Posts

Showing posts from 2018

नियोजन समितीच्या बैठकीत 2019-20 च्या प्रारूप आराखड्यास मान्यता जिल्ह्यातील सर्व क्षेत्रांना समान निधीचे वाटप - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

Image
           अमरावती, दि.   30 : जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी   सन २०१९-२०  या वर्षासाठीच्या प्रारूप आराखड्यास आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जिल्हा व जिल्हा परिषदेच्या सर्व क्षेत्रांत निधीचे समान वाटप व्हावे, या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे, असे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी यावेळी सांगितले.             जिल्हा नियोजन समितीतर्फे २०१९-२० च्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यासाठी बैठक पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, आमदार सर्वश्री वीरेंद्र जगताप, बच्चू कडू, रमेश बुंदेले, श्रीमती यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, आदिवासी प्रकल्प अधिकारी राहुल कर्डिले, महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्यासह नियोजन समितीचे विविध सदस्य व विभागप्रमुख उपस्थित होते.             सभेच्या प्रारंभी दिवंगत माजी आमदार भैय्यासाहेब ठाकूर आणि संजय बंड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांनी व्हीव्ह

महसूल क्रीडा स्पर्धेत अमरावती जिल्हा उपविजेता

Image
   अमरावती, दि. 29 :    विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत अमरावती जिल्ह्याने सर्वसाधारण उपविजेता पद पटकावले आहे. ही तीनदिवसीय स्पर्धा नुकतीच अकोला येथे झाली. विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांच्या हस्ते गुणवंतांना गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, यवतमाळचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, वाशिमचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अकोल्याचे पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, वाशिमच्या पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे आदी उपस्थित होते. स्पर्धेत सांस्कृतिक कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, निकेता जावरकर, अक्षय मंडवे व चमूने उत्कृष्ट कामगिरी बजावली. अमरावतीच्या महिला संघाने खो-खो व थ्रो बॉलमध्ये पहिला क्रमांक पटकावला. ज्योती गणोरकर, पल्लवी गोरले, रक्षा डोल्लवार, मंगला सोळंके, पूजा वाहणे, स्वाती चिंचे, लता पुंड आदी खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.    कबड्डी, फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉलमध्ये अमरावतीला दुसरा क्रमांक मिळाला. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, अपर जिल्हाधिक

प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी - विभागीय आयुक्त पीयुष सिंह

Image
अमरावती, दि. 28 :    प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी आज येथे दिले.              जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. सिंह यांनी योजनेच्या कामांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, धारणी येथील प्रकल्प अधिकारी राहूल कर्डिले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनंत भंडारी    यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.              श्री. सिंह म्हणाले की, आवास योजनेचे काम प्राधान्याने हाती घ्यावे. एकही गरजू व्यक्ती या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये. त्यासाठी सर्व परिसरात सर्वेक्षण करावे. नेमून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे.              नियोजनानुसार निधी प्राप्त असलेल्या प्रकल्पाचे बांधकाम तत्काळ सुरु करावे. त्यासाठीची प्रक्रिया खोळंबून राहता कामा नये. ही कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

ईव्हीएम व्हीव्हीपॅटबाबत नागरिकांसाठी जनजागृती प्रशिक्षण व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिकांद्वारे पारदर्शी प्रक्रियेची खातरजमा -विभागीय आयुक्त पीयुष सिंह

Image
  - मतदान केंद्रनिहाय प्रात्यक्षिकाला सुरवात -  जिल्हा प्रशासनाची विशेष मोहीम अमरावती, दि.   28 :   भारत निवडणूक आयोगा च्या   निर्देशानुसार ई व्ही एम व   व्हीव्हीपॅट बाबत   नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने ईव्हीएम व   व्हीव्हीपॅट   मशीनच्या प्रात्यक्षिकाद्वारे   विशेष मोहिम हाती घेऊन   नागरिकांमध्ये   जनजागृती   करण्यात येत आ हे.     मोहिमेदरम्यान नागरिकांनी सहभागी होऊन ईव्हीएम व   व्हीव्हीपॅटसंदर्भात शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी आज तळवेल येथे केले.             श्री. सिंह यांच्या उपस्थितीत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन प्रात्यक्षिक आज चांदूर बाजार तालुक्यातील तळवेल येथे घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, तहसीलदार राजेश चव्हाण यांच्यासह तळवेलचे अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.             प्रारंभी व्हीव्हीपॅट यंत्रांची माहिती देण्यात येऊन त्यानंतर नागरिकांकडून मतदान करण्यात आले. यावेळी प्रात्यक

