Posts

Showing posts from January, 2022

जिल्ह्यात 19 कोटी 68 लक्ष रु. निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

Image
  जिल्ह्यात 19 कोटी 68 लक्ष रु. निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पांदणरस्त्यांची अधिकाधिक कामे होण्यासाठी प्रशासनाने सर्वंकष प्रयत्न करावे - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. 31 :   जिल्ह्यात आवश्यक पायाभूत सुविधांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. अनेक कामांना चालना मिळाली आहे. मुख्य रस्ते व पूलांच्या कामांबरोबरच पांदणरस्त्यांच्या कामांनाही गती द्यावी. त्यादृष्टीने प्रशासनाने सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.   पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन आज झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. जळका हिरापूर येथे ३ कोटी रुपये निधीतून टाकरखेडा पुसदा रोहणखेडा प्रजिमा   रस्त्याची सुधारणा, साऊर येथे दोन कोटी रूपये निधीतून अंजनगाव काकडा पूर्णानगर साऊर शिराळा रस्ता सुधारणा, सोनारखेडा येथे तीन कोटी रुपये निधीतून पूर्णानगर निरुळ गंगामाई रस्ता रामा ३०१ वर लहान पुलाचे बांधकाम, तसेच खोलापूर येथे ५ कोटी ३० लक्ष निधीतून पूर्णानगर निरुळ वाठोडा खोलापूर रामा ३०१ रस्ता सुधारण

हमीभाव तूर खरेदीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Image
  हमीभाव तूर खरेदीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ   अमरावती, दि.31 : केंद्र शासनाच्या आधारभूत योजनेत हंगाम 2022 च्या शेतमाल तूर हमी भाव खरेदीचा शुभारंभ राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झाला.              अमरावती कृउबासचे सभापती विजय दहिकर, सचिव दीपक विजयकर, माजी जि. प. सभापती जयंतराव देशमुख, हरिभाऊ मोहोड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजन होऊन तूर खरेदीचा शुभारंभ झाला.   पालकमंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या की, कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेऊन शेतकरी बांधव, हमाल, कष्टकरी यांच्यासाठी विविध उपक्रम राबवावेत. समितीच्या माध्यमातून शेतकरी बांधव व कष्टक-यांसाठी अनेक उत्तमोत्तम बाबींची अंमलबजावणी करता येणे शक्य आहे. त्यानुसार प्रस्ताव द्यावेत. आवश्यकतेनुसार शेड व इतर सुविधा आदी बाबींची पूर्तता करून घ्यावी.   यंदा तुरीचा हमीभाव सहा हजार 300 रुपये निश्चित करण्यात आला आहे. अधिकाधिक शेतकरी बांधवांचा या प्रक्रियेत समावेश करावा व कुणीही वंचित र

टाकरखेडा शंभू (आष्टी) ३३/११ केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण

Image
  टाकरखेडा शंभू (आष्टी) ३३/११ केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण अमरावती जिल्ह्याच्या ऊर्जाविकासासाठी २२ उपकेंद्रे प्रस्तावित -    ऊर्जा मंत्री नितीन राऊत अखंडित व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठ्यासाठी अनेक विकास कामांना चालना -   पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर   अमरावती,   दि. ३१ : ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता अमरावती जिल्ह्याच्या ऊर्जाविकासासाठी   सुधारित वितरण क्षेत्रीय पद्धतीत (आरडीएसएस योजनेत)   ३३/११ केव्हीचे २२ उपकेंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत,   असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले.                    उच्च दाब वितरण प्रणाली योजनेत (HVDS)   ६ कोटी ३८ लाख रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या टाकरखेडा शंभू (आष्टी) ३३/११ केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण प्रसंगी उदघाटक म्हणून ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत आभासी पद्धतीने उपस्थित होते. प्रत्यक्ष लोकार्पण सोहळा टाकरखेडा येथे पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला.    कार्यक्रमाला   महावितरणचे   अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक   विजय सिंघल,   संचालक (संचलन) संजय ताकसांडे,   प्रादेशिक संचालक सुहास रं

जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
  जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   पालकमंत्र्यांच्या हस्ते 18 कोटीच्या निधीतून होणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन   अमरावती , दि. 30 : गावात दर्जेदार शैक्षणिक सुविधा , उत्कृष्ट   शालेय इमारती , वर्गखोल्या , प्राथमिक आरोग्य सुविधा , तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांनी सुसज्ज रुग्णालये यासह इतर भौतिक सुविधा , अद्ययावत व्यायामशाळा , परिसराचे सौंदर्यीकरण , सभागृहे , विश्रामगृहे , ग्रामपंचायत इमारती आदींची निर्मिती करतांना जिल्ह्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल , अशी ग्वाही जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिली.   विविध योजनेअंतर्गत 17 कोटी 85 लक्ष रुपये प्राप्त निधीतून मोर्शी तालुक्यातील गावांमध्ये   विकासकामांचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांनी केले. गावात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांची निर्मिती करावी. गावातील नागरीकांच्या सुविधेसाठी कामे गतीने पूर्ण करावी असे निर्देश त्यांनी संबंधिताना दिले. मोर्शी तालुक्याचे उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले , तहसीलदार सागर ढवळे आदी उपस्थित यावेळी होते.   मोर्शी तालु

डिजिटल अंगणवाड्या व इतर पायाभूत सुविधा सर्वदूर उभारणार - महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर

Image
  विकासकामांना चालना ; डिजिटल अंगणवाडी व अनेक कामांचे भूमीपूजन डिजिटल अंगणवाड्या व इतर पायाभूत सुविधा सर्वदूर उभारणार - महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर   अमरावती , दि. २९ : बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी अधिक सक्षम व अद्ययावत करण्यासाठी डिजिटल अंगणवाडी प्रकल्प राबविण्यात येत आहे. अमरावती तालुक्यात पाच डिजीटल अंगणवाडी निर्माण होणार असून जिल्ह्यातही ठिकठिकाणी डिजीटल अंगणवाड्या निर्माण होतील , असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले. जिल्ह्यात दीड कोटी रुपयांहुन अधिक निधीतून विविध विकासकामांचे भूमीपूजन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाले , त्यावेळी त्या बोलत होत्या. यावली शहीद येथे १५ लक्ष निधीतून बसस्थानक ते जन्मस्थान मार्गाचे काँक्रीटीकरण व १५ लक्ष निधीतून एमआरजीईएस अंतर्गत डिजिटल अंगणवाडीचा कामाचे , तसेच देवरी येथे ९ लक्ष रुपये निधीतून काँक्रीट रस्ता , पुसदा येथे ८ लक्ष निधीतून काँक्रीट रस्ता , नांदुरा किरकटे येथे १० लक्ष निधीतून रस्ता काँक्रीटीकरण , ८

सावर्डी वन क्षेत्रात ऑक्सिजन पार्क निर्माण होणार - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

Image
  वनक्षेत्र विकासासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात ; पालकमंत्र्यांचे निर्देश सावर्डी वन क्षेत्रात ऑक्सिजन पार्क निर्माण होणार - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर   अमरावती , दि. २९ : वनक्षेत्र विकास , पर्यावरण संवर्धनासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवणे आवश्यक असून , त्याअंतर्गत सावर्डी वन क्षेत्रात ऑक्सिजन पार्क निर्माण होणार आहे. येथील नैसर्गिक वनसंपदेचे रक्षण करतानाच एक सुंदर उपवन त्यानिमित्त उभे राहणार आहे , असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले. नांदगावपेठनजिक वन वाटिका वनक्षेत्र सावर्डी निसर्ग अभ्यासिका क्षेत्रात ऑक्सिजन पार्क कामाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला , उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत , तहसीलदार संतोष काकडे , वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वन क्षेत्र विकासाच्या अनुषंगाने १ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की , वन क्षेत्र विकास व पर्यावरण संवर्धनासाठी अभिनव संकल्पना राबवणे आवश्यक आहे. त्यानुसार वनविभागा