Posts

Showing posts from September, 2016
Image
महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची सह व्यवस्थापकीय संचालक यांची पहाणी * शेतकऱ्यांना व्यावहारिक फायदे लक्षात आणून द्या             अमरावती, दि.21 (जिमाका): विदर्भातील शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे, शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला अधिक शिघ्र गतीने मोठ्या बाजारपेठेमध्ये पोहचविण्यासाठी व्यवस्था निर्माण असावी, शेतकऱ्यांना आपल्या शेतमालावर प्रक्रिया करुन त्यांचा अधिक लाभ घेता यावा या करीता महाराष्ट्र कृषि समृद्धी विकसित करणे आणि त्या कृषि समृद्ध केंद्राला नागपूर व मुंबईला जोडण्यासाठी महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असुन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांनी नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय ई-क्लास, एमआयडीसी, धामणगाव रेल्वे येथील जागेची पहाणी केली.           या उच्चस्तरीय पहाणी पथकात सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांच्यासह जिल्हाधिकारी किरण गित्ते, एमएसआरडीसी चे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधिक्षक अभियंता सुनिल देशमुख, इंडिया मॅजिक आयचे राजेश देशमुख, कार्यकारी अभियंता घोडके, कार्यकारी अभियंता हेमंत दवे, अन्य वरिष्ठ अधिकारी, उपविभागीय अधिकार
भातकुली तालुक्यातील 21 गावांमध्ये रास्तभाव दुकान मंजुरीसाठी स्वयंम सहाय्यता बचत गटांकडून अर्ज आमंत्रित *जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन             अमरावती दि.21 (जिमाका): शासन आदेशानुसार रास्तभाव दुकाने स्वयं सहाय्यता महिला बचत गटांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के वानखडे यांनी भातकुली तालुका क्षेत्रातील 21 गावांकरीता दि. 20 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर 16 दरम्यान संबंधितांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.              दि. 20 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर 16 दरम्यान भातकुली तालुक्यातील परलाम, नवथाळ बु., चेचरवाडी, उमरापुर, ततारपुर, इब्राहिमपुर, उदापुर, मक्रमपुर, नारायणपुर, वंडली, बोकुरखेडा, मलकापुर, कृष्णापुर, कोलटेक, निंदोळी, बैलमारखेडा, सरमसपुर, अडवी, डेंगुरखेडा, काकरखेडा, मक्रंदाबाद या गावात रास्तभाव दुकानांसाठी स्वयं सहायता महिला बचत गटांना अर्ज सादर करण्याचे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधीत महिला बचतगटांना अर्ज कार्यालयीन वेळेत भातकुली तहसील कार्यालयामध्ये विक्री व स्वीकृत केल्या जातील.              जिल्ह
22 सप्टेंबरच्या सकाळी 8 वाजता पासुन ते मराठा मुक मोर्चा संपेपर्यत शहरात कलम 33 (1) (ब) लागू             अमरावती, दि.20 (जिमाका): मराठा समाजाला आरक्षण मिळावे व इतर मागण्याकरीता सकल मराठा समाज बांधव अमरावती जिल्हा तर्फे दि.22 सप्टेंबर, 16 रोजी मराठा क्रांती मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्च्यासाठी अमरावती जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाहनासह नागरिक नेहरु मैदान येथे एकत्रित होवून नेहरु मैदान येथून मुक मोर्चाची सुरुवात करणार आहे. मोर्चा हा नेहरु मैदान-राजकमल चौक-शाम चौक-जयस्तंभ चौक-मालविय चौक-मर्च्युरी टी पॉईंट-इर्विन चौक-गर्ल्स हायस्कुल चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे.           मोर्चाच्या या मार्गामध्ये वाहतुकीची कोंडी निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्या दृष्टीने मुंबई पोलिस कायदा कलम 33 (1) (ब) अन्वये तसेच मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये पोलिस उपायुक्त (मुख्यालय) अमरावती शहर शशीकुमार मीणा यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार अमरावती शहरात दि.22 सप्टेंबर, 16 चे सकाळी 8 ते मोर्चा संपेपर्यंत खालील
Image
