Posts

Showing posts from September, 2018
Image
सूर्यगंगा नदीवरील पुलाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन               रस्ते व पायाभूत सुविधांतून विकासाला चालना                                                -   पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील अमरावती, दि. 30 : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री   नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्राला रस्तेविकासासाठी मोठा निधी मिळाला असून अनेक कामे सुरू झाली आहेत. भरभक्कम पायाभूत सुविधांतून विकासाला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे,     असे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे सांगितले.   तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार या गावाजवळून वाहणाऱ्या सूर्यगंगा नदीवरील उंच पुलाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार यशोमती ठाकूर,भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, निवेदिता दिधडे चौधरी,   केंद्र शासनाच्या गंगा पुनर्जीवन प्रकल्पाचे सल्लागार सुधीर दिवे,    केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे स्वीय सचिव मनोज वाडेकर, सा. बां.     विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक साळवी आदी उपस्थित होते.   शेंदुरजना येथे 11 कोटी 41 लाख रु

‘आपले शासन, आपल्या योजना’चे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

Image
          अमरावती, दि. 29 : जिल्हा माहिती कार्यालयातर्फे शासनाच्या विविध योजनांची माहिती असलेल्या ‘आपले शासन, आपल्या योजना’ या घडिपुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्याहस्ते आज येथे झाले.           नगरसेवक सचिन रासने, राजेश साहू, राधाताई कुरील, राजू कुरील, डॉ.प्रणय कुलकर्णी, पालकमंत्र्यांचे स्वीय सचिव अनिल भटकर, राजेश बोबडे व जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार उपस्थित होते.           पुस्तिकेत प्रधानमंत्री आवास योजना, मातृवंदना योजना, सुरक्षित मातृत्व अभियान, कृषी स्वावलंबन योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री जनधन योजना यासह अनेक महत्वाच्या लोकोपयोगी योजनांची उपयुक्त माहिती समाविष्ट आहे. जिल्हाभरात त्याचे वितरण करण्यात येईल, असे श्री. पवार यावेळी म्हणाले. 00000

आय.ई.टी.ई. च्या राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन संशोधनाची परंपरा उन्नत करणारा उपक्रम - केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर

Image
          अमरावती, दि. 29 : ज्ञान व संशोधनाची मोठी परंपरा भारतभूमीला लाभली आहे. ही परंपरा आय.ई.टी.ई. परिषदेसारख्या उपक्रमांतून उन्नत होईल, असे  केंद्रिय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज येथे सांगितले.   आय.ई.टी.ई. च्या (द इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स) 61 व्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन केंद्रिय गृहराज्यमंत्री श्री. अहिर यांच्याहस्ते येथील प्रा.राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनीही हा महत्वाचा कार्यक्रम अमरावतीत होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करुन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.  संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रेड्डी, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, उपाध्यक्ष प्रा. हेमंत देशमुख, कोषाध्यक्ष पंकज देशमुख, युवराजसिंग चौधरी, नितीन हिवसे, अॅड. उदय देशमुख, गजानन काळे, रागिणीताई देशमुख, डॉ. चौधरी, डॉ. हुडा, डॉ. प्रशांत इंगोले, डॉ. अमोल बोडखे, डॉ. एम. एस. अली आदी उपस्थित होते. या परिषदेत चांद्रयान मोहिमेसह अनेक महत्वाच्या प्रकल्पातील संशोधक सह
Image
पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात सुमारे पावणेसातशे निवेदने दाखल नागरिकांच्या मागण्यांवर तत्काळ कार्यवाही व्हावी                                        -पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील        अमरावती, दि. 29 :  स्वच्छतेचा प्रश्न नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असून, त्याबाबत काटेकोर कामे झाली पाहिजेत. शहरातील एकही परिसर अस्वच्छ राहता कामा नये. जनता दरबारात नागरिकांनी दिलेल्या निवेदनांवर तत्काळ कार्यवाही व्हावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले.             शहरात साथ आजारांच्या पार्श्वभूमीवर महापालिका यंत्रणा व विविध विभागांची बैठक पालकमंत्र्यांनी नुकतीच घेतली होती. त्यानंतर पालकमंत्र्यांनी दिवसभर शहरात स्वच्छता कामांची पाहणी करून कार्यवाहीबाबत निर्देश दिले होते आणि आपल्या परिसरातील तक्रारी जनता दरबारातून दाखल करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. जनता दरबारात लेखी निवेदनांद्वारे सुमारे 400, तर दूरध्वनीद्वारे 272 निवेदने दाखल झाली. आज सकाळपासूनच पालकमंत्र्यांच्या इर्विन चौक स्थित जनसंपर्क कार्यालयात नागरिकांनी मोठी

शिर्डी श्री साईबाबा विश्वस्त संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच कोटींचा धनादेश

Image
मुंबई ,  दि.  28  : शिर्डी येथील श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आज पाच कोटींचा धनादेश संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृह येथे सुपुर्द केला. यावेळी जलसंधारण मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे ,  सामान्य प्रशासन राज्य मंत्री मदन येरावार ,  मुख्य सचिव दिनेशकुमार जैन ,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी ,  संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते. 0 0 0

स्टार्टअप इडिंया - महाराष्ट्र यात्रेचा 3 ऑक्टोबर रोजी शुभारंभ उपक्रमादरम्यान 10 जिल्ह्यात शिबीर तर 23 शहरांमध्ये स्टार्टअप व्हॅन थांबणार

Image
नवी दिल्ली , 27  :  नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप इंडिया - महाराष्ट्र यात्रेचा शुभारंभ 3 ऑक्टोबर रोजी  राजभवन, मुंबई येथून  होणार आहे. यातंर्गत 10 जिल्ह्यांमध्ये शिबीर आयोजित करण्यात येतील तर 23 शहरांमध्ये  स्टार्टअप व्हॅन थांबणार आहे.             महाराष्ट्राचे राज्यपाल चे.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभु आणि महाराष्ट्राचे कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी निलंगेकर- पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्टार्टअप इंडिया  -  महाराष्ट्र यात्रेचा शुभारंभ  होणार आहे. स्टार्टअप इंडिया  -  महाराष्ट्र यात्रेचे आयोजन केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभाग, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग तसेच महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य इनोवेटिव्ह सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. स्टार्टअप इंडियाच्या पुढाकाराने देशातील छोटया जिल्ह्यांमधील नवउद्योजक प्रतिभेला शोधने हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. नवउद्योजकांना तसेच उद्योग क्षेत्रात भविष्य करू इच्छिणा-यांना आवश्यक मार्गदर्शन, सुविधा प्रदान करून दे