Saturday, September 3, 2016

केंद्रीय लिंबुवर्गीय फळपिक संस्था नागपुर व कृषि विद्यापीठाच्या
शास्त्रज्ञांनी केली रोगग्रस्त संत्रा बागांची पाहणी
       अमरावती, दि.22 (जिमाका): जिल्ह्यात संत्रा फळपिक मोठ्या प्रमाणात असुन सध्या संत्रा बागेतील झाडे सुकत/वाळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागपुर येथील शास्त्रज्ञांची चमू तसेच कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या चमुने वरुड व अचलपुर तालुक्यातील रोगग्रस्त संत्रा बागांना भेट दिली. त्याचबरोबर शेतकरी बांधवाना त्यांनी सुचविलेल्या उपाययोजनांवर अमल करुन आपल्या फळपिकाचे रोगराई पासून संरक्षण करण्याचे आवाहन केले.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार शास्त्रज्ञांच्या चमुने वरुड तथा अचलपुर तालुक्यातील दर्याबाद व हनवतखेडा येथे केंद्रीय लिंबुवर्गीय फळपिक संस्था नागपुर व कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी येथील संत्रा बागांना भेट दिली. याशिवाय कृषि विभागामार्फत परिसरात क्षेत्र भेट देण्यात आली. यावेळी शास्त्रज्ञांनी शेतकरी बांधवांसाठी सांगितले उपाय शेतकऱ्यांपर्यत पोहोचविण्यात आले.
यामध्ये बागेतील पावसाचे पाणी चर काढुन उताराच्या दिशेने बाहेर काढणे, बागेतील तणांचा बंदोबस्त करुन बाग तणविरहीत ठेवणे, पावसाळ्यापूर्वी तसेच पावसाळ्यानंतर झाडांच्या बुंद्याला बोर्डो पेस्ट लावणे, जी झाडे पिवळी पडलेली आहेत. त्यांची मुळे उघडी करुन त्यावर मेफानॉक्झॅमा कॉर्बेन्डाझीम पाण्यात मिसळून झाडाभोवती ड्रेंचींग करावे, झाडावर फवारणी करावी, बुरशीनाशकाच्या ड्रेंचींग नंतर 15 दिवसांनी शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळुन झाडाभोवती टाकावे असे अनेक उपाय सांगण्यात आले आहे. या उपायांचा शेतकरी बांधवानी संत्रा फळबागांमध्ये उपयोग करुन आपले पीक रोगमुक्त करावे, असे आवाहन कृषि विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
                                                                        00000

काचावार/वाघ/कोल्हे/दि.22-08-2016/16.00 वाजता

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...