Posts

Showing posts from 2021

नागरिकांनी नियमांचे पालन करावे - जिल्हाधिकारी पवनीत कौर

Image
  ‘ओमायक्रॉन’  प्रतिबंधासाठी  सुधा रि त निर्बंध जारी नागरिकांनी नियमांचे पालन करावे -          जिल्हाधिकारी पवनीत कौर             अमरावती, दि. ३१ :  ओ माय क्रॉन प्रकाराच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्‍ती व्यवस्थापन,   मदत आणि पुनर्वसन विभागाकडून  सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. या सूचना संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागासाठी आजपासून पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात आल्या आहेत. तसे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी निर्गमित केले आहेत.   त्यानुसार       लग्‍नसोहळा व लग्‍नसमारंभाच्‍या बाबतीत   ,   बंदिस्त जागा ,   हॉल ,   मेजवानी/मॅरेज हॉल इ. तसेच    खुल्‍या जागेकरिता    उपस्थितांची   मर्यादा   ५०   पेक्षा जास्‍त ठेवता येणार नाही.    इतर सामाजिक ,   राजकीय किंवा धार्मिक कार्ये आणि मेळाव्याच्या बाबतीत ,   जेथे उपस्थितांची उपस्थिती   बंद जागेसाठी आणि खुल्या जागेसाठी   ५०    पेक्षा जास्‍त ठेवता येणार नाही.  अंत्यविधीसाठी उपस्थितांची मर्यादा  २०   व्‍यक्‍ती एवढी मर्यादित आहे.        जि ल्ह्या च्‍या कोणत्याही भागात जी पर्यटन स्थळे

नववर्षाचे स्वागत दक्षता पाळून करा - जिल्हाधिकारी पवनीत कौर

Image
  नववर्षाचे स्वागत दक्षता पाळून करा - जिल्हाधिकारी पवनीत कौर   अमरावती, दि. 31: ओमायक्रॉन   व्हेरिएंट व कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर, नववर्षाचे स्वागत करताना दक्षतेचेही पालन व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.   शासनाने याबाबत मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. नागरिकांनी नववर्षाचे स्वागत घरीच साजरे करावे. रात्री 9 ते सकाळी 6 दरम्यान संचारबंदी लागू आहे. त्याचे काटेकोर पालन व्हावे.   नववर्ष स्वागत विशेष कार्यक्रमासाठी बंदिस्त सभागृहात क्षमतेच्या 50 टक्के व खुल्या जागेत 25 टक्के मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी आहे. ज्येष्ठ व बालकांनी घराबाहेर पडणे टाळावे. आतषबाजी टाळावी. मास्क, सोशल डिस्टन्स व स्वच्छता आदी नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले आहे.   00000

जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील दीड लाख मुलांचे होणार लसीकरण नोंदणी शनिवारपासून, लसीकरण 3 जानेवारीपासून - जिल्हाधिकारी पवनीत कौर

Image
  जिल्हाधिका-यांनी घेतला लसीकरणाचा आढावा जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील दीड लाख मुलांचे होणार लसीकरण नोंदणी शनिवारपासून, लसीकरण 3 जानेवारीपासून   -            जिल्हाधिकारी पवनीत कौर अमरावती, दि. 30 : शासनाच्या निर्देशानुसार 15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण, तसेच हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर, 60 वर्षे व त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. त्यानुसार कुमारवयीन वयोगटातील अमरावती जिल्ह्यात 1 लाख 49 हजार 956 आणि 60 वर्षांवरील व सहव्याधी असलेल्या 71 हजार 963 व्यक्तींचे लसीकरण दि. 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. कुमार वयोगटासाठीची कोविन ॲपद्वारे नोंदणी 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे. याबाबत जिल्ह्यातील ग्रामीण भागात व महापालिका क्षेत्रात परिपूर्ण नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले.               जिल्हाधिका-यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात लसीकरणाचा आढावा घेतला, तसेच नव्याने करावयाच्या लसीकरणाचे परिपूर्ण नियोजन करण्याचे निर्देश दिले. आरोग्य विभागासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोविड

कोविड प्रतिबंधक लसीकरण उद्दिष्टपूर्तीमध्ये तिवसा तालुका अव्वल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

