Posts

Showing posts from September, 2020

पालकमंत्र्यांकडून बडनेरा रेल्वे वॅगन प्रकल्पाला भेट व पाहणी

Image
पालकमंत्र्यांकडून बडनेरा रेल्वे वॅगन प्रकल्पाला भेट व पाहणी रेल्वे वॅगन निर्मिती प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावी                      -पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर अमरावती, दि. 21 : जिल्ह्यातील बडनेरा क्षेत्रात निर्माण होत असलेला रेल्वे वॅगननिर्मिती प्रकल्प हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांनाही रोजगाराची संधी निर्माण होतील. या प्रकल्प निर्मितीमुळे संपूर्ण देशात जिल्ह्याची नवी ओळख निर्माण होणार आहे. रेल्वे वॅगन निर्मिती प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावी, राज्य शासनाकडून आवश्यक सहकार्य आपणास पुरविण्यात येईल, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली. येथील बडनेरा स्थित रेल्वे वॅगन प्रकल्पाला पालकमंत्र्यांनी भेट देऊन तेथील कामांची पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रकल्पाचे अभियंता एस. सी. मोहोड यांच्यासह अन्य रेल्वे तांत्रिक अधिकारी व कर्मचारी  आदी यावेळी उपस्थित होते श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, रेल्वे वॅगन निर्मिती प्रकल्पाच्या कामा

कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी 60 खाटांची आयसीयू सुविधापालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून भेट व पाहणी

Image
कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी 60 खाटांची आयसीयू सुविधा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून भेट व पाहणी         कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना उपचार सुविधांतही भर पडणे आवश्यक आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर व त्यांचे सर्व सहकारी जीवाची बाजी लावून लढत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉक्टर मंडळींच्या मदतीने कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी साठ खाटांची आयसीयू सुविधा उपलब्ध होत आहे.         यापुढेही वैद्यकीय क्षेत्रातील  मंडळींनी शासकीय आरोग्य यंत्रणेला असेच सहकार्य करून अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी काल येथे केले.            डॉ. महेंद्र गुढे, डॉ. सत्येश शिरभाते, डॉ. ज्ञानदे यांच्यासह एकूण पाच डॉक्टरांनी उपलब्ध 140 खाटांपैकी साठ खाटा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांवर उपचारासाठी अतिरिक्त आयसीयू सुविधा निर्माण होणार आहे. हार्ट, न्यूरो, ऑर्थोपेडिक व क्रिटिकल केअर आवश्यक असलेल्या रुग्णांचे उपचार तिथे शक्य होणार आहेत.            या

क्रीडा संकुल व प्रलंबित प्रश्नांबाबत परिपूर्ण माहिती सादर करा - पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

Image
पालकमंत्र्यांकडून विभागीय क्रीडा संकुलाची पाहणी   क्रीडा संकुल व प्रलंबित प्रश्नांबाबत परिपूर्ण माहिती सादर करा  -  पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर   क्रीडा संकुलात आवश्यक सुविधा, जिल्हा क्रीडा संकुलाचे काम व इतर प्रलंबित बाबींच्या अनुषंगाने सविस्तर माहिती सादर करावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.       येथील विभागीय क्रीडा संकुलाला भेट देऊन पाहणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्यासह क्रीडा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.        पालकमंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या की, क्रीडा संकुलात आवश्यक सुधारणांच्या अनुषंगाने परिपूर्ण माहिती सादर करावी.  तालुका क्रीडा संकुले, तेथील आवश्यक कामे याचेही सादरीकरण करावे. जिल्हा क्रीडा संकुलाबाबतची कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण होणे आवश्यक आहे. यासंबंधी स्वतंत्र बैठकीचे आयोजन केले जाईल.       पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियम, शूटिंग प्रॅक्टिस सेंटर, स्क्वॅश सेंटर,

