Posts

Showing posts from November, 2021

बचत गटाच्या माध्यमातून महिलांमध्ये वित्तीय साक्षरता - पालकमंत्री ॲङ यशोमती ठाकूर

Image
  बचत गटाच्या माध्यमातून महिलांमध्ये वित्तीय साक्षरता - पालकमंत्री ॲङ यशोमती ठाकूर     'महाबॅंके'कडून जिल्ह्यातील 582 महिला बचत गटांना 8 कोटी 13 लक्ष रुपयांचे कर्ज वाटप  जिल्ह्यात लवकरच गोट बँक कार्यान्वित होणार   अमरावती, दि. 30: बचत गटांमुळे महिला सक्षम बनत असून त्यांच्यामध्ये वित्तीय साक्षरताही वाढत आहे. महिलांना बचत गटांसाठी सुलभ कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रचा पुढाकार प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री ॲङ यशोमती ठाकूर यांनी आज काढले.    संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे बँक ऑफ महाराष्ट्र व महिला आर्थिक वितरण महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांना उद्योग निर्मितीसाठी कर्ज वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी श्रीमती ठाकूर बोलत होत्या.               महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, प्रकल्प संचालक प्रिती देशमुख, बँक ऑफ महाराष्ट्र अमरावती झोनचे अंचल प्रबंधक राहूल वाघमारे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जितेंद्रकुमार झा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.     महिला बचत गटांना स्वयंपूर्ण बनवून त्यांना सहज भांडवल उपलब्ध व्हावे यास

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्यासमाधीस्थळाला राज्यपालांचे अभिवादन

Image
                                 राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळाला राज्यपालांचे अभिवादन   गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ व प्रार्थना मंदिराला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट   अमरावती, दि. 24 :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे शांतीस्थान महासमाधीला आज भेट दिली. यावेळी महासमाधीवर त्यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच येथील प्रार्थना मंदिरालाही भेट दिली. समाधीस्थळावरील शांतता व पावित्र्य मनाला संमोहित करणारे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनी ही भूमी पावन झालेली आहे. राष्ट्रसंतांच्या विचारांची ज्योत प्रत्येकाने आपल्या मनात तेवत ठेवावी. हीच खरी त्यांना मानवंदना ठरेल, असे श्री कोश्यारी यावेळी म्हणाले.          महापौर चेतन गावंडे, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव जनार्दन बोधे, श्रीमती निवेदिता चौधरी, अध्यात्म विभाग प्रमुख डॉ राजाराम बोधे तसेच जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, तहसिलदार वै

महिला सक्षमीकरणासाठी समाजात नव उद्योजिका निर्माण होणे गरजेचे - जिल्हाधिकारी पवनीत कौर

Image
  -       महिला सक्षमीकरणासाठी समाजात नव उद्योजिका निर्माण होणे गरजेचे - जिल्हाधिकारी पवनीत कौर   * दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्रात महिला वसतिगृहाचे उद्घाटन तसेच महिला उद्योजक कार्यशाळा संपन्न   अमरावती, दि. 22 : आज सर्वच क्षेत्रात महिलांनी स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. महिला उद्योजक म्हणूनही जिल्ह्यातील अनेक महिलांना राष्ट्रीय पातळीवर सन्मानित करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील अन्य महिलांनाही प्रोत्साहन देऊन नव उद्योजिका निर्माण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले. दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्रातील महिला वसतिगृहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महिला उद्योजक कार्यशाळाही घेण्यात आली. दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. के.ए. धापके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, जिजामाता कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित प्रगतीशील शेतकरी पुर्निमा सवाई, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जिल्हा अभिया

आरोग्य पथकांद्वारे मेळघाटात पाड्यापाड्यांवर पोहोचून लसीकरण

Image
    आरोग्य पथकांद्वारे मेळघाटात पाड्यापाड्यांवर पोहोचून लसीकरण अमरावती, दि. 22 : जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने वेग घेतला आहे. आरोग्य पथके जिल्ह्यात सर्वदूर, तसेच मेळघाटातील पाड्यापाड्यांवर पोहोचून पात्र व्यक्तींचे लसीकरण करत आहेत. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून ठिकठिकाणी पोहोचून शिबिरांची पाहणी करण्यात येत आहे. जिल्हाधिका-यांनी आज नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील रांजणा येथे लसीकरण शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन केले.               विविध योजना, उपक्रमांची सांगड लसीकरणाशी घालून मोहिम व्यापक करण्यात आली आहे. या आठवड्यात लसीकरण मोठ्या प्रमाणावर पार पडण्याची चिन्हे आहेत. अंजनगाव बारी, रांजणा, खिराळा, कु-हा, गणोरी, खडिमल, वलगाव, शिराळा, चंद्रपूर, येवदा, रामतीर्थ, आमला, रेहट्याखेडा अशा अनेक ठिकाणी शिबिरांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. निरनिराळी कार्यालये, संस्था आदींनाही मोहिमेत सहभागी करून घेतले जात आहे. अंजनगाव सुर्जी बाजार समितीतील सभेला व्यापारी, अडते, हमाल आदींनी हजेरी लावली.   मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यात आरोग्य पथके पाड्यापाड्यांवर पोहोचून लसीकरण कार्यक्रम राबवत आहे

लसीकरणाचा वेग वाढला; उद्दिष्ट गाठण्यासाठी आणखी प्रयत्नांची गरज - जिल्हाधिकारी पवनीत कौर

Image
  प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय परिपूर्ण नियोजनाच्या सूचना लसीकरणाचा वेग वाढला ; उद्दिष्ट गाठण्यासाठी आणखी प्रयत्नांची गरज - जिल्हाधिकारी पवनीत कौर   अमरावती , दि. २० : जिल्ह्यात आरोग्य व विविध विभाग , अनेक पथकांच्या समन्वयाने लसीकरणाचा वेग वाढला आहे. तथापि , उद्दिष्टपूर्तीसाठी आणखी थोड्या प्रयत्नांची गरज आहे. सर्वांनी एकजुटीने व पुढील आठवड्याचे परिपूर्ण नियोजन करून लसीकरण वाढवावे , असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले. लसीकरण वाढविण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली असून , त्यासाठी सर्व विभागांसह विविध क्षेत्रातील संस्था , संघटना , मान्यवर यांचेही योगदान मिळत आहे. सर्वांचे प्रयत्न व योगदान कौतुकास्पद असून , यापुढे अधिक व्यापक व नियोजनबद्ध प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले. दरम्यान , सर्व तालुका आरोग्य अधिकारी , वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांना लसीकरणाबाबत सुस्पष्ट सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तालुक्याचे आताच्या उद्दिष्टापेक्षा 25 टक्क्यांनी जास्त   उद्दिष्ट ठेवण्यात यावे व त्यानुसार टीम चे नियोजन करण्यात यावे. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे

लसीकरण वाहन थेट आपल्या दारी नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

Image
लसीकरण वाहन थेट आपल्या दारी नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद     अमरावती , दि.२० : कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे .लसीकरण मोहिमेंतर्गत आता लसीकरण वाहन थेट नागरिकांच्या दारी जात असून मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात येत आहे .या उपक्रमाला नागरिकांचाही उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे .     जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या आदेशान्वये तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्हा आरोग्य कार्यालयातून वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास लसीकरण वाहन मिळाले. जिल्हा परिषद सदस्य गजानन राठोड यांच्या हस्ते या लसीकरण वाहनाचे काल (दिनांक १९ नोव्हेंबर )उद्घाटन करण्यात आले .   लसीकरण वाहनाच्या सहाय्याने वलगाव येथील वसुपुरा , निर्मळ हॉस्पिटल लढ्ढा गल्ली तसेच सौदागरपुरा येथील ५५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे .लसीकरण चमूमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश पाटील , समुदाय अधिकारी डॉ. प्रिती चव्हाण , आरोग्य सेविका राधिका पखाले , आरोग्य सहायक श्री. नवाथे   उपस्थित होते. आजही या भागा

बैंक ऑफ महाराष्ट्र व महिला आर्थिक विकास महामंडल (माविम) स्थापित लोकसंचालित साधन केंद्र दरम्यान महिला स्वयं सहाय्य बचत गटांना कर्ज पुरवठा करण्याकरिता सामंजस्य करार

Image
    बैंक ऑफ महाराष्ट्र व महिला आर्थिक विकास महामंडल (माविम) स्थापित लोकसंचालित साधन केंद्र दरम्यान महिला स्वयं सहाय्य बचत गटांना कर्ज पुरवठा करण्याकरिता सामंजस्य करार               माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी देशाच्या सार्वजनिक बैंकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बैंक असलेली बैंक ऑफ महाराष्ट्र व महिला आर्थिक विकास महामंडल (माविम) स्थापित 13 लोकसंचालित साधन केंद्र (CMRC) यांच्या दरम्यान महिला स्वयं सहाय्य बचत गट (SHG) व संयुक्त दायित्व गट (JLG) यांना कर्जपुरवठा करण्याकारिता आर्थिक सामंजस्य करार मा. ना. अॅड. यशोमतीताई ठाकुर, मंत्री, महिला व बालविकास, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, अमरावती जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे करण्यात आला.             महिला सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध असलेल्या महाराष्ट्र शासनाची शिखर संस्था महिला आर्थिक विकास महामंडल (माविम) यांनी अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुक्यात लोक संचालित साधन केंद्र स्थापित केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र बचत गटातील महिलांना स्वावलंबी बनविण्याकरीता सदैव प्रयत्नशील असते. त्यामुलेच ब

जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न यापुढे कायम एकोपा व शांतता राखण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

Image
  संचारबंदीत सवलत जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न यापुढे कायम एकोपा व शांतता राखण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर अमरावती, दि. १९ : अमरावती शहरात संचारबंदीत शिथिलता आली असून, जनजीवन पूर्वपदावर येत आहे. स्थैर्य व शांतता विकासाला बळ देतात. परिस्थितीत तणाव निर्माण झाला की विकासाला खीळ बसते व सर्वांचेच नुकसान होते. त्यामुळे यापुढे कधीही एकोपा व शांतता भंग होऊ नये, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज केले. अमरावती शहरात कायदे व सुव्यवस्था राखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अमरावती शहरातील नागरिकांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन काही वेळेसाठी संचारबंदीत शिथिलता देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तू, कृषी सेवा केंद्र, विद्यार्थी, बँका यांना काही वेळेसाठी सवलत देण्यात आली होती. पुढे विविध परीक्षा सुरू होणार असून, विद्यार्थ्यांना सोयीसाठी, तसेच नागरिकांना आवश्यक जीवनावश्यक वस्तूंसाठी सवलत देणे आवश्यक होते. त्यानुसार पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी संचारबंदीत सू

अचलपुरात रात्रीची संचारबंदी

  अचलपुरात रात्रीची संचारबंदी अमरावती, दि. १६ : अचलपूर, परतवाडा शहर, तसेच ग्रामपंचायत कांडली व देवमाळी परिसरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसा आदेश उपविभागीय दंडाधिकारी संदीपकुमार अपार यांनी जारी केला. त्यानुसार मंगळवार, दि. १६ नोव्हेंबरपासून रोज रात्री १० ते सकाळी ७ या वेळेत पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू राहील. संचारबंदी कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्रित गोळा होऊ नये, कोणत्याही प्रकारच्या अफवा, जातीय तणाव, धार्मिक भावना भडकवणारे व्हिडीओ, फोटो प्रसारित करू नये. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जातील असे बॅनर, पोस्टर लावू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.   

ग्रामीण भागात कलम ३७ नुसार प्रतिबंधक आदेश लागू

  ग्रामीण भागात कलम ३७ नुसार प्रतिबंधक आदेश लागू अमरावती, दि. १६ : अमरावती शहरातील अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालय क्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधक आदेश लागू करण्यात येत आहे. हा आदेश १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ३ डिसेंबरपर्यंत लागू राहील. अप्पर जिल्हा दंडाधिकारी आशिष बिजवल यांनी हा आदेश जारी केला. त्यानुसार शस्त्र, तसेच तलवार, चाकू, लाठी व जिवित हानी होऊ शकणारे शस्त्र बाळगणे, विस्फोटके व तत्सम कच्च्या मालाची वाहतूक, दगड, विटा आदी क्षेपणास्त्राचा वापर करणे (गोळा करणे), जमाव एकत्रीकरण, पुतळ्याचे प्रदर्शन करण्यास, जाहीररीत्या ओरडणे, गाणे संगीत वाजवणे, बिभत्स चाळे करणे, अंगविक्षेप करणे, चित्रविचित्र हालचाली, तसेच कोणत्याही मेळाव्यास, मिरवणुकीस कोणत्याही ठिकाणी आयोजित करण्यास सार्वजनिक सुरक्षिततेसाठी धोका होण्याची शक्यता लक्षात घेऊन बंदी घालण्यात आली आहे. शासकीय, निमशासकीय कर्मचारी, लग्न, नाटक, तमाशे, धार्मिक शासकीय कार्यक्रम, आठवडी बाजार यां

