Posts

Showing posts from 2017
Image
‘बेटी पढाओ’च्या नावाखाली फसवणूकीच्या घटना नागरिकांनी तक्रार नोंदविण्याचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांचे आवाहन अमरावती, दि. 29 : अस्तित्वात नसलेल्या ‘बेढी पढाओ’ योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी नागरिकांकडून बेकायदेशीरपणे शुल्क वसूल करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. असा प्रकार घडत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तत्काळ तहसीलदार, तसेच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केले आहे. वरुड परिसरात बेटी पढाओ    योजना अस्तित्वात असल्याचे दाखवून त्याचा फॉर्म भरुन शुल्क वसूल करण्याच्या घटना घडल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. केंद्र व राज्य शासनाची अशी कोणतीही योजना अस्तित्वात नाही. चुकीची माहिती देऊन काही लोकांकडून नागरिकांची फसवणूक करण्यात येत आहे. अशी चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणारी व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी तत्काळ तहसीलदार, तसेच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. नागरिकांनी याप्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. बांगर यांनी केले आहे. 00000
Image
दाजीसाहेब पटवर्धनांचे कार्य समाजासाठी सतत प्रेरणादायी -  पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील अमरावती, दि. 28 : शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांनी कुष्ठरुग्णांच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. तपोवन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेली रुग्णसेवा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे  प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज येथे केले. डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या डाक तिकीट अनावरणाचा समारंभ तपोवनात झाला. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अतुल आळशी अध्यक्षस्थानी होते. खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा, भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल हरिष अगरवाल,  नागपूर विभागाच्या पोस्टमास्टर जनरल श्रीमती मरियम्मा तोमस, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुभाष गवई, झुबीन दोटीवाला, डॉ. नितीन धांडे व विवेक मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.             श्री. पोटे- पाटील म्हणाले की, दाजीसाहेबांचे कणखर व नि:स्पृह व्यक्तिमत्व पुरस्कारांच्या पलीकडे जाणारे होते. त्यांची कार्यावरील निष्ठा अव
Image
खेळातून व्यक्तिमत्व घडवा                                           -शिक्षण मंत्री विनोद तावडे           अमरावती, दि. 27 : खेळामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक, बौद्धिक विकास अधिक प्रभावीपणे होतो. हे लक्षात घेऊन शासनाने खेळांना प्रोत्साहनपर अनेक उपक्रम सुरु केले आहेत, असे सांगतानाच, विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळांसाठीही पुरेसा वेळ द्यावा. खेळांतून व्यक्तिमत्व घडवा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण, क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज विद्यार्थ्यांना केले. येथील अंबिकानगर शाळेच्या प्रांगणात शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, आमदार सर्वश्री अनिल बोंडे, रवि राणा, स्थायी समितीचे सभापती तुषार भारतीय, उपमहापौर संध्याताई ठाकरे, मनपा आयुक्त हेमंत पवार यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारी आदी उपस्थित होते. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर श्री. तावडे यांनी व्यासपीठावरुन भाषण न करता थेट विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. विद्यार्थी कुठले खेळ खेळतात, याची प्रत्येकाकडे विचारपूस त्यांनी केली. ते म्हणाले की, वि
Image
