Posts

Showing posts from April, 2022

विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठीचा उपक्रम प्रशंसनीय - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
  संत ज्ञानेश्वर सभागृहात राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शनाचा शुभारंभ विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठीचा उपक्रम प्रशंसनीय - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर          अमरावती, दि. 01 :   राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात राबविलेल्या विविध कल्याणकारी योजना आणि विकास कामांची माहिती नागरिकांना व्हावी, या दृष्टीने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सचित्र प्रदर्शनाचा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.             संत ज्ञानेश्वर सभागृह येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे शासनाच्या लोककल्याणकारी योजना व विकास कामांची माहिती देणाऱ्या छायाचित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.             आमदार सुलभाताई खोडके, माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर, विभागीय माहिती कार्यालयाचे प्र. उपसंचालक हर्षवर्धन पवार, श्री शिवाजी शारिरिक शिक्षण

विकासकामांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे आजपासून आयोजन संत ज्ञानेश्वर सभागृहात उद्घाटन

Image
विकासकामांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे आजपासून आयोजन संत ज्ञानेश्वर सभागृहात उद्घाटन   अमरावती, दि.30 : राज्य शासनाने गेल्या दोन वर्षांत राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि   विकासकामांची माहिती देणाऱ्या सचित्र प्रदर्शनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या   अमरावती विभागस्तरीय    प्रदर्शनाचे उद्या दि.1 मे रोजी   संत ज्ञानेश्वर सभागृह येथे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकुर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. संत ज्ञानेश्वर सभागृहात सकाळी नऊला होणाऱ्या या कार्यक्रमास आमदार सुलभाताई खोडके, राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, पोलीस आयुक्त आरती सिंह, महानगरपालिका आयुक्त प्रविण आष्टीकर तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.              'दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची' या मोहिमेअंतर्गत शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती चित्रमय प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहता येईल. हे प्रदर्

रस्ते निर्मिती व बळकटिकरणामुळे ग्रामीण भागात विकासाला चालना - पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर

Image
  रस्ते निर्मिती व बळकटिकरणामुळे ग्रामीण भागात वि कासाला चालना - पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण भागात 75 कोटींच्या रस्ते निर्मिती व रस्ते सुधारणा कामाचे पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन             अमरावती, दि.30:    दळणवळणाच्या दृष्टीने ग्रामीण भागात रस्त्यांची निर्मिती व सुधारणा अत्यावश्यक आहे. रस्त्यांच्या निर्मिती व बळकटीकरणामुळे ग्रामीण भागात विकासाला चालना मिळेल. नागरिकांसाठी रस्ते निर्मिती व इतर पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही जिल्हयाच्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी आज दिली.           आज चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण भागात विविध योजनेअंतर्गत प्राप्त 75 कोटी रुपयांच्या निधीतून रस्ते निर्मिती व सुधारणांच्या कामांचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, अर्थसंकल्पातर्गत प्राप्त 75 कोटी रुपयांच्या निधीतून ही कामे करण्यात येणार असल

मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे 15 जूनपर्यंत पूर्ण करा - रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरे

Image
  मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे 15 जूनपर्यंत पूर्ण करा -            रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरे   * मातोश्री पाणंद रस्ते तसेच रोजगार हमी योजनेची विभागीय आढावा बैठक  * प्रत्येक पंचायत समितीला मातोश्री भवन बांधणार   अमरावती दि.   26 :   शेतमाल बाजारात पोहविण्यासाठी तसेच यंत्र सामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता आहे. यासाठी मातोश्री पाणंद रस्त्यांच्या कामाला गती देऊन मंजूर पाणंद रस्ते 15 जूनपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश रोजगार हमी योजना तसेच फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे यांनी आज येथे दिला. नियोजन भवन येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे तसेच मातोश्री पाणंद रस्ता योजना अंमलबजावणीबाबत अमरावती विभागाची आढावा बैठक रोजगार हमी योजना मंत्री श्री. भूमरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार, विभागीय आयुक्त पियुष सिंह, नरेगा आयुक्त शांतनु गोयल,  अमरावती जिल्हाधिकारी पवनीत कौर, अकोला जिल्हाधिकरी निमा अरोरा, यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे, बुलडाणा जिल्हाधिकारी एस. र