वैद्यकीय यंत्रणेसमोरील सर्व प्रश्न प्राधान्याने व तत्काळ सोडवू। - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
कोरोना उपाययोजनांच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांची डॉक्टरांशी चर्चा   वैद्यकीय यंत्रणेसमोरील सर्व प्रश्न प्राधान्याने व तत्काळ सोडवू।    -   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर         कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी आरोग्य सुविधांत सातत्याने भर टाकण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत अखंडित रूग्णसेवेसाठी डॉक्टरांकडून अमूल्य योगदान मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने यापुढेही वैद्यकीय सुविधांत भर घालण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे. उपचारांबाबत खासगी वैद्यकीय यंत्रणेपुढील सर्व प्रश्न प्राधान्याने व तत्काळ सोडविण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.        कोरोनाबाधितांवरील उपचार व आवश्यक उपाययोजनांच्या अनुषंगाने रुग्णालयचालक, तसेच डॉक्टरांची बैठक बचतभवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल रोहणकर, सचिव डॉ. आशिष साबू, डॉ. सोहेल बारी

पालकमंत्र्यांकडून सा. प्र. वि. च्या कामकाजाचा आढावा

Image
  पालकमंत्र्यांकडून सा. प्र. वि. च्या कामकाजाचा आढावा पायाभूत सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व विहित मुदतीत पूर्ण करावी -   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. 20 :   जिल्ह्यातील रस्ते, पूल व इमारतींची जिल्ह्यात सुरू असलेली कामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार व विहित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.   सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विविध कामांचा   आढावा पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी आज घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा व विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.   पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना साथीच्या संकटकाळात प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी होत असताना विकासालाही गती मिळावी या उद्देशाने पायाभूत सुविधांच्या कामांना चालना देण्यात आली आहे. त्यासाठी वेळोवेळी बैठका घेऊन कामांचा प्राधान्यक्रम ठरवून ती पूर्ण करण्याचे नियोजनाबाबत निर्देश देण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात प्रस्तावित

कोविड रुग्णांच्या उपचारासाठी 100 खाटांची अतिरिक्त सुविधा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
  कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कोविड रुग्णांच्या उपचारासाठी 100 खाटांची अतिरिक्त सुविधा -   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा कोविड रूग्णालयासाठी स्वतंत्र पर्यायी रस्ता   अमरावती, दि. 19 : कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता येथील आयटीआय परिसरातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रशिक्षण केंद्र व तसेच सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेत 100 खाटांची अतिरिक्त सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, सुरक्षिततेच्या दृष्टीने सुपर स्पेशालिटी रूग्णालयासाठी स्वतंत्र रस्त्याचीही निर्मिती होत आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले. कोरोनाबाधितांसाठी उभारण्यात येणा-या अतिरिक्त सुविधांच्या अनुषंगाने औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरातील ‘डीआरडीए’च्या प्रशिक्षण केंद्राच्या जागेची, तसेच नियोजित रस्त्याची व सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील इमारतीची पाहणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल

कामगार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते कंत्राटी वीज कामगारांना धनादेशाचे वाटप

Image
कामगार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते कंत्राटी वीज कामगारांना धनादेशाचे वाटप कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटीबध्द -          कामगार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू   अमरावती, दि. 19 : जिल्ह्यातील 'महावितरण' च्या अधिनस्त कार्यरत बाहास्त्रोत कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या व वेतन कपाती संदर्भात अनेक तक्रारी राज्यमंत्री कडू यांना प्राप्त झाल्या होत्या, त्याची गंभीर दखल घेत वेतन कपात झालेल्या 350 कंत्राटी कामगारांना 50 लाख रुपयांच्या धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरुपात कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. राज्यातील कामगारांच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे प्रतिपादन त्यांनी आज केले. येथील शासकीय विश्रामगृह येथे कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्ना संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. महावितरणचे अभियंता, कंत्राटी कामगार सह. संस्थेचे कंत्राटदार व कंत्राटी बांधव यावेळी उपस्थित होते. श्री. कडू म्हणाले की, कंत्राटी वीज कामगारांना कंत्राटदाराने नियमानुसार सुविधा न पुरविता

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम यशस्वी होईल - ॲड. यशोमती ठाकूर यांचा विश्वास

