Posts

Showing posts from September, 2019

अमरावती विधानसभा मतदारसंघात 3 लाख 45 हजार 597 मतदार

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019  *309 मतदान केंद्रे अमरावती, दि. 26 :  अमरावती विधानसभा मतदारसंघात 3 लाख 45 हजार 597 मतदार असून, त्यात पुरुष मतदार 1 लाख 77 हजार 231 व महिला मतदार 1 लाख 68 हजार 89, इतर मतदार 13 व सेना दलातील मतदार 264 आहेत, असे या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांनी आज पत्रकारांना सांगितले. निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी उपविभागीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तहसीलदार प्रज्ञा महांडुळे, तहसीलदार संतोष काकडे आदी उपस्थित होते. श्री. राजपूत म्हणाले की, जुलै महिन्यातील विशेष पुनरीक्षण व निरंतर अद्ययावतीकरणानंतर 2 हजार 687 पुरुष व 1 हजार 448 महिला असे एकूण 4 हजार 135 नवीन मतदार नोंदविण्यात आले आहेत. त्यांना एपिक ओळखपत्र वितरीत करण्यात आले आहे. मतदारसंघात 291 नियमित व 18 सहाय्यकारी अशी एकूण 309 मतदान केंद्रे असतील. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एका मतदान केंद्रावर 1550 पर्यंत कमाल मतदार संख्या असू शकते. मतदारसंघातील पोलीस, महापालिका यासह सर्व शासकीय यंत्रणांची सभा घेऊन निर्देश दिले आहेत.

मेळघाटातील दुर्गम मतदान केंद्रांसाठी सक्षम संपर्कयंत्रणा उभारावी - विभागीय आयुक्त पीयूष सिंह

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांच्या उपस्थितीत बैठक अमरावती, दि. 25 : मेळघाटातील  अतिदुर्गम परिसरातील 133 मतदान केंद्रांवर मोबाईल नेटवर्क मिळत नाही. अशा मतदान केंद्रावर वनविभाग व पोलीस विभागाने संयुक्तपणे त्यांची वायरलेस यंत्रणा वापरुन सक्षम  संपर्क यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी आज येथे दिले. मेळघाट क्षेत्रातील दुर्गम भागात निवडणूक कार्यासाठी आवश्यक बाबीसंदर्भात वनविभाग, पोलीस विभागाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल,   अतिरिक्त पोलीस अधिक्षक शाम घुगे, उपवनसंरक्षक शिवा बाला, वायरलेस पोलीस अधिक्षक आय.डी. कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी (वायरलेस) एस. टी. हांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे, निवडणूक नायब तहसीलदार श्री. चंदनशिवे तसेच महावितरणचे अधिकारी यावेळी बैठकीला उपस्थित होते. मेळघाटातील दुर्गम भागातील गावामध्ये वॉकी टॉकी कनेक्ट होत आहेत किंवा कसे, हे सर्वप्रथम तपासून घ्यावे व त्यातील त्रुटी दूर कराव्या

2 कोटी 12 लक्ष रुपयाच्या विकास कामाचे पालकमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन

Image
अमरावती, दि. 18 :    वरुड तालुक्यातील लिंगा येथील 2 कोटी 12 लक्ष रुपये निधीच्या विविध विकास    कामांचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते आज भूमीपूजन करण्यात आले. यावेळी डॉ. वसुधाताई बोंडे, लिंगाच्या सरपंच सतीबाई मेवलिया, भाजपा पदाधिकारी राजकुमार राऊत, ज्योतीताई कुकडे यांचेसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. एकल विहीर ते लिंगा रस्त्याचे रुपये 2 कोटी रुपये निधीतून बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.लिंगा येथे पाण्याच्या टाकीचे व गोविंद सोमकुंवर यांच्या घरापर्यंत रूपये पाच लक्ष रुपये निधीचे रस्ता बांधकाम, तसेच लिंगा येथे व्यायाम शाळेचे रुपये सात लक्ष रुपये निधीचे बांधकाम करणे आदी कामाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. रस्तेविकासात राज्यात ऐतिहासिक निर्माण कार्य होत आहे. सर्वदूर पायाभूत सुविधां च्या उभारणीतून राज्याची विकासाकडे वाटचाल होत आहे, असे पालकमंत्री डॉ. बोंडे यांनी यावेळी सांगितले.  

पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या पुढाकाराने होणार संत्रा फळबागांचे पुनरुज्जीवन

Image
            सहा कोटी रूपयांचा जिल्ह्यात निधी मंजूर अमरावती, दि. 11 : अपुरा पाऊस व तापमानामुळे नष्ट होत चाललेल्या जिल्ह्यातील संत्रा बागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी     कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या निर्देशानुसार ६ कोटी रुपये निधी ला फलोत्पादन विभागाने मंजूरी दिली असून त्यातून जुन्या बागा वाचविण्यासाठी विविध उपाय अंमलात येणार आहेत.   बदलते पर्यावरण, अपुरा पाऊस व तापमानामुळे जिल्ह्यातील जुन्या संत्रा बागाचे नुकसान होऊन जिल्ह्यातील संत्रा बागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तर काही बागा वाळलेल्या आणि अर्धवट जळालेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे या बागा वाचविण्यासाठी रोग ग्रस्त फांद्या कापून काढणे, बोर्डो पेस्ट लावणे, रासायनिक खत देणे, बुरशीनाशक व कीटकनाशक फवारणी करणे आदी बाबींचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला एक हेक्टर मर्यादेत लाभ देण्यात येणार आहे. राज्याचे कृषीमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी यापूर्वीच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आणि मनरेगा अंतर्गत पुन्हा बागनिर्मिती करीता मागेल त्याला मंजूरी ही प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिलेले आहेत.   जिल्ह्

वरुड-टेंभुरखेडा-गव्हाणकुंड-बहादा-मांगरुळी-हातुर्णा रस्त्याचे भूमिपूजन शेतकरी बांधवांनी गट शेतीकडे वळावे कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे

Image
अमरावती, दि. १० :    शेतीच्या विकासासाठी गटशेती ही काळाची गरज असून, त्याकडे शेतकऱ्यांनी वळावे. गटशेतीमुळे एकत्रित , संघटित व्यवसायाचे लाभ मिळतात व शासनाचे    अनुदान व सवलतीचाही लाभ मिळतो, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज गव्हाणकुंड येथे केले.            वरुड-टेंभुरखेडा-गव्हाणकुंड-बहा दा-जरुड-मांगरुळी-काचुर्णा-नां दगांव-हातुर्णा या १४५ कोटी ३२ लक्ष रुपयांच्या रस्ता बांधकामासह एकुण १४७ रुपयांच्या विकासकामांचे भुमिपूजन राज्याचे कृषिमंत्री डॉ. बोंडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. बोंडे म्हणाले की, विविध उपक्रमांतून गव्हाणकुंड गावात अनेक विधायक बदल घडून आले. गव्हाण कुंडला ब वर्ग दर्जा मिळून २ कोटी रुपये मिळाले. सौर ऊर्जा प्रकल्प आला. लवकर हे काम सुरू होईल. शेकदरी धरणावरून पाईपलाईनने शेतापर्यंत पाणी जाईल. जिल्ह्याला २०० पॅक हाऊस लक्ष्यांक आहे. त्याचा लाभ अनेकांना मिळेल.   हातूरणापासून ते टेंभुरखेडा वरुड रस्ता हायब्रीड ऍनुईटीतुन तयार होत आहे. आता शेतकरी बांधवांनी उद्योगप्रवण होणे गरजेचे आहे. त्यासाठी गटशेती

घातखेड येथील 'केव्हीके'मध्ये जैविक औषधे निर्मिती प्रयोगशाळेचा शुभारंभ जैविक शेतीला प्रोत्साहन, सूक्ष्म सिंचनाद्वारे शेतीचा विकास -कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे

Image
अमरावती, दि. १० : जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी जैविक निविष्ठा निर्मितीला प्रोत्साहन व सूक्ष्म सिंचनावर भर याद्वारे शेतीचा विकास घडवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज घातखेडा येथे केले. घातखेडा येथील कृषी विज्ञान केंद्रात जैविक औषधे निर्मिती प्रयोगशाळेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. खासदार नवनीत राणा, संस्थेच्या अध्यक्ष वसुधाताई देशमुख, जि. प. सदस्य प्रकाश साबळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चवाळे, डॉ. अर्चना बारब्दे आदी यावेळी उपस्थित होते. कृषी मंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, ग्राम परिवर्तनासाठी विविध योजनांसह गट शेतीला चालना देण्यात येत आहे. त्यासाठी गट शेतीला अवजार बँक, बी बियाणे, सौर कुंपण आदी अनेक साह्य देण्यात येत आहे. मालावर प्रक्रिया करून तो विकल्यास त्याची किंमत वाढते. त्यामुळे बचत गटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग व विपणनाचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. शासनाने सूक्ष्म सिंचन वाढविण्यावर भर दिला आह

‘एमसीएमसी’ सदस्यांचे व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशिक्षण

Image
अमरावती, दि. 9 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीच्या (एमसीएमसी) सदस्यांचे व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे प्रशिक्षण आज झाले. निवडणूक   आयोगाचे महासंचालक धीरेंद्र   ओझा यांनी    आचारसंहिता, एमसीएमसीची भूमिका, पेड न्यूज व अपेक्षित कार्यवाही, सोशल मीडियावरील प्रसारित मजकूर आदी विविध विषयांवर यावेळी मार्गदर्शन केले. उमेदवार किंवा पक्षाची प्रत्येक राजकीय जाहिरात पूर्वप्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे अशी कार्यवाही वेळेत होईल व आचारसंहितेचा भंग होऊ नये, यादृष्टीने यंत्रणा सुसज्ज ठेवावी. सोशल मीडियावरील मजकुराचे संनियंत्रण करण्यासाठी अशा माध्यमांच्या प्रशासनाकडून सहकार्य मिळविण्यात येत आहे.    सोशल किंवा कुठल्याही माध्यमातून    आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यावर तत्काळ कार्यवाही व्हावी, असे निर्देश त्यांनी दिले.                 उप निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह राजपूत, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, आकाशवाणीचे मुख्य कार्यक्रम अधिकारी एकनाथ नाडगे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव यांच्यासह विविध कर्मच

स्वीप मोहिमेसाठी जिल्हास्तरीय समितीची पुनर्रचना मोहिमेद्वारे सर्वदूर मतदार जागृती करावी - जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री

Image
अमरावती, दि.    6 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वीप मोहिम भारत निवडणूक आयोगाने हाती घेतली असून, मतदार जागृतीच्या दृष्टीने सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश स्वीप मोहिमेच्या नोडल अधिकारी तथा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी आज येथे दिले.              स्वीप मोहिमेच्या समिती सदस्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.              उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, सहायक कामगार आयुक्त अनिल कुटे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी मंगला मून, शिक्षणाधिकारी निलिमा टाके,    कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विनोद गवळी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा आदी उपस्थित होते. विविध विभागांच्या माध्यमातून निरनिराळे उपक्रम राबवून मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. त्यांनी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश श्रीमती खत्री यांनी दिले.                                                                  जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठन स्वीप मोहिमेच्या प्रभावशा

राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
    राजे उमाजी नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.             निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांनीही राजे उमाजी नाईक यांना पुष्प वाहून आदरांजली वाहिली.

पोलीस विभागाने कम्युनीटी पोलीसींगचे कार्यक्रम राबवावे - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे

Image
पोलीसांच्या 208 निवासस्थान बांधकामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन अमरावती, दि. 6 : अलिकडच्या काळात देश व जागतिक पातळीवर वेगाने होत असलेल्या शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमुळे सर्वसामान्य जनतेत सर्वत्र बदलाचे वारे वेगाने वाहत आहेत. या सकारात्मक बदला बरोबरच गुन्हेगारीचे स्वरुप, दशतवाद, घातपाती कृत्य यामुळे नागरिकांच्या जिवीताचा व मालमत्तेच्या सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे. हे धोके लक्षात घेऊन सामान्य जनतेच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागाने कम्युनीटी पोलीसींग अंतर्गत जनजागृती कार्यक्रम राबवावे, असे कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज सांगितले.             पोलीस अधिक्षक ग्रामीण पोलीस विभागाव्दारे आयोजित बडनेरा जवळील मौजा कोंडेश्वर येथे 208 पोलीस निवासस्थानांच्या बांधकामाचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते कुदळ मारुन व कोनशिलेचे अणावरन करुन आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या भूमीपूजन सोहळ्याला खासदार नवनीत रवि राणा, शिक्षक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष तथा आमदार डॉ. श्रीकांत देशपांडे, आमदार रवि राणा, उपमहापौर संध्याताई ट

जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजित निधीनुसार विकासकामे पूर्ण करा - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे

Image
अमरावती, दि. 5 : अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार सर्व विकासकामे पूर्ण होतील याची दक्षता प्रशासनाने घेण्याचे निर्देश पालकमंत्री तथा कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले. ही बैठक आज नियोजनभवनात झाली. विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, खासदार नवनीत राणा, आमदार वीरेंद्र जगताप, आमदार रमेश बुंदिले, आमदार प्रभुदास भिलावेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कोल्हे, महापालिका आयुक्त संजय निपाणे आदी उपस्थित होते.               जिल्हा वार्षिक योजनेत (सर्वसाधारण) 197 कोटी 80 लक्ष रुपये मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार 34 कोटी 84 लक्ष रूपये खर्चाला प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. उर्वरित कार्यवाही गतीने करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.  सर्वसाधारण योजनेतून 118 कोटी 68 लक्ष रूपये प्राप्त निधीतून 45 कोटी 99 लक्ष रुपये खर्च झाले. प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या 96 कोटी 73 लक्ष रूपये मंजूर नियतव्ययानुसार  58 कोटी 25 लक्ष रूपये प्राप्त व 16 कोटी 87 लक्ष रूपये वितरीत झा

शेतकऱ्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी विज्ञानाचा वापर करावा - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे

Image
स्पर्धेत क्रमांक पटकाविणाऱ्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार अमरावती, दि. 5 : विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण घेत असतांना त्या शिक्षणाचा उपयोग शेती व शेतीशी निगडीत क्षेत्रात संशोधन करुन नवनवीन यंत्रसामुग्री तयार करावी. विज्ञानाच्या वापर करुन शेतकऱ्यांचे जीवन सुखकर होईल यासाठी विद्यार्थ्यांनी नवनवीन संशोधन करावे, असे आवाहन कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज केले. येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे जिल्हा नाविण्य परिषदेच्या तसेच विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालय, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, साहचार्य मंडळ व उन्नत भारत अभियानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय स्टार्टअप बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशनच्या बक्षीस वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रसिध्द युवा उद्योजक सुहाज गोपीनाथ, सुकाणू समितीचे प्रमुख दिनेश सुर्यवंशी, एमआयडीसी असोसिएशनचे किरण पातुरकर,  तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. डी. वी. जाधव, नवोक्रम संचालक डॉ. डी.टी. इंगोले, चेंबर ऑफ कॉमर्सचे असोशिएशनचे अध्यक्ष विनोद कल

मोर्शीतील पुरग्रस्त भागांची पालकमंत्र्याकडून पाहणी

Image
नुकसानग्रस्त कुटूंबांना पंधरा हजार रुपये तातडीची मदत नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने करावे अमरावती, दि. 5 : बुधवारी (4 सप्टेंबर रोजी) मोर्शी शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नलदमयंती नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील पेठपुरा, भोईपुरा, सुलतानपुरा, मोईमपुरा, मालवीयपुरा, आठवडी बाजार, मेन मार्केट, आंबेडकर चौक, खोलगटपुरा या भागात आठ ते नऊ फुट पर्यंत पुराचे पाणी शिरले होते. आज राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पुरग्रस्त भागांना तातडीने भेट देऊन क्षतीग्रस्त भागांची, घरांची व परिसराची पाहणी केली. नुकसानग्रस्त कुटूंबांना पंधरा हजार रुपये तातडीची मदत देण्यात येईल, असे कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी  मोर्शी येथे  सांगितले.             यावेळी मोर्शीचे नगराध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, मोर्शीचे मुख्याधिकारी तसेच महसूल विभगाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते. डॉ. बोंडे म्हणाले की, नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना तातडीची मदत म्हणून पंधरा हजार रुपये प्रती कुटू