शहिद जवान पंजाब उर्फ विकास जानराव उईके यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार * पालकमंत्री प्रविण पोटे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली * बंदुकीच्या फैरी झाडुन पोलिसांनी दिली मानवंदना             अमरावती, दि.20 (जिमाका): जम्मु कश्मीर मधील उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर रविवारी पहाटे दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला त्यात अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील जवान पंजाब उर्फ विकास जानराव उईके हे शहिद झाले. नांदगाव खंडेश्वर येथील लाखानी मैदानावर शहिद जवान पंजाब उईके यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.           महाराष्ट्र शासनाच्या वतीने पालकमंत्री प्रविण पोटे यांनी शहिद पंजाब उईके यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. सैन्यदलाच्या वतीने कॅप्टन आशिष चंदेल, नायक सुभेदार एल.जी.ढोले, नायक सुभेदार एन.पी.जिवन तसेच प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी किरण गित्ते, पंजाब उईके यांचे वडील व आर्मीमध्ये सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक जानराव उईके यांनीही पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. यावेळी पोलिसांच्या वतीने बंदु
पालकमंत्री प्रविण पोटे यांचा दि.20 ते 23 सप्टेंबर पर्यतचा सुधारित अमरावती जिल्हा दौरा             अमरावती, दि.19 (जिमाका): अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग, खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळुन) राज्यमंत्री प्रविण पोटे हे दि.20 ते 23 सप्टेंबर, 16 पर्यंत अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा तपशिल दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.             दि.20 सप्टेंबर, 16 रोजी सकाळी 5.50 वाजता मुंबईवरुन बडनेरा, अमरावती येथे आगमन व शासकीय मोटारीने राठीनगर, निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 6.30 वा. राठीनगर निवासस्थानी आगमन व राखीव. सकाळी 10 वा. राठीनगर येथून शासकीय वाहनाने नांदगांव खंडेश्वर, जि.अमरावती कडे प्रयाण. सकाळी 10.45वा. नांदगांव खंडेश्वर येथे शहीद विकास जानराव उईके या जवानास श्रद्धांजली, कुटुंबियांशी भेट व सांत्वन. दुपारी 12 वा. नांदगांव खंडेश्वर येथून शासकीय मोटारीने अमरावतीकडे प्रयाण. दुपारी 12.45 वा. शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे आगमन व अभ्यागतांना भेटी. दुपारी 3 वा. स्थानिक विविध कार्यक्रमास उपस्थिती. सायं 7 वा. परीगणित कॉलनी, शामनगर येथे पदवीधर
पालकमंत्री प्रविण पोटे दि.20 ते 25 सप्टेंबर पर्यत    अमरावती जिल्हा दौऱ्यावर             अमरावती, दि.19 (जिमाका): अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग, खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळुन) राज्यमंत्री प्रविण पोटे हे दि.20 ते 25 सप्टेंबर, 16 पर्यंत अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा तपशिल दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.             दि.20 सप्टेंबर, 16 रोजी सकाळी 5.50 वाजता मुंबईवरुन बडनेरा, अमरावती येथे आगमन व शासकीय मोटारीने राठीनगर, निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 6.30 वा. राठीनगर निवासस्थानी आगमन व राखीव. सकाळी 10 वा. राठीनगर येथून शासकीय वाहनाने नांदगांव खंडेश्वर, जि.अमरावती कडे प्रयाण. सकाळी 10.45वा. नांदगांव खंडेश्वर येथे शहीद विकास जानराव उईके या जवानास श्रद्धांजली, कुटुंबियांशी भेट व सांत्वन. दुपारी 12 वा. नांदगांव खंडेश्वर येथून शासकीय मोटारीने अमरावतीकडे प्रयाण. दुपारी 12.45 वा. शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे आगमन व अभ्यागतांना भेटी. दुपारी 3 वा. स्थानिक विविध कार्यक्रमास उपस्थिती. सायं 7 वा. परीगणित कॉलनी, शामनगर येथे पदवीधर मतदार सं