भातकुलीला 2 जानेवारीला महाराजस्व अभियान नागरिकांनी अभियानाचा लाभ घ्यावा - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

Image
अमरावती, दि.   28 : प्रशासन अधिक   कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी शासनाकडून 'महाराजस्व अभियान' राबविले जात असून, सर्वसामान्यांची प्रलंबित कामे त्याद्वारे तत्काळ निकाली काढण्यात येत आहेत. भातकुलीला   2 जानेवारीला महाराजस्व अभियान होणार असून, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज केले.                अमरावती तालुक्यातील अंजनगाव बारी येथे   4 जानेवारीला महाराजस्व अभियान होणार आहे.   महा राजस्व   अभियान   हे शेतकरी व सामान्य नागरिकांचे विविध शासकीय विभागाशी संबंधित असलेले प्रश्न एकाच ठिकाणी सोडविणारे व्यासपीठ आहे, असे सांगून श्री. पोटे पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील जनतेला विविध महसूली व अन्य विभागाशी संबंधित कामांसाठी तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी वारंवार जावे लागते. ही अडचण या अभियानाच्या माध्यमातून दूर होईल.              शिबिरात विविध योजनांच्या माहितीसह नागरिकांना व विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले, प्रमाणपत्रे, जमीनीचे दस्तऐवज आदी उपलब्ध करुन दिले जातील. गावपातळीवर ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना   अभियान ाव्दारे योजनांची

रस्ता सुरक्षिततेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक वाहतूक नियम मोडल्यास मोडल्यास परवाना निलंबनाची कारवाई - अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी

Image
अमरावती, दि.   28 : वाहतूक नियमांचे पालन न करणा-या वाहनचालकांचा परवाना रद्द करण्याचे निर्देश रस्ता सुरक्षा परिषदेने दिले आहेत. त्यानुसार नियमभंग करणा-यांवर कारवाईचे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांनी आज येथे दिले.              जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी आर. टी. गीते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे एम. एच. राठोड, बी. ए. खासबागे, डॉ. व्ही. व्ही. जाधव,    वाहतूक पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, सचिंद्र शिंदे, नंदिनी चानपूरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस. एस. कपाटे आदी यावेळी उपस्थित होते. श्री. सिद्धभट्टी म्हणाले की, रस्ता सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाने काटेकोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. विहित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, लाल सिग्नल ओलांडून जाणे, क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, मालवाहू वाहनात प्रवासी वाहतूक करणे, मद्यपान, अंमली पदार्थाचे सेवन करुन वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करणे अशा नियमभंग करणा-यांविरुद्ध तीन महिने परवाना निलंबनाच

सौर कृषी वाहिनीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी -ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Image
* जिल्हाधिकाऱ्यांशी व्हीसीद्वारे संवाद अमरावती, दि. 27 : राज्याने दोन हजार मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प हाती घेतला आहे. प्रकल्‍प उभारण्‍यासाठी प्रत्येक गावाने जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी तालुक्‍याच्या पातळीवर थेट सरपंचांशी संवाद साधून सौर कृषी वाहिनीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. आज येथील विभागीय आयुक्त कार्यालयातून ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे यांनी व्हीडीओ कॉन्फरंसिंगद्वारे विभागातील पाचही जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, आमदार डॉ. अनिल बोंडे, विभागीय आयुक्त पियूष सिंह आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री सौर वाहिनीचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी ज्या प्रमाणात जागा उपलब्ध होतील, त्या प्रमाणात हस्तांतरीत करण्यात याव्यात. सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज पुरवठा करणे शक्य होईल. तसेच गावातील प्रकल्प असलेल्या पाणी पुरवठा, सार्वजनिक दिवाबत्तीसाठीही अत्यल्प किंवा मोफत वीज देता येऊ शकेल. एका ग्रामपंचायतीमध्ये