बंधुभाव आणि कायद्याचा सन्मान राखा - जिल्हाधिकारी पवनीत कौर

Image
  बंधुभाव आणि कायद्याचा सन्मान राखा -     जिल्हाधिकारी पवनीत कौर   अमरावती, दि. 15 : कायदा हातात न घेता बंधूभाव ठेवून शांतता प्रस्थापित करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सलोख्यासाठी अनेक नागरिक योगदान देत आहेत. यापुढेही असाच बंधुभाव कायम राखण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी परतवाड्यात केले.       जिल्हाधिकारी     पवनीत कौर यांच्या उपस्थितीत परतवाडा पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली, पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, उपविभागीय राजस्व अधिकारी संदीपकुमार अपार, ठाणेदार संतोष टाले, नायब तहसीलदार अक्षय मांडवे, माजी नगराध्यक्ष रफिक सेठ, रुपेश ढेपे,सल्लुभाई आदी उपस्थित होते.                जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, कुठलीही अनुचित घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने सजग असणे आवश्यक आहे. यापूर्वीच्या काही घटनांबाबत समाजमाध्यमांद्वारे प्रसृत होणारे संदेश विश्वासार्ह नसतात. अनेकवेळा असे संदेश समाजकंटकांकडून द्वेष वाढविण्यासाठी प्रसारित केले जातात. त्यामुळे जागरूक राहून बंधुभाव कायम ठेवावा.     त्या पुढे म्हणाल्या की, समाजात अनेक चांगल्या गोष्टीही घडत असतात. मात्र,

जून 2022 पर्यंत सिंचन प्रकल्प व पाणी पुरवठा योजनेची कामे पुर्ण करावी - पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

Image
  जून 2022 पर्यंत सिंचन प्रकल्प व पाणी पुरवठा योजनेची कामे पुर्ण करावी                                                                                                             पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर                   अमरावती, दि.   15   :   येत्या जून 2022 पर्यंत सिंचन प्रकल्पाची कामे व पाणी पूरवठा योजनेअंतर्गत सर्व कामे नियोजनबद्धरित्या व गतीने पूर्ण करावी. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जास्तीत पाणी वापर योजनांचा समावेश करावा. प्रत्येक घरी नळ जोडणी करुन सर्वाना पुरेसे पाणी उपलब्ध होईल अशा दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.                आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पाणी आरक्षणबाबत योजनांच्या आढावा घेण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अधिक्षक अभियंता रश्मी देशमुख, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता        सु.पा.आडे, उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अ.अं.सावंत, महाराष्ट्र जीवन प्रधिकरण व सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.                पालकमंत्री म्हणाल्या, पाणी वापर संस्था सक्षम होणे गरजेचे आहे. पाण

पालकमंत्र्यांची व्यापारी बांधवांशी चर्चा सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
  पालकमंत्र्यांची व्यापारी बांधवांशी चर्चा सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न -          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. 15 : अमरावती शहरात शांतता निर्माण झाली असून, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 2 ते 4 वाजेदरम्यान खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न पोलीस व प्रशासनाकडून सातत्याने होत असून, लवकरच सर्व व्यवहार सुरळीत होतील, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केला. शहरातील स्थितीच्या अनुषंगाने चेंबर ऑफ अमरावती महानगर मर्चंटस् अँड इंडस्ट्रीज संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, संघटनेचे अध्यक्ष सुरेश जैन, सचिव घनश्याम राठी, अतुल कळमकर, गौरीशंकर हेडा, मगनभाई बांठिया, राजेंद्र भन्साली, अनिल खरपे, बकुल कक्कड, ओमप्रकाश चांडक, संतोष बल्दुआ, संजय चोपडा, मोरंदमल ब