शहीद पंजाब उर्फ विकी जानराव उईके यांचा संक्षिप्त परिचय        अमरावती, दि.19 (जिमाका) : उरी येथील दहशतवादी हल्यात शहीद झालेले जिल्ह्याचे सुपुत्र यांचा संक्षिप्त परिचय. नाव : श्री पंजाब उर्फ विकी जानराव उईके वय : 26 वर्षे जन्म दि. : 7 सप्टेंबर 1990 आईचे नाव : सौ. बेबी वडीलांचे नाव : श्री जानराव उईके (माजी सैनिक-भारतीय सेना) सेवा : 30 वर्षे भरतीचे ठिकाण : चंद्रपुर 2009 आर्मी पोस्टींग :    2009 रेजीमेंट बिहार बटालीयन ट्रेनिंग- उडीसा चायना बॉर्डर- आसाम न्युजलपैईगुडी व आता जम्मु काश्मीर उरी येथे सेवेत रुजु होते. भाऊ : एक, वय - वर्ष 30 बहिण : प्रिती (विवाहित) जवाई : गजानन इरपाते (बीएसएफ मध्ये कार्यरत कच्छ- गुजरात)           पंजाब उर्फ विकी यांचे तीन दिवसापुर्वीच घरच्यांशी संवाद झाला होता. 00000 वाघ/गावंडे/कोल्हे/दि.19-09-2016/16-20 वाजता
Image
कुष्ठरोग शोध मोहिमेतंर्गत भव्य सायकल स्वास्थ्य रॅलीला जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दाखविली हिरवी झेंडी           अमरावती, दि.19 (जिमाका) : जिल्ह्यात दि.19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोंबर 16 दरम्यान कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत सोमवार दि.19 सप्टेंबर 16 रोजी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग), विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन व डॉ. गोविंद कासट मित्र मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 8.30 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन चौक) ते विदर्भ महारोगी सेवा मंडळ, तपोवन पर्यत सायकल स्वास्थ्य रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी रॅलीला हिरवी झेंडी शुभारंभ केला.           रॅलीच्या उद्धाटनाप्रसंगीत सह संचालक कुष्ठरोग पुणे डॉ. संजीव कांबळे, डॉ. टी. एम. आऊलवार, लाएन्स प्रिमियम अध्यक्ष डॉ. पंकज घुंडीयाल,जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अरुण राऊत, वरिष्ठ समाज सेवक डॉ. गोविंद कासट प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित मान्यवर व सायकल रॅली मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व सायकल चालविणाऱ्यांना कुष्ठरोग शोद मोहिमेचा संदेश देणारी कॅप देऊन त्यांचे स्वागत करण्य
शहीद विकास उईके यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने येणार           अमरावती, दि.19 (जिमाका) : उत्तर कश्मीर मधील ऊरी येथे झालेल्या दहशतवादी हल्यातील शहिद व अमरावतीचे सुपुत्र शहीद विकास जानराव उईके यांचे यांचे पार्थिव आज सायंकाळपर्यंत नाशिकवरुन विशेष हेलिकॉप्टरने नागपूर व तेथून अमरावती मार्गे नांदगाव खंडेश्वर येथे आणण्यात येणार आहे. पालकमंत्री प्रविण पोटे व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दखल घेवून याबाबत वरिष्ठस्तरावर संपर्क केला. पार्थिव विशेष विमानाने सोनेगाव (नागपूर) येथील एअर फोर्सच्या बेसवर आणण्यात येईल. जिल्हा प्रशासनातर्फे तहसिलदार व नातेवाईक लष्करांकडून शहीद विकास उईके यांचे पार्थिव स्विकारतील व पार्थिव नांदगाव येथे आणण्यात येईल. याबाबतीत जिल्हा प्रशासन वरिष्ठांच्या संपर्कात असुन आज सायंकाळपर्यंत उईकेंचे पार्थिव येईल असे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सांगितले. 00000 वाघ/गावंडे/दि.19-09-2016/15-13 वाजता
शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे 22 सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर           अमरावती, दि.19 (जिमाका) : शालेय शिक्षण आणि क्रीडा, उच्च व तंत्रशिक्षण, अल्पसंख्यांक व वक्फबोर्ड, मराठी भाषा व सांस्कृतीक कार्यमंत्री विनोद तावडे हे दि.22 सप्टेंबर, 16 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.           दि.22 सप्टेंबर, 16 रोजी सकाळी 9 वाजता शासकीय तंत्रनिकेतन सभागृह येथे शिक्षण क्षेत्रात उद्भवणाऱ्या समस्या व संभ्रमावस्था विषयावर मागर्दर्शन, चर्चा सत्रास उपस्थित राहतील. सकाळी 10-30 वाजता संत गाडगेबाबा विद्यापिठ अमरावती येथे व दुपारी 12 वाजता वसंत हॉल पोलिस कवायत मैदान जवळ वरील विषयावरच मागर्दर्शन, चर्चा सत्रास उपस्थित राहतील. तीन ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये शिक्षण क्षेत्रात उद्भवणाऱ्या समस्या व संभ्रमावस्था या विषयावर वैचारीक मंथन होणार आहे. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेला उपस्थित राहतील व सायं.7 वाजता अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील. 00000 वाघ/गावंडे/दि.19-09-2016/13-40 वाजता