रेल्वेच्या 52 कोटींच्या कामाचे भूमिपूजन प्रभावी संपर्कयंत्रणेची निर्मिती - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

Image
       अमरावती, दि. 21 : प्रभावी संपर्कयंत्रणा, सुलभ व सुरक्षित दळणवळणासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेकविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. खासदार आनंदराव अडसूळ यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील विविध रेल्वेस्थानकांत अनेक    सुविधांची निर्मिती होत असून, या सुविधा नागरिकांसाठी उपयुक्त ठरतील, असे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे सांगितले.               रेल्वेच्या अमरावती, नया अमरावती, बडनेरा, चांदूर बाजार आदी स्थानकांचे पादचारी पूल, बडनेरा रेल्वेस्थानकावरील स्वचलित शिडी या 52 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. सुनील देशमुख, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, महापालिकेचे शिवसेना गटनेते प्रशांत वानखडे आदी यावेळी उपस्थित होते.          पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, खासदार श्री. अडसूळ यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन जिल्ह्यात नव्या रेल्वेमार्गांसह अनेक सुविधांना चालना दिली आहे.    रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनीसुद्धा श्री. अडसूळ यांच्याकडून होत अस

अनुकंपा तत्वावरील पदे 31 डिसेंबरपूर्वी भरा - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांचे निर्देश

Image
अमरावती, दि. 17 : कार्यालयांतील अनुकंपा तत्वावरील पदे तत्काळ भरुन तसा अहवाल 31 डिसेंबरपूर्वी सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी प्रशासनाला दिले.                विविध विभागांत अनुकंपा तत्वावरील रिक्त असलेल्या    पदांचा आढावा पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.              पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, अनेक कार्यालयांतील अनुकंपा पदांवरील पदे रिक्त असल्याचे दिसून येते. ही कार्यवाही वेळेत होणे आवश्यक होते. त्यामुळे पात्र असणा-या व्यक्ती वंचित राहिल्या आहेत. त्यामुळे तत्काळ ही पदे भरण्याची कार्यवाही करावी. तसा अहवाल 31 डिसेंबरपूर्वी सादर करावा. या कामात कोणतीही दिरंगाई होता कामा नये.

पालकमंत्र्यांकडून टंचाईग्रस्त गावांतील परिस्थितीचा आढावा टंचाई निवारणाची कामे प्रभावीपणे राबवा -- पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

Image
अमरावती, दि. 17 :    टंचाईग्रस्त गावांसाठी पाणीपुरवठ्यासह शासनाने जाहीर केलेल्या योजना-सवलतींची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले. मी स्वत: या गावांची पाहणी करणार आहे. नागरिकांकडून एकही तक्रार येता कामा नये. या कामात हयगय झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांतील स्थिती व पाणी नियोजन या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व विविध खात्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी यावेळी तालुकानिहाय परिस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, नागरिकांकडून टंचाईबाबत निवेदने येत आहेत. तथापि, काही ठिकाणी विहिर अधिग्रहणाची पुरेसी कार्यवाही झालेली दिसत नाही. गटविकास अधिका-यांनी ग्रामसेवकांची बैठक घ्यावी व स्वत:ही    तालुक्यातील गावांना भेट

सर्वांसाठी घरे योजना बडनेरा- अमरावतीतील अतिक्रमणधारकांना लवकरच पट्टेवाटप - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

