Posts

Showing posts from August, 2022

जिल्ह्यातील अधिकाधिक मंडळांनी सहभाग घ्यावा - जिल्हाधिकारी पवनीत कौर

Image
  उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार जिल्ह्यातील अधिकाधिक मंडळांनी सहभाग घ्यावा - जिल्हाधिकारी पवनीत कौर   अमरावती, दि. 29 : राज्य शासनाने दि. 31 ऑगस्ट 2022 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील अधिकाधिक मंडळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.                        राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास रुपये पाच लाख, द्वितीय क्रमांकास रुपये दोन लाख 50 हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये एक लाख इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकांच्या गणेशोत्सव मंडळास 25 हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 30 ऑगस्ट 2022 हा आहे.                        या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे किंवा स्थानिक पोलिस स्थानक अथवा स्थानिक स

मेळघाटात आरोग्य सुविधांबरोबरच जनजागृतीही करा -खासदार डॉ. अनिल बोंडे

Image
  मेळघाटात आरोग्य सुविधांबरोबरच जनजागृतीही करा -खासदार डॉ. अनिल बोंडे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची आढावा बैठक अमरावती, दि.29 :   क्षयरोग तसेच इतर आजारांबाबत जनजागृतीसाठी मेळघाटात सर्वदुर शिबीरांचे आयोजन करावे. क्षयरोगाची तपासणी करतांना रुग्णांकडुन घेतलेले नमुने अचूकपणे तपासता यावे यासाठी आवश्यक यंत्रांची संख्या वाढवावी. खाजगी रुग्णालयांत क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांची व त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचाराची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक करावे, अशा सुचना खासदार अनिल बोंडे यांनी यावेळी केल्या.   जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा आढावा खासदार डॉ. बोंडे यांनी घेतला. बैठकिला माजी आमदार रमेश बुंदिले, माजी महापालिका सभापती तुषार भारतीय,  जिल्हाधिकारी पवनीत कौर, महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे,  डॉ. कैलास घोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप रणमले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड, बालविकास प्रकल्प अधिकारी

धारणी उपजिल्हा रूग्णालयातील सिटी स्कॅन कक्षाचे काम लवकर पूर्ण करा - जिल्हाधिकारी पवनीत कौर

Image
  धारणी उपजिल्हा रूग्णालयातील सिटी स्कॅन कक्षाचे काम लवकर पूर्ण करा -           जिल्हाधिकारी पवनीत कौर             अमरावती, दि.25: धारणी येथील उपजिल्हा रूग्णालयातील रक्तपेढी व सिटी स्कॅन कक्षाचे काम लवकरात लवकर पुर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज दिले.                धारणी येथे नवसंजीवनी बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली, तसेच सुशीला नायर रुग्णालयालाही भेट दिली. प्रकल्प अधिकारी सावन कुमार, धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे, चिखलदऱ्याचे तहसीलदार मदन जाधव व दोन्ही तालुक्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.   श्रीमती कौर म्हणाल्या की, मेळघाटातील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करावी. उपजिल्हा रूग्णालयातील रक्तपेढी व सिटी स्कॅन कक्षात आवश्यक यंत्रणा उपलब्ध करुन घेऊन काम लवकरात लवकर पुर्ण करावे. यावेळी त्यांनी पाणीपुरवठा, रस्ते, वीज पुरवठा, आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे आदी बाबींचा आढावा घेतला.               त्यानंतर त्यांनी बिजूधावडी येथे  भेट देऊन ई- पीक पाहणी प्रात्यक्षिकात सहभागी होऊन प

क्रीडा संकुलात स्थानिक युवकांना सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण

  क्रीडा संकुलात स्थानिक युवकांना सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण   अमरावती, दि. 25:   आगामी काळात होणारी सैन्य भरती लक्षात घेऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुणांचा समावे श व्हावा यासाठी तालुका क्रीडा संकुलांमध्ये विनामुल्य प्रशिक्षण शिबीर सुरु करण्यात येत आहेत. काही तालुक्यांमध्ये शिबीरांची सुरुवात झाली असून स्थानिक युवकांचा चांगला प्रतिसाद आहे. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यांत ही शिबीरे सुरु करण्याबाबत आखणी करण्यात आली आहे. तहसीलदारांकडून तालुक्यांतील माजी सैनिकांच्या सहकार्याने    तालुका क्रीडा संकुलांमध्ये काही तालुक्यांत शिबीरांना सुरुवात झाली. सैन्य भरतीत जिल्ह्याच्या टक्का वाढविण्यासाठी, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नागपूर येथे सप्टेंबर अखेरीस व ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर सैन्य भरती होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर    चांदूर रेल्वे, वरुड, तिवसा, अंजनगाव सूर्जी आदी तालुक्यात शिबीरांना सुरूवात करण्यात येत आहे. चांदुर रेल्वे येथे शिबीरांला सुरूवात झाली असून 30 हून अधिक युवकांनी  प्रशिक्षणात सहभाग घे

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त येत्या सोमवारी विविध कार्यक्रम

  राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त येत्या सोमवारी विविध कार्यक्रम अमरावती, दि.25: जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करून स्व. मेजर ध्यानचंद यांनी हॉकीमध्ये केलेल्या कामगिरीचा गौरव म्हणून  त्यांचा जन्मदिवस, 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्त  विभागीय व जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे विविध कार्यक्रम होणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा कार्यालय, अमरावती विभाग तसेच जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी, एकविध खेळाच्या संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन ‘ ­­सर्व समावेशक आणि तंदुरूस्त समाजासाठी सक्षम’ म्हणून या संकल्पनेवर साजरा करण्यात येत आहे. या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमाचे उद्घाटन अमरावती विभागीय क्रीडा संकुल येथे दि.29 ऑगस्ट  रोजी सकाळी आठ वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येईल. ऑनलाईन प्रश्न मंजुषेचे तसेच आशु तो डो आखाडाचे समन्वयक संघरक्षक बडगे, डिस्ट्रीक कराटे असोशिएशनच्या  संयोजक सोनल रंगारी प्रश्नमंजुषेसाठी  काम करणार आहेत. सर्व स

‘आकांक्षा कौशल्यातून जीवनोन्नतीकडे’ उपक्रमासाठी 463 उमेदवारांच्या मुलाखती

Image
  ‘आकांक्षा कौशल्यातून जीवनोन्नतीकडे’ उपक्रमासाठी 463 उमेदवारांच्या मुलाखती जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती अमरावती, दि. 24 : ‘आकांक्षा कौशल्यातून जीवनोन्नतीकडे’    या योजनेच्या लाभार्थी निवडीसाठी मुलाखतीचा टप्पा व पालकांशी संवाद सत्र    जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या उपस्थितीत डॉ.    पंजाबराव देशमुख प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनीत आज झाले. चाळणी परीक्षेत पात्र ठरलेल्या 463 उमेदवारांच्या जिल्हानिहाय मुलाखती घेण्यात आल्या. योजनेसाठी एकूण 6 हजार 405 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यानंतर बीजगणित, इंग्रजी आदी विषयांची प्राथमिक चाळणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेतून पात्र ठरलेल्या 463 उमेदवाराचे जिल्हानिहाय मुलाखती घेण्यात आल्या. सहायक आयुक्त कौशल्य विकास प्रफुल्ल शेळके, सहाय्यक प्राध्यापक    पंकज शिरभाते, कौशल्य विकास अधिकारी वैशाली पवार, नव गुरुकुल फाउंडेशन फॉर सोशल वेल्फेअरचे नितेश शर्मा हे उपस्थित होते. ‘आकांक्षा कौशल्यातून जीवनोन्नतीकडे’    हा अत्यंत उपयुक्त कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आहे. महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हा उपक्रम सुरु क

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांकरिता योजना स्टँडअप इंडिया मार्जीन मनी योजनेत दहा लाभार्थी निवडणार

  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांकरिता योजना स्टँडअप इंडिया मार्जीन मनी योजनेत दहा लाभार्थी निवडणार           अमरावती, दि.24:   केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता  ‘मार्जीन मनी’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. गतवर्षी त्यात पाच व्यक्तींना लाभ मिळाला आहे.चालू वर्षात दहा प्रस्ताव मंजूरीचे उद्दिष्ट आहे. नवउद्योजकांची मार्जीन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे उद्योजक लाभार्थ्यांना एकूण उद्योग प्रकल्पाच्या 25 टक्के स्वहिस्‌स्यातील जास्तीत जास्त 15 टक्के निधी शासनाकडून घेण्यात येतो. प्रकल्प किंमतीच्या 75 टक्के निधी बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या कर्जाद्वारे उभा करावयाचा आहे. लाभार्थ्याला स्वहिस्‌स्यातील केवळ 10 टक्के निधी भरावयाचा आहे. उर्वरित 15 टक्के निधी ‘मार्जीन मनी’ म्हणून शासनाव्दारे उपलब्ध करून दिला जातो.             सदर शासन निर्णय शासनाच्या  www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. तरी इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी या विकासात्मक योजनेचा लाभ घेण्यासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल

चिखलदरा तालुक्यातील 15 गावांत नवीन रास्त भाव दुकाने संस्थांनी अर्ज करण्याचे पुरवठा अधिका-यांचे आवाहन

  चिखलदरा तालुक्यातील 15 गावांत नवीन रास्त   भाव दुका ने संस्थांनी अर्ज करण्याचे पुरवठा अधिका-यांचे आवाहन   अमरावती ,   दि.   24 : चिखलदरा तालुक्यातील 15 गावांमध्ये नवीन रास्त भाव दुकाने सुरू करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.   नवीन रास्त भाव दुकानांसाठी इच्छूक संस्था व गटांनी   9 सप्टेंबर पूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखेडे यांनी केले आहे.         नवीन दुकानांची क्षेत्रे   चिखलदरा तालुक्यातील टेटू, मेमना, लवादा, पांढराखडक, मोझरी, रामटेक, बागलिंगा, कुलंगणा बु., चौऱ्यामल, लाखेवाडा, भांडुम, सलिता, सुमिता, खुटिदा, कुही या 15 गावांतील रास्त   भाव दुकानां साठी   अर्ज मागविण्यात आले आहेत. निवडीचा प्राथम्यक्रम नवीन रास्तभाव दुकानांसाठी संस्थेची निवड करताना ग्रामपंचायत किंवा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था ,   नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट ,   नोंदणीकृत सहकारी संस्था,   सार्वजनिक संस्था किंवा न्यास यांना अर्ज करता येईल व याच प्राथम्यक्रमाने अर्जाचा विचार होईल. वैयक्तिक अर्जाचा विचार केला जाणार नाही.    अर्जाची प्रक्रिया इच्छूक   संस्था, गटांना   विहि

धार्मिक अल्पसंख्याकबहुल शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत

Image
  धार्मिक अल्पसंख्याकबहुल शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत   अमरावती, दि. 24 : धार्मिक अल्पसंख्याकबहुल शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांना पायाभूत सुविधांसाठी २ लाख रूपये अनुदान दिले जाते. त्यासाठी संस्थांनी अर्ज करण्यासाठी मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. अधिकाधिक संस्थांनी या यांजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.                  धार्मिक अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खासगी, अनुदानित व विना अनुदानित किंवा कायम विना अनुदानित, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी २ लाख रूपये अनुदान दिले जाते.     मुस्लिम, बौद्ध, जैन, शीख, पारशी व ज्यू आदी अल्पसंख्याक समाजाचे किमान ७० टक्के विद्यार्थी शाळेत शिकत असणे आवश्यक आहे. शासन मान्यताप्राप्त अपंगांच्या शाळांमध्ये किमान ५० टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. इच्छूक संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवनातील नियोजन शाखेत 31 ऑगस्टपूर्वी अर्ज