नवचेतना शालेय विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवा - राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

Image
  नवचेतना शालेय विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवा -   राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू अचलपूर,चांदुर बाजार तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 14 शाळांमध्ये राबविणार                   अमरावती दि 21: ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा व दर्जेदार शिक्षण देता यावे. विद्यार्थ्यांचे सर्व विषयांवर प्रभुत्व निर्माण होण्यासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नवचेतना शालेय विकास कार्यक्रमाचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले. टोपे नगर येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.      यावेळी जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक)अनिल कोल्हे, (प्राथमिक) गंगाधर मोहने, विस्तार अधिकारी(शिक्षण) प्रवीण खांडेकर, चांदुर बाजार पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शुभांगी श्रीराव, अचलपूरचे गट शिक्षणाधिकारी अब्दुल कलीम, अमरावती येथील जिल्हा व शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता पवन मानकर, दीपक चांदूरे, अकोला येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण   संस्थेच्या अधिव्य

जलसंपदा राजमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून कर्जमाफी योजनेचा आढावा विविध विभागाच्या आढावा बैठकीत दिले निर्देश

Image
  जलसंपदा राजमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून कर्जमाफी योजनेचा आढावा विविध विभागाच्या आढावा बैठकीत दिले निर्देश        अमरावती दि 21: विभागातील जिल्हा मध्यवर्ती बँकांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पोर्टलवर माहिती सादर केली होती त्या खात्यांपैकी पूर्ण कर्ज माफीची खाती, एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत येणारी खाती व नियमित कर्जदारांची खाती असणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांनी सहायक निबंधक कार्यालयात अर्ज सादर करावा. याबाबत बँकेने अर्जदारांशी संपर्क साधून परत अर्ज करण्याबाबत सूचना कराव्या.असे निर्देश जलसंपदा व   लाभक्षेत्र मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना व कर्ज पुनर्गठन योजनेबाबत आढावा राज्यमंत्र्यांकडून घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.      सहकारी संस्थेचे   विभागीय सहनिबंधक राजेश लव्हेकर, अकोला येथील सहकारी संस्थेचे उपनिबंधक विनायक काहळेकर, सहायक निबंधक (प्रशासन) मधुसूदन लाठी, यवतमाळ व वाशीम जिल्हयाचे उपनिबंधक रमेश कटके, बुलडाणाचे जिल्हा उपनिबंधक घोंगे, बुलडाणा सहकारी बँकेचे अ

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे गुुरुवारी आरोग्य मेळावा

  जिल्हा सामान्य रुग्णालय येथे गुुरुवारी आरोग्य मेळावा   अमरावती दि.   20 :  केंद्रिय स्वास्थ व कुटुंब कल्याण, मंत्रालय, भारत सरकार, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य विद्यमाने, आजादी का अमृत महोत्सव व आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र यांचा 4 था वर्धापन दिनानिमित्त आणि आयुष्यमान भारत डिजीटल मिशन अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे गुरुवार, दिनांक 21 एप्रिलला आरोग्य मेळावा आयोजित करण्यात येत आहे. नियोजनानुसार सदर शिबिरामध्ये डिजीटल हेल्थ आयडी काढणे, आयुष्यमान कार्ड वाटप, तपासणी, उपचार, टेलीकम्युनिकेशन, स्त्रीरोग, प्रसुती, स्तनपान, लसिकरण, बालरोग, कुटुंब कल्याण कार्यक्रम समुपदेशन, गर्भनिरोधक साधनांचा वापर बाबत समुपदेशन, मलेरिया, क्षयरोग, कुष्ठरोग, मोतीबिंदू, संसर्गजन्य आजार, असंसर्गजन्य आजार जसे उच्च रक्तदाब, मधुमेहाचे लवकर निदान, एच.आय.व्ही समुपदेशन, कॅन्सर, हृदयरोग, अस्थमा, दंत, कान, नाक, घसा, प्लास्टीक सर्जरी, त्वचा व त्वचाविज्ञान, आवश्यक रक्त चाचण्या, ई.सी.जी., एक्स-रे, आयुर्वेदिक, युनानी, सिदध, होमेओपॅथी, इतर तपासण्या व औषधांसह मूलभूत आरोग्य सेवा आणि संबंधित आरोग्य