Image
    कोविड प्रतिबंधक लसीकरण उद्दिष्टपूर्तीमध्ये तिवसा तालुका अव्वल   जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव   भातकुलीचा दुसरा तर धामणगाव रेल्वेचा तिसरा क्रमांक अमरावती, दि. 30 : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी 11 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत सर्वाधिक लसीकरण केलेल्या तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांचा जिल्हाधिकारी पवनीत कौर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आला. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या मात्रेची 94.90 टक्के लसीकरण केल्यामुळे जिल्ह्यामध्ये तिवसा तालुक्याचा प्रथम क्रमांक आला आहे. तर भातकुली येथे 87.73 टक्के लसीकरण केल्यामुळे दुसरा क्रमांक आला असून धामणगाव रेल्वे येथे 87.1 टक्के लसीकरण पूर्ण केल्यामुळे तृतीय क्रमांक आला आहे. येथील तालुका आरोग्य अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना यावेळी प्रशस्तीपत्र तसेच धनादेश देऊन गौरविण्यात आले. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या डोसची उद्दिष्टपूर्ती केल्यामुळे तिवस्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जोत्स्ना पोटपिटे-देशमुख यांना 20 हजाराचा धनादेश व प्रशस्तीपत्र,

जिल्हाधिका-यांकडून चिखलद-यात लसीकरणाचा आढावा

Image
  जिल्हाधिका-यांकडून चिखलद-यात लसीकरणाचा आढावा मेळघाटात संपूर्ण लसीकरणासाठी काटेकोर नियोजन करावे - जिल्हाधिकारी पवनीत कौर   अमरावती, दि. २९ : मेळघाटात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रभावी जनजागृती व नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज चिखलदरा येथे दिले.   मेळघाटातील लसीकरणाचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार माया माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले आदी उपस्थित होते. 100 शेततळे योजनेचा शुभारंभही यावेळी जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत झाला. महान ट्रस्टतर्फे लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे. त्याची व लसीकरण केंद्रांची पाहणी जिल्हाधिका-यांनी केली. तहसील कार्यालय व नगरपरिषद कार्यालयालाही भेट देऊन त्यांनी कामाची माहिती घेतली. लसीकरणाबाबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, लसीकरणाचे काम अधिक काटेकोर व निर्दोष नियोजनातून पूर्ण झाले आहे. लसीकरण पथकांनी गावात सकाळी लवकर पोहोचणे आवश्यक आहे. नंतर शेतकरी बांधव शेतांकडे निघून जातात. टेंभूरसोडा येथे पथक उशिरा

जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान; तत्काळ पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

Image
जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान ; तत्काळ पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश एकही बाधित मदतीपासून वंचित राहता कामा नये - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर   अमरावती , दि. २८ : जिल्ह्यात अवकाळी पावसाने व काही ठिकाणी गारपिटीने विवीध भागात नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागात तत्काळ व सविस्तर पंचनामे करावेत. एकही बाधित व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये , असे स्पष्ट निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.   जिल्ह्यात आज ठिकठिकाणी पाऊस पडून नुकसान झाले. चांदुर रेल्वे तालुक्यातील मौजे तळेगाव दशासर येथील गजानन बापुराव मेंढे (वय ४०) यांचा आज सायंकाळी वीज पडून मृत्यू झाला. त्यांच्या कुटूंबियांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल. शासन आपद्ग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे , अशी ग्वाही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.   नुकसानाची सविस्तर माहिती घ्या   मोर्शी , चांदुर बाजार या तालुका परिसरात काही ठिकाणी गारपीट झाली आहे. याबाबत व इतरही ठिकाणी पावसाने झालेल्या   नुकसानाचे सविस्तर पंचनामे प्रशासनाने तत्काळ सुरू करावेत. प्र

'तपोवन'चा अमृतमहोत्सव : पद्मश्री शिवाजीराव पटवर्धन यांची १३० वी जयंती

Image
'तपोवन'चा अमृतमहोत्सव : पद्मश्री शिवाजीराव पटवर्धन यांची १३० वी जयंती दाजीसाहेबांचे मानवसेवेचे व्रत समर्थपणे व एकजुटीने पुढे नेऊया -           न्यायमूर्ती भूषण गवई               अमरावती, दि. १२ : मानवसेवा हाच धर्म मानून पद्मश्री शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांनी कार्य केले. त्यांचा वारसा तपोवन येथील संस्था समर्थपणे सांभाळत आहे. आपण सर्व अमरावतीकर मिळून मानवसेवेचे हे व्रत एकजुटीने नेऊया, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज येथे केले.    विदर्भ महारोगी सेवा मंडळातर्फे तपोवन येथे संस्थेचे संस्थापक पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांची १३० वी जयंती व संस्थेचा अमृत महोत्सवी सोहळा तेथील शिवउद्यान परिसरात झाला. त्याला प्रमुख अतिथी म्हणून न्यायमूर्ती श्री. गवई उपस्थित होते. तपोवन संस्थेचे अध्यक्ष डॉ. अतुल आळशी अध्यक्षस्थानी होते. माजी लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवई, जोग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश सावदेकर, श्री अंबादेवी संस्थानच्या अध्यक्ष श्रीमती विद्याताई देशपांडे, डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या प्

उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती तालुका स्तरावर स्थापन करा - निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बीजवल

Image
  उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती तालुका स्तरावर स्थापन करा                                                                     - निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बीजवल   अमरावती,दि 28:  जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बीजवल यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. पोलीस अधिक्षक (ग्रामीण) अविनाश बारगड, सहा.पोलीस आयुक्त  गजानन खिल्लारे तसेच समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार आदी यावेळी  उपस्थित होते. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 अंतर्गत अत्याचारग्रस्त व्यक्तींना देण्यात आलेल्या आर्थिक सहाय्य आणि मदत  प्रकरणांचा यावेळी आढावा घेण्यात आला. माहे 1 जानेवारी   ते 30 नोव्हेंबर 2021 अखेर दाखल प्रकरणे व अर्थसहाय्याची माहिती पोलीस विभागाची कारवाई सभेत सादर करण्यात आली.  जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले. त्यावर पोलीस तपासावरील प्रकरणे निकाली काढण्यास मा.उच्च न्यायालय यांना विनंती करुन या स्तरावरून याबाबत पाठपुरावा करावा, असे आदेश यावेळी देण्यात आले. ज्या प्रकरणामध्ये जातीचे प्रमाणपत्र प्रा

तिर्थक्षेत्रांच्या कामांचे प्रस्ताव द्या; आवश्यक निधी मिळवून देऊ - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

Image
  तीर्थक्षेत्र विकास आढावा बैठक तिर्थक्षेत्रांच्या कामांचे प्रस्ताव द्या ; आवश्यक निधी मिळवून देऊ - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर   अमरावती , दि. २६ : तीर्थक्षेत्र व महत्वाच्या स्थळांचे स्वतंत्र विकास आराखडे तयार करून विविध सुविधांच्या उभारणीतून पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील महत्वाच्या तीर्थस्थळी आवश्यक कामांचे परिपूर्ण प्रस्ताव शासनाला सादर करावेत. या कामांसाठी आवश्यक निधी मिळवून देऊ , अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड.यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली. जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकासाबाबत आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झूम प्रणालीद्वारे झाली , त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार देवेन्द्र भुयार , जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्यासह महसूल , जिल्हा परिषद , सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील श्री क्षेत्र रिध्दपूर , श्रीक्षेत्र कपिलेश्वर देवस्थान उर्फ महादेव संस्थान , गव्हाणकुंड , श्रीक्षेत्र मुदगलेश्वर भारती महाराज संस्थान , अंबाडा ,   श्रीक्षेत्र यशवंत महाराज संस्थान , मु

गुरूदेवनगर येथील शिबिरात दिव्यांग बांधवांची तपासणी; त्यांना विनामूल्य उपकरणे मिळणार आतापर्यंतच्या शिबिराचा दोन हजारहून अधिक दिव्यांग बांधवांना लाभ -पालकमंत्री यशोमती ठाकूर

Image
  ‘सेवा माह’ उपक्रमातून गरजूंना आवश्यक सेवा- सुविधा गुरूदेवनगर येथील शिबिरात   दिव्यांग बांधवांची तपासणी; त्यांना विनामूल्य उपकरणे मिळणार आतापर्यंतच्या शिबिराचा दोन हजारहून अधिक दिव्यांग बांधवांना लाभ -पालकमंत्री यशोमती ठाकूर अमरावती, दि. 23 :   केंद्रिय दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग व मोझरी येथील श्री रामचंद्र युवक कल्याण संस्थेतर्फे विविध तालुक्यांतील दिव्यांग बांधवांची तपासणी शिबिरे ठिकठिकाणी घेण्यात येत आहेत. त्याअंतर्गत आज गुरुदेवनगर मोझरी येथील मल्टिपर्पज हॉलमध्ये झालेल्या शिबिरात 537 दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत विविध ठिकाणी झालेल्या शिबिरांमध्ये दोन हजारहून अधिक दिव्यांग बांधवांनी लाभ घेतला आहे.             दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग व श्री रामचंद्र युवक कल्याण संस्थेतर्फे लोकनेते स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त 28 जानेवारीपर्यंत संपूर्ण महिना ‘सेवा माह’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार ‘एडिप’ योजनेत दिव्यांग बंधूभगिनींना पहिल्या टप्प्यात तपासणी व दुस-या टप्प्यात उपकरण व आवश्यक साहित्याचे विनामूल्य वाटप करण्यात येणार असून, अनुदानाव