क्रीडा संकुल व प्रलंबित प्रश्नांबाबत परिपूर्ण माहिती सादर करा - पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

पालकमंत्र्यांकडून विभागीय क्रीडा संकुलाची पाहणी क्रीडा संकुल व प्रलंबित प्रश्नांबाबत परिपूर्ण माहिती सादर करा - पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

  क्रीडा संकुलात आवश्यक सुविधा, जिल्हा क्रीडा संकुलाचे काम व इतर प्रलंबित बाबींच्या अनुषंगाने सविस्तर माहिती सादर करावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

      येथील विभागीय क्रीडा संकुलाला भेट देऊन पाहणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्यासह क्रीडा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

       पालकमंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या की, क्रीडा संकुलात आवश्यक सुधारणांच्या अनुषंगाने परिपूर्ण माहिती सादर करावी.  तालुका क्रीडा संकुले, तेथील आवश्यक कामे याचेही सादरीकरण करावे. जिल्हा क्रीडा संकुलाबाबतची कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण होणे आवश्यक आहे. यासंबंधी स्वतंत्र बैठकीचे आयोजन केले जाईल.

     

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियम, शूटिंग प्रॅक्टिस सेंटर, स्क्वॅश सेंटर,  डान्स अँड फिटनेस अकॅडमी, टेबल टेनिस क्लास, ग्राऊंड स्टेडियम आदींना भेट देऊन पाहणी केली व विविध बाबींची माहिती घेतली.

       यावेळी पालकमंत्र्यांनी आर्चरी रेंजलाही भेट दिली. यावेळी त्यांनी खेळाडूंशीही संवाद साधला व त्यांना उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या.

                                               ०००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती