Saturday, September 10, 2016

सोलर पंपासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करा-
पालकमंत्री प्रवीण पोटे
     अमरावती, दि.06 : जिल्ह्यात सोलर पंप वीज जोडणी साठी शासनाकडुन 35 हजार रु. अनुदान दिल्या जाते व सौरऊर्जेवर चालत असल्यामुळे सोलर पंपाची उपयुक्तता तुलनेने जास्त आहे. म्हणुन शेतकऱ्यांनी सोलर पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे व याबाबतीत जनजागृती करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज महावितरण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महावितरण चे अधीक्षक अभियंता गाडीकर, कार्यकारी अभियंता मोहोड यांच्यासह सर्व जिल्ह्यातील महावितरण चे सर्व अधिकारी उपस्थित होते.
          1700 सोलर पंपांची जिल्ह्यात मान्यता मिळाली असुन फक्त 486 शेतकऱ्यांची अर्ज प्राप्त झाले आहे. सोलर पंपांना जिल्ह्यात मिळालेली मान्यता व आलेले अर्ज यामध्ये तफावत असुन त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यामध्ये आतापर्यत 12 हजार कृषि पंपाचे कनेक्शन दिले असुन कृषि पंपांच्या प्रलंबित कनेक्शनची संख्या कमी करण्यावर यश आल्याबाबत पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. यावर्षी रबी हंगामात शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत सुरु राहावा म्हणुन 200 डिपीची अतिरिक्त मागणी केली आहे व 400 डीपीची साठवण करुन ठेवली आहे. शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देणे हे शासनाचे प्राधान्य असुन अमरावती स्मार्ट सिटी साठी 130 कोटी रुपयाचा स्मार्ट ग्रिड आराखडा शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यामधुन भुमिगत वीज कनेक्शन जोडण्यासाठी भुयारी मार्गाचा वापर करण्यात येणार आहे. इन्फ्रा 2 टप्प्याच्या कामाची माहिती देखील पालकमंत्र्यांनी घेतली. स्काडा योजना राबविण्यात अमरावती विदर्भात अग्रेसर आहे.
          यावेळी अचलपुर विभागात कृषि पंपांचे वाटप करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. पथदिवे व पाणीपुरवठाचे कनेक्शन ही लवकर देण्याचे, ग्राहकांचे तक्रारी वेळेत सोडविण्याचे, नागरिकांना वेळेत सेवा देण्याचे व मुख्यालयी थांबण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
00000

वाघ/कोल्हे/दि.06-09-16/17-55 वा. 

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...