Posts

Showing posts from May, 2021
Image
शहरी बालविकास प्रकल्पांचे संनियंत्रण महापालिका, नगरपालिकेकडून होणार प्रभावी समन्वयामुळे शहरी भागातही कुपोषण निर्मूलन कार्यक्रमाची भरीव अंमलबजावणी -   महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. 29 : नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात जिल्हा परिषदेमार्फत कार्यरत असलेल्या अंगणवाडीचे मॅपिंग करण्यात आले असून त्या शहरी बालविकास प्रकल्पांशी जोडण्यात आल्या आहेत. शहरी प्रकल्पांचे प्रशासकीय संनियंत्रण नगरपालिका, महानगरपालिका यांच्याकडे देण्याचे प्रस्तावित असून, त्यामुळे इतर शासकीय विभागांशी प्रभावी समन्वय साधने शक्य होणार आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिली. शहरी भागात पंचायत राज संस्थांबरोबर समन्वयाचा अभाव असल्याने शहरी प्रकल्पाच्या पुनर्रचनेची आवश्यकता राज्यस्तरीय अभ्यासगटाने मांडली होती. त्यानुसार ग्रामीण बालविकास प्रकल्पांच्या धर्तीवर शहरी प्रकल्पांचे संनियंत्रण स्थानिक स्वराज्य संस्थांकडे देण्यात येणार आहे. यामुळे सर्व विभागांशी प्रभावी समन्वय होऊन योजनांची अंमलबजावणी गतीने होईल व स्थानिक अडचणीं

आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी आता ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’

Image
  आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी आता ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम ’ रुग्णालयांनी सहभाग नोंदवावा -जिल्हाधिकारी शैलेश नवाल                      अमरावती, दि. ३० : कोविड -१९ विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची तीव्र कमतरता जाणवत आहे. ही गरज लक्षात घेऊन रुग्णालयामध्ये उपलब्ध असणाऱ्या सुविधांचा वापर करून त्याच ठिकाणी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम ’ राबविण्यात येत आहे. विविध रुग्णालयांनी त्यात सहभागी होऊन युवकांना प्रशिक्षित करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.                    जिल्ह्यात यावर्षी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या राज्यातील युवक-युवतींना इस्पितळांकडे उपलब्ध असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून प्रामुख्याने ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याद्वारे प्रशिक्षित होणारे मनुष्यबळ आरोग्य यंत्रणेमध्ये कार्यरत होण्याकरिता त्वरित उपलब्ध