दर्जेदार शिक्षण सर्वदूर पोहोचविण्यासाठी 'व्हर्च्युअल सी४' उपयुक्त                 - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे अमरावती, दि. 27: अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देऊन    शिक्षणाची गुणवत्ता वाढवत ते समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण    पोहोचविण्यासाठी 'व्हर्च्युअल सी४'    उपयुक्त ठरेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज येथे सांगितले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात व्हर्च्युअल कॅम्पस टू काॅलेज अँड कम्युनिटी सेंटर (व्हर्च्युअल-सी४), तसेच विद्यापीठाच्या नव्या अद्ययावत संकेतस्थळाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, आमदार डॉ. अनिल बोंडे, प्र-कुलगुरु डॉ. राजेश जयपूरकर, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिनेश सूर्यवंशी, महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती तुषार भारतीय    आदी उपस्थित होते. श्री. तावडे म्हणाले की, महाराष्ट्राचा सम्यक विकास करण्याचा शास
Image
डॉ. पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे अभिवादन कार्यक्रम रोजगारक्षम शिक्षणातून समाजाचा विकास                                                                       उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे अमरावती, दि. 27: स्थानिक परिसरातील विकासप्रक्रियेशी अभ्यासक्रम जोडून रोजगारक्षम शिक्षणावर राज्य शासनाकडून भर दिला जात आहे. गुणवत्तापूर्ण व रोजगारक्षम शिक्षणातून समाजाचा विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज येथे सांगितले.          डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 119 व्या जयंती निमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, आमदार डॉ. अनिल बोंडे, आमदार अशोक उईके, जि. प. बांधकाम सभापती जयंतराव देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, माजी अध्यक्ष अरूण शेळके आदी उपस्थित होते.           श्री. तावडे म्हणाले की,   भाऊसाहेबांनी शिक्षण प
Image
‘मागेल त्याला शेततळे’चे उद्दिष्ट तात्काळ पूर्ण करावे -         जिल्हाधिकारी अभिजित बांगर अमरावती, दि. 26 : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत भरीव कामे होण्यासाठी कृषी सहायकांना उद्दिष्ट निश्चित करुन दिलेली आहेत. तथापि, काही तालुक्यांत पुरेशी कामे नाहीत. निश्चित उद्दिष्ट  पूर्ण न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी आज येथे सांगितले. शेततळे व गटशेती योजनेबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाली. त्यावेळी ते बोलत होते. श्री. बांगर म्हणाले की, खारपाणपट्ट्यातील तालुक्यांत भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन प्रत्येक कृषी सहायकामागे 50, तर इतर तालुक्यात 20 शेततळ्यांचे उद्दिष्ट दिले आहे. कृषी अधिका-यांसह उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनाही या कामाबाबत निर्देश देण्यात आले आहेत. काही तालुक्यांमध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आले; पण प्रत्यक्षात कामे सुरु झाली किंवा कसे, याची माहिती द्यावी व कामे तत्काळ पूर्ण करावी.  गटशेतीचे प्रस्ताव परिपूर्ण असावेत शेतकरी गट कंपन्यांच्या प्रकल्प विकास आराखड्यात क्षेत्र, नकाशे, खर्च, त्याची सामुदायिक व वैयक्तिक विभागणी
Image
सामाजिक विकृतींना आळा घालण्याची सर्वांची जबाबदारी -            पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील अमरावती, दि. 7 :     समाजातील विकृतींना आळा घालण्याची जबाबदारी कायदा व सुव्यवस्था यंत्रणेइतकीच    आपली सर्वांची आहे. सुदृढ व सुरक्षित समाजासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे केले. पोलीस आयुक्तालयातर्फे    ‘जागर तरुणाईचा, सामाजिक बांधीलकी व उत्तरदायित्व कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेला शहरातील विविध शाळा- महाविद्यालयांतील दोन हजारहून अधिक विद्यार्थीनींची उपस्थिती होती. यावेळी उपमहापौर संध्या टिकले, सहायक पोलीस आयुक्त चेतना तिडके, राजश्री कौलखेडे, डॉ. मोना चिमोटे, डॉ. वर्षा देशमुख, डॉ. स्मिता देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. श्री. पोटे- पाटील म्हणाले की, कुटुंबात मिळालेल्या स्वातंत्र्याचा पाल्यांकडून दुरुपयोग होऊ नये यासाठी पालकांनीही त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची काळजी घेतली पाहिजे. मुलांमध्ये व्यसनाधीनता येता कामा नये. अद्ययावत तंत्रज्ञानाने उपलब्ध करुन दिलेली मोबाईल आदी साधने म्हणजे आधुनिकत
Image