Image
अमरावती, दि. 16 : सर्वांसाठी घरे योजनेत एकही व्यक्ती बेघर राहू नये म्हणून शासनाने अतिक्रमित भूखंड नियमानुकुल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गतीने कार्यवाही होत असून, बडनेरा, तसेच अमरावती शहरातील अतिक्रमणधारकांना पट्टेवाटपाचा कार्यक्रम पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते लवकरच होणार आहे.          सर्वांसाठी घरे या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरुन राज्यात विविध निर्णय अंमलात आणले गेले. त्याचा वंचित घटकांतील नागरिकांना लाभ होत आहे.   स्वत:ची जागा नसलेल्या किंवा अतिक्रमित जागा असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून अतिक्रमण नियमानुकुल करण्याचा निर्णय घेतला आहे. पट्टेवाटपाची कार्यवाही गतीने करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी दिली.      प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरी भागात लाभार्थ्यांची निवड स्वत:च्या मालकी हक्काची जागा व वार्षिक उत्पन्न या निकषाच्या आधारे केली जाते. त्यानुसार कृती आराखड्याची अंमलबजावणी    होते. ज्या पात्र लाभार्थ्यास स्वत:ची जागा नाही किंवा महसूल विभागाच्या जागेवर

शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘लोक संवाद’ प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी 1 जानेवारीला संवाद

Image
अमरावती ,   दि. 17 : शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ ,   त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   ‘ लोक संवाद ’   साधून जाणून घेणार आहेत. त्यासाठी या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.    1 जानेवारी 2019 रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधणार आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण) ,   उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना ,   छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ,   प्रधानमंत्री पीक विमा योजना ,   मागेल त्याला शेततळे ,   गाळमुक्त धरण , गाळयुक्त शिवार ,   स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ,   सूक्षम सिंचन आणि मृदा परीक्षण सारख्या या योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि

टंचाईग्रस्त भागात सर्वोच्च प्राधान्याने जलसंधारणाच्या उपाययोजना राबवा - जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख

Image
दुष्काळग्रस्त तालुक्यात चारा टंचाई व पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष मोठया प्रमाणावर असते.    दुष्काळग्रस्त तालुक्यात टंचाई काळात लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, यासाठी प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्याने जलसंधारणाच्या उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत  मोर्शी, वरुड तालुक्यातील पाणी टंचाई व    दुष्काळी परिस्थितीचा उपाययोजने बाबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, निवासी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे भुजलसर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक संजय कराड, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, तहसीलदार अनिरुध्द बक्षी (मोर्शी), आशिष बिजवल (वरुड), भौगोलिक माहिती प्रणालीचे अधिकारी रणजित पाटील यांचेसह मोर्शी-वरुड तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.              श्री. देशमुख म्हणाले की, टंचाईग्रसत भागात लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी जलसंपदा विभागाने जलसंधारणासाठी प्रभावी नियोजन करावे. खचलेल्या विह

पालकमंत्री पांदणरस्ता योजनेतील कामांना गती देण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

Image
अमरावती, दि. 13 : पालकमंत्री पांदणरस्ते योजनेत अपेक्षित कामांनुसार खर्चाचे नियोजन करून या कामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी आज येथे दिले.    जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जि. प. सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता प्रशांत गावंडे, मोर्शी येथील उपविभागीय अभियंता राजेंद्र मालवे, ए. के. चव्हाण, एस. एम. पाराशर, चंद्रकांत मेहेत्रे आदी उपस्थित होते. योजनेत सध्या दीड कोटी रुपयांचा निधी प्राप्त आहे. त्याचे तालुक्यांना समप्रमाणात वाटप करण्यात यावे, असे सांगून श्री. देशमुख म्हणाले की, कामांनुसार यंत्रसामग्रीचे दर तपासून तत्काळ अंदाजपत्रक सादर करावे. आर्थिक मर्यादा तपासून कामांचे नियोजन करावे. त्यानुसार लवकरच तालुका समितीच्या प्रस्तावांनुसार कामांचे निश्चितीकरण करुन कामांना सुरुवात केली जाईल, असेही ते म्हणाले. 00000