आवश्यक सुविधा, मनुष्यबळाबाबत प्रस्ताव द्यावेत - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
  जिल्हाधिका-यांकडून ग्रामीण रुग्णालयांच्या अधिक्षकांशी चर्चा ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुसज्ज करा आवश्यक सुविधा, मनुष्यबळाबाबत प्रस्ताव द्यावेत -    जिल्हाधिकारी शैलेश नवाल   अमरावती, दि. 29 : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व म्युकरमायकोसिस प्रतिबंधासाठी ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिले.उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांच्या वैद्यकीय अधिक्षकांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, कोविडसंदर्भात रुग्णांना उत्तम उपचार मिळवून देण्यासाठी उपजिल्हा रूग्णालये, ग्रामीण रूग्णालये सुसज्ज ठेवावीत. त्यासाठी लागणा-या सर्व आवश्यक साधनसामग्रीबाबत तत्काळ प्रस्ताव सादर करावेत. आवश्यक मनुष्यबळाबाबतही माहिती द्यावी. म्युकरमायकोसिसबाबत ग्रामीण भागात प्रभावी जनजागृती करावी. म्युकरमायकोसिसचे लवकर निदान होणे आवश्यक असते. त्याअनुषंगाने म्युकरमायकोसिसच
Image
  कोविडकाळात पालक गमावलेल्या बालकांच्या संगोपनासाठी आर्थिक तरतूद लवकरच योजना अंमलात येणार - महिला व बाल विकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. 28 : कोविडकाळात पालक गमावलेल्या बालकांच्या संगोपनासाठी आर्थिक तरतूद करण्याबाबत सकारात्मक चर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी करण्यात आली असून, कॅबिनेटपुढे हा विषय ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिली.   महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट घेत महिला बाल विकास विभाग करत असलेल्या कामांची माहिती दिली. कोविड काळात दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या बालकांच्या नावे ५ लाख रुपये मुदत ठेव ठेवून त्यावर येणारे व्याज त्यांना मिळत रहावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे, एक पालक गमावलेल्या बालकांना ‘बाल संगोपन’ योजनेत समाविष्ट करत दरमहा २५०० /- रुपये मदत मंजूर करावी, अशीही मागणी महिला व बालविकास मंत्र्यांनी   केली. या   मागण्यांबाबत मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शवली असून, लवकरच कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात
Image
  खरीप पीक कर्जवितरणाला गती देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश कर्जवितरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करा                        - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. 24 : येत्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज वितरणासाठी जिल्ह्यात 1 हजार 500 कोटींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ते शंभर टक्के पूर्ण व्हावे. प्रत्येक पात्र शेतकरी बांधवाला कर्ज मिळण्यासाठी वितरण प्रक्रिया सुलभ व गतिमान करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. अनावश्यक कागदपत्रे मागून शेतक-यांची अडवणूक करू नये कोरोना संकटकाळात गत वर्षभरापासून विविध क्षेत्रांपुढे अनेक समस्या उभ्या राहिल्या. शेतकरी बांधवांनाही विविध संकटांचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे सुलभ वितरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी अनावश्यक कागदपत्रे मागू नयेत. प्रशासनाने कर्जप्रकरणासाठीच्या आवश्यक कागदपत्रांबाबत सूचना दिल्या आहेत. अनावश्यक कागदपत्रे मागून शेतक-यांची अडवणूक करू नये. असा प्रकार घडल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प
Image
  पालकमंत्र्यांकडून ग्रामीण भागाची पाहणी उपचार सुविधा पुरविण्याबरोबरच नियमांचेही काटेकोर पालन होणे आवश्यक -   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर     अमरावती, दि. 25 : ग्रामीण भागात कोविडबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज अमरावती तालुक्यातील ग्रामीण भागाची पाहणी केली. ग्रामीण भागात परिपूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतानाच   सर्व दक्षता नियमांचे काटेकोर पालन होणेही आवश्यक असल्याचे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्र्यांनी आज अमरावती तालुक्यातील देवरा शहिद येथे भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष काकडे आदी यावेळी उपस्थित होते.   देवरा येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढली. त्यानुसार आरोग्य यंत्रणेकडून आवश्यक उपचार आदी कार्यवाही होत आहे. सध्या तिथे पाच ॲक्टिव्ह रूग्ण आहेत. या अनुषंगाने पुरेशा उपचार सुविधा देतानाच कंटेनमेंट झोन, होम आयसोलेशनमधील रुग्णांवर देखरेख, सातत्याने संपर्क व समन्वय या बाबी काटेकोरपणे पाळणे गरज
Image
  बालविवाह प्रतिबंधक उपाययोजनांसाठी निर्भया फंडातून निधीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करणार - महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर   मुंबई, दि.25:   बालविवाह ही ज्वलंत समस्या असून कोरोना काळात तीव्रतेने समोर आली आहे. हा स्त्री बालकांच्या संरक्षणाचा विषय आहे; त्यामुळे बालविवाह प्रतिबंधक उपाययोजनांसाठीदेखील निर्भया फंडातील रक्कम मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिली. कोरोना कालावधीमध्ये बालविवाह रोखण्यासाठी राज्याने केलेल्या विशेष कामगिरीबद्दल ऑनलाईन संवादाचे (वेबिनार) आयोजन मंत्री ऍड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेबिनारमध्ये महिला व बालविकास आयुक्त श्रीमती पवनीत कौर, सहायक आयुक्त तथा महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्थेच्या कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती मनिषा बिरारीस, महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती मंजुषा कुलकर्णी यांच्यासह बालविवाह रोखण्यासाठी चांगली कामगिरी केलेल्या जिल्ह्यांचे जिल्
Image
  गुरुकुंज मोझरी येथील कोविड केअर सेंटरची पालकमंत्र्यांकडून पाहणी आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यावर भर पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे प्रतिपादन   अमरावती, दि. 25 : ग्रामीण भागात कोरोनाबाधित वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुविधा वाढविण्यात येत आहे. जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना तत्काळ उपचार सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी गुरुकुंज मोझरी येथे 175 खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. या सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना तत्काळ उपचार सुविधा याठिकाणी उपलब्ध होणार आहे. यापुढेही रुग्णांना तत्पर वैद्यकीय उपचार सुविधा यासह आरोग्य यंत्रणा अधिक सुसज्ज करण्यावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी केले.              गुरुकुंज मोझरी स्थित श्री गुरुदेव आयुर्वेद रुग्णालय (धर्मदाय) 175 खाटांच्या कोविड केअर सेंटरची पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल व आरोग्य विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.              श्रीमती ठाकूर म्हणाल्य
Image
  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून जि. प. कोविड सेंटरला दोन कॉन्सन्ट्रेटर भेट उपचार यंत्रणेला आवश्यक साधनसामग्री मिळवून देऊ - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. २५ : कोविड प्रतिबंधासाठी उपचार यंत्रणेचा विस्तार करतानाच जिल्हा परिषदेच्या विश्राम गृह येथे कोविड केअर तथा समुपदेशन केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दोन कॉन्सन्ट्रेटर भेट दिले. हे केंद्र सुसज्ज होण्यासाठी आवश्यक ती सर्व साधनसामग्री मिळवून देऊ, असेही पालकमंत्र्यांनी आज सांगितले. येथील मालटेकडी परिसरातील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात उभारण्यात आलेल्या कोविड केअर तथा समुपदेशन केंद्राचे लोकार्पण नुकतेच पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. या केंद्रासाठी पालकमंत्र्यांनी स्वत:कडून दोन कॉन्सन्ट्रेटर भेट दिले. आमदार बळवंतराव वानखडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी यावेळी उपस्थित होते.          ग्रामीण भागात कोविडबाधितांच्या संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपचार यंत्रणेचाही विस्तार करण्यात येत आहे. साथ नियंत्
Image
  भूमी अभिलेखकडून मोजणीची प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांकडून आदेश जारी   अमरावती, दि. 24 : कोरोना साथीमुळे संचारबंदी लागू असली तरीही कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणची मोजणीची प्रलंबित कामे पूर्ण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. संचारबंदी काळात सर्व प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहेत.मोजणीची प्रलंबित काम सर्वप्रथम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भूमी अभिलेख विभागाला दिले आहेत. याबाबत जिल्हाधिका-यांनी निर्मगित केलेल्या आदेशात नमूद आहे की, मोजणीस्थळी केवळ पाच नागरिक उपस्थित राहतील. मोजणी कर्मचारी, भूधारक आदी उपस्थितांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर आदी नियमांचे पालन करावे. मोजणी अर्जदार जिल्ह्याबाहेरील किंवा राज्याबाहेरील असेल तर शासनाच्या निर्देशानुसार लागू नियम त्याच्यावर बंधनकारक असतील. क्लस्टर व कंटेनमेंट झोनमधील जागेची मोजणी करता येणार नाही. याबाबत भूमी अभिलेख उपसंचालक व भूमी अभिलेख जिल्हा अधिक्षक यांनी भूमापक व इतर मोजणी करणारे कर्मचारी यांना मोजणी प्रकरणे वाटप करावी. कुठल्याही प्रकारे हयगय किंवा गैरप्र
Image
    ‘ अमेरिकन इंडिया फौंडेशन ’ च्या सहकार्याने १०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय -    पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   सामाजिक उत्तरदायित्व निधीतून तरतूद   अमरावती, दि. 24 : कोविड-19 वरील उपचारांसाठी उपचार सुविधांत भर घालण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. याच प्रयत्नांना अमेरिकन इंडिया फौंडेशनची साथ लाभली असून, पुढील दोन महिन्यांत 100 खाटांचे स्वतंत्र रूग्णालय उभारण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिली.   जिल्ह्यात उपचार यंत्रणांचा विस्तार करताना सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून विविध संस्था-संघटनांनी पुढे येण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात आले आहे. पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्याकडून यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. त्यानुसार अमेरिकन इंडिया फौंडेशनकडून सामाजिक उत्तरदायित्व निधीतून सहकार्य मिळाले असून, रुग्णालयाचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे.               कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक उपचार सुविधा गतीने उभारण्यात येत आहेत. सुपर

जिल्‍हाधिकारी व मनपा आयुक्‍त यांनी केली कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती, इतवारा बाजार व नागपुरी गेट येथील लसिकरण केंद्राची पाहणी

Image
  जिल्‍हाधिकारी व मनपा आयुक्‍त यांनी केली कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती, इतवारा बाजार व नागपुरी गेट येथील लसिकरण केंद्राची पाहणी   जिल्हाधिकारी शैलेश नवाल व मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी संयुक्तरित्या अमरावती शहरातील कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती, इतवारा बाजार व नागपुरी गेट येथील लसिकरण केंद्राची पाहणी केली. कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीला भेट दिली असता या ठिकाणच्‍या व्‍यापा-यांना सुचित करण्‍यात आले की, त्‍यांनी दुकानदार व हातगाडी धारकास भाजीपाला व फळांची विक्री करावी. नागरिकांना या ठिकाणी भाजीपाला व फळ घेण्‍यास मनाई करण्‍यात आली आहे. या ठिकाणी गर्दी होणार नाही याची संपुर्ण जबाबदारी कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीने घ्‍यावी. प्रत्‍येक व्‍यापा-याने व येणा-या ग्राहकाने मास्‍क चा वापर करावा. सामाजिक अंतर या नियमाचे पालन करावे. सर्व व्‍यापारी वर्गांनी, दुकानदारांनी, कामगारांनी आर.पी.सी.आर. टेस्‍ट करुन घ्‍यावी.   इतवारा बाजार परिसरात पाहणी करतांना दुकानदारांना सुचित केले की, त्‍यांनी आपले साहित्‍य दुकानातच ठेवले पाहिजे. दुकानाच्‍या बाहेर कोणतेही साहित्‍य ठेवू नये. दिलेल्‍या वेळेतच दुकान उघडावे.