पालकमंत्र्यांनी घेतला शहरातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक बसवावा                                      -पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील अमरावती, दि. 7 : शहरात वारंवार गुन्हेकारक घटना घडत आहेत. अशा घटना घडू नयेत म्हणून गुन्हेगारी प्रवृत्ती वेळीच ठेचली गेली पाहिजे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अवैध धंद्यांवर लक्ष केंद्रित करुन गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे दिले.              पालकमंत्री श्री. पोटे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कायदा व सुव्यवस्थाविषयक बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस अधिक्षक अभिनाश कुमार आदी उपस्थित होते.            पालकमंत्री श्री. पोटे- पाटील म्हणाले की, शहरातील गुन्हेगारी घटनांचे प्रमाण पाहता पोलीस विभागाने अधिक सतर्क राहून काम केले पाहिजे. अवैध धंद्यावर लक्ष केंद्रित करुन गुन्हेगारांवर वचक निर्माण करावा. तरुणांमध्ये शिस्त आणण्यासाठी त्या
Image
पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम तत्काळ जमा करण्याचे आदेश एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही: मुख्यमंत्र्यांची ग्वाही मुंबई, दि.  7  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवल्यानंतर आतापर्यंत  41  लाख शेतकरी खात्यांसाठी 19,537  कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून आता बँकांनी ही रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तत्काळ कारवाई करावी ,  असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. या ऑनलाईन प्रक्रियेत एकूण  77  लाख खाते राज्य सरकारला प्राप्त झाले. पुन्हा पुन्हा आलेले अर्ज तसेच इतर त्रुटी दूर करून सुमारे  69  लाख खात्यांवर प्रक्रिया करण्यात आली आहे. शासनाने आतापर्यंत सुमारे  41  लाख शेतकऱ्यांच्या खात्यासाठी  19  हजार  537  कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली आहे. यात वन टाईम सेटलमेंटसाठी  4673  कोटी रुपये आहेत. कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी बँकांना शाखानिहाय देण्यात आली असून बँकांनी ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करावी ,  त्यासाठी बँकांनी आपली स्थानिक यंत्रणा अधिक सक
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम ‘ महाराष्ट्र माझा ’  छायाचित्र स्पर्धा  2017  चा निकाल जाहीर मुंबई ,  दि. 7  :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने आयोजित  ‘ महाराष्ट्र माझा ’  छायाचित्र स्पर्धा  2017  चा निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेत प्रथम क्रमांक वेदांत कुलकर्णी (कोल्हापूर) ,  द्वितीय क्रमांक दीपक कुंभार (कोल्हापूर) तर तृतीय क्रमांक अंशुमन पोयरेकर(मुंबई) यांनी पटकावला आहे. या स्पर्धेतील पाच उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी प्रशांत खरोटे (नाशिक) ,  राजेंद्र धाराशिवकर (उस्मानाबाद) ,  सुनिल बोर्डे (बुलढाणा) ,  उमेश निकम(पुणे) ,  सुशिल कदम(नवी मुंबई) यांची निवड करण्यात आली आहे.  माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी आज निकाल जाहीर केला. प्रथम ,  द्वितीय ,  तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रकारांना अनुक्रमे  25  हजार , 20  हजार , 15  हजार तर उत्तेजनार्थ पाच पारितोषिकांसाठी प्रत्येकी तीन हजार रूपये प्रदान केले जाणार आहेत.                महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन ,  ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या
पर्यटक निवासातून मिळेल मेळघाटातील पर्यटन व रोजगाराला चालना अमरावती, दि. 5 : निसर्गरम्य मेळघाटमध्ये पर्यटकांच्या सोयीसाठी नानाविध सुविधा उभारण्याचे प्रयत्न राज्य शासनाकडून होत आहेत. याच अंतर्गत डिजीटल व्हिलेज हरिसालमध्ये पर्यटक निवास उभारण्यासाठी स्थानिकांना मदत देण्यात आली असून, त्यातून पर्यटनाला चालना व रोजगार निर्मितीही होणार आहे. रोजगार निर्मितीसाठी पर्यटक निवास व्यवस्था उभारण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांची मदत हरिसालमध्ये पाचजणांना देण्यात आली आहे. त्यानुसार हे काम लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. पर्यटक याठिकाणी राहून निसर्गपर्यटनाचा आनंद घेऊ शकतील.  पर्यटकांना स्थानिक संस्कृतीचा परिचय व्हावा म्हणून हरिसालमध्ये स्थानिक 15 कलावंतांचे पथकही निर्माण करण्यात आले आहे.  त्यामुळे पर्यटनाच्या आकर्षण केंद्रांत भरच पडली आहे. या योजनेमुळे स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध होत आहे.
