Posts

Showing posts from January, 2021

पालकमंत्र्यांनी घेतला जल जीवन मिशनचा आढावा

Image
  पालकमंत्र्यांनी घेतला जल जीवन मिशनचा आढावा पाणी पुरवठा योजनेतून प्रत्येक गावांना पिण्याचे पाणी -          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   जिल्ह्याचे उद्दिष्ट विहित मुदतीत पूर्ण करा 1588 गावांसाठी 4 लाख 56 हजार 621 कार्यात्मक नळजोडणी                  अमरावती , दि. 31 : केंद्र शासन पुरस्कृत जल जीवन मिशन राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या मिशनच्या अंमलबजावणीतून राज्यातील सर्व ग्रामीण कुटुंबांना सन 2024 पर्यंत वैयक्तिक नळ जोडणीव्दारे दरडोई प्रति दिन किमान 55 लिटर गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या मिशन अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील 1 हजार 588 गावांसाठी एकूण 4 लाख 56 हजार 621 कार्यात्मक नळजोडणी करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुरळीत नियोजन करुन पाणी पुरवठा योजनांची कामे विहित मुदतीत पूर्ण करा , असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी संबंधित यंत्रणांना दिले. या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावाला नियमितपणे पिण्याचे पाणी उपलब्ध होऊन पाणी टंचा

निधी अखर्चित राहिल्यास जबाबदारी विभागप्रमुखावर 14 फेब्रुवारीपूर्वी परिपूर्ण नियोजन सादर करा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे यंत्रणांना निर्देश

Image
  जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा निधी अखर्चित राहिल्यास जबाबदारी विभागप्रमुखावर                 14 फेब्रुवारीपूर्वी परिपूर्ण नियोजन सादर करा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे यंत्रणांना निर्देश   - आमझरी होणार ‘ मँगो व्हिलेज ’ - प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण - ‘ माझी वसुंधरा ’ मध्ये सौर ऊर्जा यंत्रणा   अमरावती , दि. 31 : जिल्हा नियोजनात नमूद कामे विहित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. पूर्वनियोजनात काही बदल आवश्यक असेल तर 14 फेब्रुवारीपूर्वी निधीसाठीचे परिपूर्ण नियोजन सादर करावे. त्यानंतर मात्र प्राप्त निधीतून सर्व कामे वेळेत पूर्ण होतील याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी. निधी अखर्चित राहता कामा नये , असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले. जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली ,   त्यावेळी त्या बोलत होत्या. खासदार रामदास तडस , माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील , आमदार सुलभाताई खोडके , आमदार सर्वश्री प्रताप अडसड , बळवंतराव वानख

जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरणाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Image
  जिल्ह्यात   पल्स पोलिओ लसीकरणाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ सुदृढ आरोग्यासाठी लसीकरणाबरोबरच उत्तम आहार महत्वाचा - महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर               अमरावती , दि. 31 : नियमित लसीकरणासह प्रसुतीआधी व बालकांच्या जन्मानंतर माता व बालकांना उत्तम आहारही मिळणे आवश्यक असते. त्यासाठी शासनातर्फे पोषण आहार योजनेसह मार्गदर्शन , जनजागृतीही करण्यात येते. माता व बालकांच्या कुटुंबियांनीही याचे महत्व लक्षात घेऊन त्यांच्या आहारात नैसर्गिक भाज्या , डाळी आदी प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या बाबींचा समावेश असेल याची काळजी घ्यावी , असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले. जिल्ह्यातील पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते आज सकाळी जिल्हा रुग्णालयात आज झाला , त्यावेळी त्या बोलत होत्या.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते रायन फर्नांडिस , सौरवी शिरीष किंडे , अभिषेक सोनू उईके , सागर

जिल्ह्यात 31 जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण

Image
  जिल्ह्यात 31 जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण शून्य ते पाच   वयोगटातील प्रत्येक मुलाला पोलिओचा डोस देण्याचे आवाहन               अमरावती , दि. 30:   जिल्ह्यात येत्या 31 जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेद्वारे शून्य ते पाच या वयोगटातील प्रत्येक मुलाला पोलिओचा डोस दिला जाणार आहे. जिल्ह्यात 1 लाख 72 हजार 430 बालकांचे लसीकरण होणार आहे.               मोहिमेत बुथ ॲक्टिविटीद्वारे ग्रामीण भागात 1 लाख 35 हजार 352 व नागरी भागात 37 हजार 78 अशा 1 लाख 72 हजार 430 बालकांचे लसीकरण होणार आहे. ग्रामीण भागात 1 हजार 763 व नागरी भागात 200 असे 1963 बुथ असतील. त्यासाठी जिल्ह्यात 4 हजार 830 स्वयंसेवकांचे मनुष्यबळ असेल.              सर्व बालकांना 100 टक्के लसीकरण झाले पाहिजे.   महामार्गावरील रस्त्याच्या बाजूला वास्तव्यास असलेली घरे , धाबे , शेतातील लाभार्थी , पूल व इमारतीच्या बांधावर असलेल्या मजुरांची बालके , भटक्या लोकांची बालके , याशिवाय बाजाराच्या दिवशी येणारे बालके या सर्वांचे लसीकरण व्हावे. त्यासाठी मोबाईल पथकांनी सर्वदूर पोहोचून मोहिम यशस्वी करावी , असे निर्देश पालकमंत्री ॲड
Image
  तिवसा पंचायत समितीचे लोकार्पण जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवा - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर   नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्यांचा सत्कार अमरावती , दि. ३० : तिवसा पंचायत समितीची सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी येथून व्हावी. जिल्ह्यात इतर ठिकाणी सुरू असलेली पायाभूत सुविधांची कामेही गतीने पूर्ण होतील. जनसामान्यांच्या   प्रगतीतूनच विकासाची नवी शिखरे गाठणे शक्य होत असते. हे लक्षात घेऊन प्रशासनाने काम करावे , असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा येथे केले. तिवसा पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण व नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्यांचा सत्कार पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाला , त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे , जि.प. अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख , उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण , माजी आमदार वीरेंद्र जगताप , पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे , उपसभापती शरद वानखडे , पूजा आमले ,

