दि. 22 :   प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेत ‘एक जिल्हा एक उत्पादन’ उपक्रमात केंद्र शासनाकडून अमरावती जिल्ह्याला संत्रा फळपीकाबाबत मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार कृषी व फलोत्पादन प्रक्रिया उद्योगांना चालना मिळण्यासाठी परिपूर्ण नियोजन सादर करावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.             विविध कृषी योजनांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेताना त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे उपस्थित होते.             पालकमंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी कृषी प्रशास

घरकुलांच्या कामांना चालना मिळण्यासाठी विशेष शिबिरे घ्यावीत पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
  पावसाळ्याच्या आधी घरकुलांचे     उद्दिष्ट पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश घरकुलांच्या कामांना चालना मिळण्यासाठी विशेष शिबिरे घ्यावीत पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. 22 : पंतप्रधान आवास योजनेसह सर्व ग्रामीण व नागरी आवास योजनांच्या उद्दिष्टानुसार घरकुलांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले. पालकमंत्र्यांनी शहरी व ग्रामीण आवास योजनांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी आदी यावेळी उपस्थित होते.             पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देणे हे शासनाचे प्राधान्य आहे. त्यासाठी वेळोवेळी आढावा घेऊन कामे पूर्णत्वास न्यावीत. या कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. गरजू नागरिकांना आवास योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शुक्रवार आणि शनिवारी विशेष शिबिरे राबविण्यात यावी. या शिबिर

तळागाळापर्यंत पोहोचून गरजूंना विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

Image
'माविम'तर्फे मायग्रंट सपोर्ट सेंटरचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ तळागाळापर्यंत पोहोचून गरजूंना विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर   अमरावती,दि. 21 : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपक्रमांची अंमलबजावणी अधिक व्यापकतेने होण्यासाठी तळागाळापर्यंत पोहोचून पात्र व गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.                महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) मायग्रंट सपोर्ट सेंटरचा शुभारंभ    पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे राज्य समन्वयक कपिल बेंद्रे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उदय पुरी, माविमचे विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी केशव पवार, महामंडळाचे जिल्हा समन्वयक सुनील सोसे आदी उपस्थित होते.              पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, स्थलांतरित गरजू, शहरी गरीब लोकांना रोजगार मिळवून देणे, त्यांचे एकाच स्त्रोतावरील अवलंबन कमी करणे व पुन्हा स्थल