Image
लोकराज्य डिसेंबर अंक प्रकाशित महापरिनिर्वाण दिन आणि विदर्भ विशेष मुंबई ,  5 :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा ,  विदर्भातील विकासकामांचा आढावा घेणारा लोकराज्य डिसेंबरचा अंक प्रकाशित झाला आहे. या अंकात प्रा. दत्ता भगत ,  डॉ. कमल गवई ,  नागसेन कांबळे ,  कृष्णा इंगळे ,  मिलिंद मानकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिलेल्या लेखांची विशेष पुरवणी समाविष्ट केली आहे. गेल्या तीन वर्षात विदर्भामध्ये झालेल्या विकासकामांची विस्तृत माहिती या अंकात देण्यात आली आहे. यात नागपूर मेट्रो ,  माहिती तंत्रज्ञान ,  गोसीखुर्द प्रकल्प ,  जलयुक्त शिवार ,  कृषी पंपांना वीज पुरवठा ,  स्मार्ट नागपूर ,  औद्योगिक गुंतवणूक ,   शैक्षणिक प्रगती ,  आरोग्य सुविधा ,  मत्स विकास ,  खनिज संपत्ती आणि विविध जिल्ह्यातील नव्या उपक्रमांचा आढावा आहे. विदर्भातील बहुविध पर्यटन स्थळांचा रंजक वेध घेणाऱ्या लेखाचाही या अंकात समावेश करण्यात आला आहे. या अंकाची किंमत 10 रुपये आहे. हा अंक स्टॉलवर सर्वत्र उपलब्ध आहे. ००००
Image
जिल्हा वार्षिक योजनेतील विविध विकासकामांचा लघु गट समितीकडून आढावा अमरावती, दि. 5 : जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक योजनेत विविध कार्यालयांना प्राप्त गत वर्षातील निधी व खर्च, तसेच पुढील वर्षाचे नियोजन यांचा आढावा लघु गट समितीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवनात घेण्यात आला.  आमदार अनिल बोंडे व जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तायडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांच्यासह विविध अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यात मदर डेअरीतर्फे दूध संकलन सुरु असले तरी ते सर्वत्र नाही. शासकीय दुग्धशाळेची मोर्शी, परतवाडा आदी शीतकरण केंद्रे बंद आहेत. ती सुरु करण्यासाठी कार्यालयांनी प्रयत्न केला पाहिजे, असे डॉ. बोंडे यांनी सांगितले. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात गावांचे क्लस्टर निर्माण करुन मदर डेअरीतर्फे संकलन केंद्र सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पशुसंवर्धन विभागाच्या नादुरुस्त दवाखान्यांबाबत माहिती सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले. मत्स्यसंवर्धनाच्या अनुषंगाने संबंधित कार्यालयाच्या मत्स्यबीजवाटप आदी कामांबाबत तक्रारी य
Image
जिल्ह्यातील विकासकामांबाबत विभागीय आयुक्तांकडून आढावा  अपूर्ण कामांना गती द्यावी           - विभागीय आयुक्त पीयुष सिंह अमरावती, दि. 4 : जिल्ह्यातील विकासकामांबाबत वस्तुनिष्ठ माहिती सादर करावी, तसेच अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत,   असे निर्देश विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी विविध विभागांच्या अधिका-यांना दिले.              मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे बैठक घेऊन जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला होता. या बैठकीतील निर्देशांवर झालेली कार्यवाही आढावा व मुख्यमंत्र्यांसमोर करावयाचे सादरीकरण याबाबत विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासह विविध   विभागांचे अधिकारी उपस्थित होते.   मागील कामांचा आढावा घेतानाच गत वर्षातील प्रश्न, निर्णय व अंमलबजावणीचा आढावा यावेळी घेण्यात आला. राष्ट्रीयकृत बँकांनी केलेल्या खरीप कर्जवाटपाच्या तुलनेत यंदा जिल्हा सहकार