नेत्रदान चळवळ सर्वदूर पोहोचावी - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

Image
  लोकनेते स्व.भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त नेत्र तपासणी शिबिर नेत्रदान चळवळ सर्वदूर पोहोचावी  -  पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर   अमरावती ,  दि.  30  :  नेत्रदान चळवळीत अमरावती जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. ही चळवळ राज्यात सर्वदूर पोहोचावी ,  असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा येथे सांगितले. तिवसा येथे लोकनेते स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते ,  त्याचा शुभारंभ करताना त्या बोलत होत्या. जि. प. अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख ,  आमदार बळवंतराव वानखडे ,  माजी आमदार वीरेंद्र जगताप ,  तिवसा येथील नगराध्यक्ष वैभव वानखडे ,  जि. प. सभापती बाळासाहेब हिंगणीकर ,  महिला व बालकल्याण सभापती पूजा आमले ,  वैद्यकीय अधिकारी पावन मालूसुरे , दिलीपभाऊ काळबांडे ,  मुकुंदराव देशमुख ,  योगेश वानखडे ,  अंकुश देशमुख ,  सागर राऊत ,  दिवाकर भुरभुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सकाळपासून शिबिरात तपासणीला येणाऱ्याचा ओघ सुरू झाला.असंख्य रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. नेत्र तपासणी नंतर गरजूंना नेत्र

ज्ञानसंस्कृती संवर्धन व विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी वाचनालय व अभ्यासिका उपयुक्त - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

Image
  तिवसा पोलीस ठाण्यात अभ्यासिका शुभारंभ ज्ञानसंस्कृती संवर्धन व विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी वाचनालय व अभ्यासिका उपयुक्त - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर         अमरावती , दि. 30 :   ज्ञानसंस्कृती वृद्धिंगत करणे , विद्यार्थ्याना अध्ययन साधने व अभ्यासासाठी हक्काचे ठिकाण मिळवून देणे यासाठी वाचनालय व अभ्यासिकेची आवश्यकता असते. तिवसा येथे अभ्यासिका सुरू होत आहे. त्याचा विनियोग करत विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास   व परिश्रमाच्या बळावर यश संपादन करावे , असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा येथे केले. तिवसा पोलीस ठाण्याच्या परिसरात सर एपीजे अब्दुल कलाम बहुउद्देशीय सभागृह व वाचन अभ्यासिकेचा शुभारंभ करताना त्या बोलत होत्या. यावेळी तिवस्याचे नगराध्यक्ष वैभव वानखेडे , पंचायत समिती सभापती श्रीमती पूजा आमले , पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. , अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे , उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव , तिवसा तहसीलदार वैभव फरतारे , तिवसा पोलीस निरीक्षक रिता उईके , सहायक पोलीस निरीक्षक विवेकानंद भारती , राजेश पांडे , शैलेश

चांदूर बाजार येथे शासकीय तूर खरेदीचा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते शुभारंभ

Image
चांदूर बाजार येथे शासकीय तूर खरेदीचा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते शुभारंभ                अमरावती, दि. २९: चांदुर बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज शासकीय तूर खरेदीचा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. खरेदी विक्री केंद्राचे अध्यक्ष शिवाजीराव बंड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री. भारंबे, दि विदर्भ को ऑप मार्केटिंग फेडरेशन ली. चे पणन व्यवस्थापक उमेश देशपांडे, खरेदी विक्री केंद्राचे व्य वस्थापक अशोक सीनकर यांचेसह शेतकरी बांधव आदी यावेळी उपस्थित होते.          ६ हजार रुपये शासकीय तूर खरेदीचा हमी भाव तूर विक्रीसाठी आणनाऱ्या शेतकऱ्यासाठी निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती चांदुर बाजार खरेदी विक्री केंद्राचे व्यवस्थापक यांनी दिली. कोरोनाकाळात शेती क्षेत्रापुढे अनेक अडचणी आल्या. त्यावर मात करत महाविकास आघाडी शासनाने शेतकरी हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले व त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. गत १० वर्षात झाली नाही एवढी विक्रमी कापूस खरेदी झाली. तूर खरेदीलाही आरंभ झाला आहे. अधिकाधिक तूर खरेदी उत्पाद

कृषीपंप वीज धोरणाचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - बच्चूभाऊ कडू यांचे आवाहन

Image
  कृषीपंप वीज धोरणाचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा                      - बच्चूभाऊ कडू यांचे आवाहन तालुकास्तरीय क्रिडा संकुलात सर्व सुविधा निर्माण करा   अमरावती, दि. 29 : कृषीपंप वीज धोरण-2020 राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, कृषी ग्राहकांना वीज बील थकबाकीची रक्कम भरणा करण्यासाठी सवलत दिली जात आहे. वसूल होणारी सवलतीची रक्कम संबंधित ग्राम पंचायतीत विकासनिधी म्हणून जमा होऊन गावांच्या विकासाला हातभार लागू शकतो. त्यामुळे या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी चांदूर बाजार येथे केले.             चांदूर बाजार तहसील कार्यालयात राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली क्रिडा व उर्जा विभागाचा सविस्तर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव, चांदूर बाजारचे तहसीलदार धिरज स्थुल, जिल्हा क्रिडा अधिकारी गणेश जाधव, कार्यकारी अभियंता दिपक आघाव, उपकार्यकारी अभियंता जयंत घाटे, श्री. वानख