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा

Image
  जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा अमरावती, दि.23: जिल्ह्यातील अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार घडलेला गुन्हा आणि त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आज आढावा घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील अजाअजप्रका   कायद्यातंर्गत जुलै महिन्यात झालेल्या गुन्ह्यासंबंधात आढावा घेण्यात आला. त्यामध्ये जुलै महिन्यात शहरी विभागात एकूण 6 तर ग्रामीण भागात एकूण 8 अशा एकूण 14 गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पोलीस   तपासावर असलेले गुन्हे, हायकोर्ट   स्थगिती गुन्हे, अपिल प्रलंबित गुन्हे, अर्थसहाय्यासाठी प्रलंबित गुन्हे याबाबत आढावा घेण्यात आला. अर्थसहाय्यासाठी प्रलंबित प्रकरणात निधी प्राप्त होताच, तात्काळ अर्थसहाय वाटप करण्यासाठी निर्देश देण्यात आले. बैठकीमध्ये समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार,   पोलिस निरीक्षक अर्जून ठोसरे, उप पोलिस अधीक्षक प्रदीप सूर्यवंशी, पोल

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खाते आधारकार्डशी संलग्न करा - जिल्हाधिकारी पवनीत कौर

Image
  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खाते आधारकार्डशी संलग्न करा -      जिल्हाधिकारी पवनीत कौर             अमरावती, दि.23: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतंर्गत नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांना ई- केवासी व एनपीसीएल सिडेड बँक खात्यासोबत आधारकार्ड संलग्न करण्यासाठी आता दि.31 ऑगस्ट 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बॅंक खात्यासोबत आधारकार्ड संलग्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर  यांनी केले आहे.             पी.एम. किसान योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना ई- केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ज्या लाभार्थ्यांनी ई- केवायसी व एनपीसीएल सिडेड बँक खाते सोबत आधार संलग्न केले नाही, त्यांना पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार नसल्याबाबत कळविण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणीकृत लाभार्थ्यांची बँक खाते आधारकार्डशी संलग्न झाल्यानंतर एप्रिल 2022 नंतर जमा होणारे सर्व ह

पीक विमा कंपनीकडुन तालुका समन्वयक नियुक्त

  पीक विमा कंपनीकडुन तालुका समन्वयक नियुक्त   अमरावती दि.22 (विमाका)  :   जिल्ह्यात सन 2022-23 करिता पीक विम्यासाठी भारतीय कृषि इन्शुरंस कंपनीची निवड झालेली आहे. शेतकरी बांधवांना संपर्क साधण्यासाठी तालुका समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत.  नितीन मधूकर सावळे यांची जिल्हा समन्ययक पदी नियुक्ती झाली असुन त्यांचे कार्यालय काँग्रेस नगर रस्त्यावरील राणा कॉम्प्लेक्स मध्ये आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 9403265135 हा आहे. तालुका कार्यालये व संपर्क क्रमांक अचलपूर येथील कार्यालय नगर परिषद मार्केट, सेट्रल बॅक ऑफ इडिया च्या मागे, आठवडीबाजार परतवाडा, ता. अचलपूर येथे असुन तालुका समन्वयक मनीष ज्ञानेश्वर मोरे  (मो. क्र. 7709171603) हे आहेत. अंजनगांव सुर्जी येथील कार्यालय श्रीराम संकुल मार्केट, अकोट जुना बस स्टॅड अंजनगाव सुर्जी ता. अजनंगाव सुर्जी  येथे असुन तालुका समन्वयक संकेत ज्ञानेश्वरराव वाडाल,(मो. नं.7020945972) हे आहेत. भातकुलीचे कार्यालय बुध्द कॉम्पलेक्स, दर्यापूर रोड ता. भातकुली, येथे असुन तालुका समन्वयक, नितेश मनोहराव तायडे (मो. नं.9075460919) हे आहेत. चांदूर रेल्वेचे कार्यालय संताबाई यादव रोड नवी