Image
महावितरण कामकाजाचा पालकमंत्री प्रविण पोटे यांच्याकडून आढावा            अमरावती, दि.18 (जिमाका – येथील महावितरण विभागाकडून कार्यान्वित करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनांकरीता विज कनेक्शन साठी कृषि फिडरवरुन गावठाण फिडरवर शिफ्ट करण्याबाबत पालकमंत्री प्रविण पोटे पाटील यांनी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.             यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, महावितरणचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, अन्य कार्यकारी अभियंता यावेळी उपस्थित होते.             दिन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना फेज-1, एकात्मिक ऊर्जा विकास योजना, पायाभूत आराखडा आदी योजनांसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजुर करण्यात आलेल्या जमिनीची योजना व गांव निहाय माहिती यावेळी पालकमंत्र्यांना देण्यात आली. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सुचना यावेळी ना. पोटे यांनी केल्या. 00000 काचावार/सागर/दि.18-09-2016/14 वा.
कुष्ठरोग निर्मुलनाकरीता आता घरोघर सर्व्हेक्षण व प्रत्यक्ष तपासणी           अमरावती, दि.17 (जिमाका):  कुष्ठरोग हा जंतुमार्फत होणारा व हवेच्या माध्यमातुन पसरणारा सामान्य आजार असला तरी समाजामध्ये कुष्ठरोगाविषयी अंधश्रद्धा व भिती आहे. त्यामुळे कुष्ठरोग झालेली व्यक्ती आपा आजार लपविते व त्यामुळे कुष्ठरोगाचा प्रसार होण्यास मदत होते. त्यामुळे अश्या लपलेल्या कुष्टरुग्णांना दुरीकरणाचे ध्येय साध्य करण्यासाठी केंद्र शासनाने दि. 19/9/16 ते 4/10/16 या कालावधीत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिलेले आहेत.             महाराष्ट्र राज्यात अमरावतीसह 16 जिल्ह्यामध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत संपुर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये एक आशा कर्मचारी व एक पुरुष कर्मचारी/स्वयंसेवक यांची चमु दर दिवशी घरोघरी भेटी देवुन कुष्टरोगाविषयी संक्षिप्त माहिती देतील व घरातील प्रत्येक व्यक्तीची शारिरीक तपासणी करतील.             पालकमंत्री प्रवीण पोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, जि.प. उपाध्यक्षसतीश हाडोळे, महापौर चरणजीत कौर नंदा, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी
Image
शालेय विद्यार्थ्यांकरीता आधार नोंदणी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याहस्ते शुभारंभ ·         गणेशोत्सव दरम्यान अमरावती जिल्ह्यात 21234 आधार नोंदणी ·         ज्यांनी आधार नोंदणी केली नाही त्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ·         जीवनभरासाठी आधार कार्ड उपयुक्त ·         आधार नोंदणीसाठी अडवणूक करणाऱ्या ऑपरेटर्स ची मान्यता रद्द करणार           अमरावती, दि.16 (जिमाका):  शासनाच्या सुमारे 150 विविध प्रकारच्या योजना असून या योजनांचा लाभ मिळण्यासाठी तसेच शिधापत्रिका,पासपोर्ट, शाळेचा दाखला, आदी सर्वच कामासाठी सर्वच कामासाठी देशात तसेच जगभरात कोठेही जीवनभर आधार कार्ड उपयुक्त आहे. अद्यापही अमरावती जिल्ह्यात सुमारे 50 हजार विद्यार्थी आधार कार्ड नोंदणीपासून दूर आहेत. यासाठी तातडीने महानगर पालिका, जिल्हा परिषद तसेच सर्व शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी, विद्यार्थीनी, सर्वसामान्य नागरिक यांनी आधार कार्ड नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले आहे.             येथील पठाण चौकातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय विद्यार्थ्यांकरीता आयोजित आधार नोंदणी कँप चा शुभारंभ गित्ते यां