Image
अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या सक्रिय भूमिकेमुळे 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम यशस्वी होईल - ॲड. यशोमती ठाकूर यांचा विश्वास   मुंबई, दि 18 : कोरोनामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हाती घेण्यात आलेली 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सक्रीय सहभागाने यशस्वी होईल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.     महिला व बालविकास विभागाच्या अखत्यारीतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीमेतील   सहभागाबाबत आज मंत्री ॲड. ठाकूर यांनी ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, सर्व जिल्ह्यातील उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास, अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.     यावेळी ॲड. ठाकूर यांनी सांगितले की, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ही यंत्रणा राज्यातील घराघरात पोहोचलेली आहे. प्रत्येक कुटुंबाशी अंगणवाडी ताईचा संपर्क असतो. त्यामुळे तुमच्या सक्रीय सहभागाने, सहकार्याने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम प्रभावीप

दक्षतेचा अवलंब हेच कोरोनापासून मुक्तीचे शस्त्र - मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे

Image
  कुटुंब, माझी जबाबदारी दक्षते चा अवलंब हेच कोरोनापासून मुक्तीचे शस्त्र -            मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे   अमरावती, दि. 18 : मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स, हातांची नियमित स्वच्छता आदी   दक्षता नियमांचे पालन करणे हेच कोरोनापासून मुक्ती मिळविण्यासाठी शस्त्र आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षतेचे पालन करून कोरोनाचा नायनाट करण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी केले. ग्रामीण   भागातील नागरिकांची घरोघरी जाऊन कोविड रुग्‍णांचा शोध घेणे,   त्‍यांना तातडीने उपचार उपलब्‍ध करुन देऊन मृत्‍यूदर कमी करणे यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम जिल्हाभर राबविण्यात येत आहे. प्रतिबंधात्‍मक उपाययोजना,   जनजागृती,   प्रबोधन हाच परिणामकारक उपाय आहे व याव्‍दारेच आपण ग्रामीण भागातील जनतेला सुरक्षित ठेवू शकतो. यामध्‍ये लोकसहभाग आवश्‍यक आहे.   या अनुषंगाने मोहिम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहनही श्री. येडगे यांनी केले आहे.     जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम            

आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध निर्णय - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
  आदिवासी क्षेत्रात सेवारत मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध निर्णय -                   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. 18:    दुर्गम भाग, आदिवासी क्षेत्रात सेवा देणा-या मानसेवी वैद्यकीय अधिका-यांचे मानधन चोवीस हजारांहून चाळीस हजार रूपये एवढे वाढविण्यात आले आहे. या निर्णयाचा लाभ मेळघाटसह जिल्ह्यातील दुर्गम, संवेदनशील भागात आरोग्य सेवा देण्याचे काम करणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांना होणार आहे. भक्कम मनुष्यबळ, विविध अद्ययावत सुविधा याद्वारे आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी महाविकास आघाडी शासनाकडून विविध निर्णय अंमलात आणले जात आहेत, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. दुर्गम-अतिदुर्गम आदिवासी जिल्ह्यातील आदिवासी भागात 'नवसंजीवनी'    योजनेंतर्गत गरोदर माता, स्तनदा माता, तसेच शून्य ते सहा वयोगटातील बालकांना पाड्यांवर जाऊन वैद्यकीय सेवा आणि उपचार देणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन चोवीस हजारांवरुन थेट चाळीस हजार रुपये करण्याचा निर्णय शासनाने

बचत गटातील शेतकरी महिलांच्या उत्पादनांची माहिती आता ऑनलाईन

Image
  ग्रामीण महिला सक्षमीकरणासाठी ‘माविम’चे पुढचे पाऊल बचत गटातील शेतकरी महिलांच्या उत्पादनांची माहिती आता ऑनलाईन   ‘ई- बिझनेस प्लॅटफॉर्म’चे ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाले उद्घाटन   मुंबई, दि. 18: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) आता आणखी पुढचे पाऊल टाकत ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता बचत गटाच्या शेतकरी महिलांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळण्याच्या हेतूने ही सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध केली आहे. त्यासाठी निर्माण केलेल्या ‘ई-बिझनेस प्लॅटफॉर्म’ या ऑनलाईन सुविधेचे महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज ऑनलाईन उद्घाटन झाले.माविमच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती ठाकरे, महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी, युनिसेफच्या राज्यातील आहारतज्ज्ञ श्रीमती राजलक्ष्मी नायर आदी या ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले.                  मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी माविम अधिनस्त बचत गटांच्या शेतकरी महिलांनी उत्पादित केलेला शेतमालाला पारंपरिक बाजारापे