Posts

Showing posts from January, 2020

राहुटी उपक्रमाला मोठा प्रतिसाद

Image
गो रगरीबांना दिलासा देणारा उपक्रम       -           जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू अमरावती, दि. 31 : नागरिकांच्या विविध समस्यांचे एकाच ठिकाणी निराकरण राहुटीच्या माध्यमातून होत आहे.  राहुटी हा गोर गरिबांना दिलासा देणारा उपक्रम असल्याचे प्रतिपादन जलसंपदा, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज केले. चांदूर बाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी येथे आज राहुटी उपक्रमांतर्गत विविध योजनांच्या अनेक लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले.  या अर्जांवर तात्काळ कार्यवाही होऊन सर्व नागरिकांना लवकरच प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांचे वाटप ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून होणार आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार उमेश खोडके यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सर्वसामान्य जनतेचे काम एकाच ठिकाणी गतीने होण्यासाठी ग्रामीण स्तरावर राहुटी हा उपक्रम राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. आज उपक्रमाचा दुसरा दिवस होता.    ब्राम्हणवाडा थडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात र

जिल्हाधिकारी कार्यालयात हुतात्म्यांना आदरांजली

Image
                 देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हुतात्मा दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनीटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.       यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अमरावती येथे विभागीय कार्यालयांसाठी स्वतंत्र इमारती - उपमुख्यमंत्री अजित पवार

Image
*पोलिसांच्या वाहनासाठी तरतूद *निकषानुसार वार्षिक नियोजनचा निधी *उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याच्या सूचना अमरावती, दि. 28 : अमरावती येथे विभागीय प्रशासकीय कार्यालय, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, विशेष पोलिस महानिरीक्षक आदी कार्यालये जुन्याच इमारतीमध्ये आहेत. या कार्यालयांच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतील येत्या वर्षांच्या प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी येथील नियोजन भवनात बैठक घेण्यात आली. यावेळी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, बुलडाण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, अकोलाचे पालकमंत्री बच्चू कडू, खासदार नवनीत राणा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पियूष सिंह आदी उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले, अमरावतीसह अकोला, बुलडाणा येथील शासकीय कार्यालये जुन्या इमारतींमध्ये आहेत. अमरावती येथील विभागी

सौर ऊर्जा प्रकल्पातून संस्थेची प्रतिवर्ष 50 लाखांची बचत

Image
डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ                            पापळ येथे कृषी महाविद्यालयाबाबत पाठपुरावा करणार                                                                    - महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर अमरावती, दि. 27 : भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथे कृषी महाविद्यालयाचा प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात 430 केडब्ल्यूपी क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. शालेय शिक्षण, जलसंपदा, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, सचिव शेषराव खाडे, दिलीप इंगोले, हेमंत काळमेघ, केशवराव गावंडे अशोक घुसे, प्रमोद देशमुख व संस्थेचे आजीवन सदस्य उपस्थित होते.      

पालकमंत्र्यांकडून महापालिकेत विविध कामांचा आढावा

Image
अपंग, महिला व बालकांसाठीच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवा                                                                   -पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर महानगरपालिकेच्या नवीन इमारतीसाठी शासन स्तरावर प्रस्ताव मांडणार अमरावती, दि. 27 : प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये तेथील अपंग, महिला व बालकांसाठी निधी असतो. त्या निधीचा वापर वेळेत करून त्यांना लाभ दिला पाहिजे. जिल्ह्यातील अपंग, महिला व बालकांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्राधान्याने खर्च करण्यात यावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. पालकमंत्र्यांनी आज महापालिकेच्या शहरातील विविध विकासकामांचा आढावा पालिकेच्या सभागृहात     बैठकीत घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. महापौर चेतन गावंडे, उपमहापौर सुमन साहू, मनपा आयुक्त संजय निपाणे यांच्यासह अनेक नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, अपंग व्यक्ती कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राप्त होणाऱ्या निधीतून अपंग कल्याणकारी योजना

जिल्ह्यात शिवभोजन योजनेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Image
अमरावती, दि. 26 : जिल्ह्यातील शिवभोजन योजनेचा शुभारंभ पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी उपाहारगृह येथे झाला. बाजार समितीसह अमरावती बसस्थानक येथील एस. टी. उपाहारगृह, डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरियल हॉस्पिटल येथेही शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ झाला. विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक दहिकर, संचालक प्रफुल्ल राऊत, प्रकाश कोकाट े, प्रवीण बिचकुले, उमेश गोरडे, मिलिंद तायडे, प्रवीण भुगुल, सचिव दीपक विजयकर, धीरज कोकाटे, राजेंद्रकुमार भटकर आदी यावेळी उपस्थित होते. योजनेचे उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्र्यांनी पहिली थाळी लाभार्थ्याला दिली. वरण, भात, चपात्या, भाजी आदी विविध पदार्थांचा समावेश असलेल्या या थाळीचा आस्वाद आज अनेक लाभार्थ्यांनी घेतला. पालकमंत्र्यांनी यावेळी उपाहारगृहाची पाहणी केली व लाभार्थ्यांशी संवादही साधला. शिवभोजन थाळी या महत्वाकांक्षी योजनेचा आजपासून संपूर्ण राज्यात प्रायोगिक तत्वावर पहिल्या टप्यात 50 ठिकाणी प्रारंभ होत आहे. राज्यातील गरीब व गरजू व्यक्तींना अल्प दरात म्हणजे केवळ

पालकमंत्र्यांच्या हस्ते वैदर्भी मार्टचा शुभारंभ

Image
अमरावती, दि. 26 : उमेद अर्थात राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘वैदर्भी मार्ट’ हे स्वतंत्र दालन सुरू करण्यात आले असून, त्याचा शुभारंभ राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाला. विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांच्यासह गटांचे प्रतिनिधी, अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.   खादी ग्रामोद्योग कार्यालयांतर्गत कस्तुरबा खादी समितीसह विविध 35 स्वयंसहायता समूहांची उत्पादने या दालनात उपलब्ध असतील. कपडे, खाद्यपदार्थ, शोभिवंत वस्तू आदी विविध उत्पादनांचा त्यात समावेश आहे. या उपक्रमामुळे स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांचे विपणन मजबूत व्हायला मदत होईल, तसेच अधिक रोजगारनिर्मितीसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. स्वयंसहायता गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासह उत्पादनांच्या गुणवत्तावाढीसाठीही उपक्रमाद्वारे मार्गदर्शन केले जात

राज्यघटनेतील मूल्यांशी बांधीलकी मानून शासनाची वाटचाल - पालकमंत्री यशोमती ठाकूर

Image
प्रजासत्ताकदिनाच्या मुख्य सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण           अमरावती, दि. 26 : राज्यघटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता व एकात्मता या मूल्यांशी बांधीलकी मानून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी शासनाने किमान समान कार्यक्रम निश्चित केला आहे. त्याद्वारे समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजना राबवून त्यांचा विकास साधण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले. भारतीय प्रजासत्ताकाच्या 70 व्या वर्धापनदिनानिमित्त पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात त्या बोलत होत्या. विभागीय आयुक्त पीयुष सिंह, पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविसकर, पोलीस अधिक्षक हरी बालाजी, महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.               प्रारंभी पालकमंत्र्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी व लोकशाही गणराज्य

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

Image
अमरावती, दि. 26 : प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते आज सकाळी झाले.सोहळ्यात प्रारंभी ध्वजवंदन व राष्ट्रगीत झाले.    जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला.   अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी अजय लहाने, स्नेहल कनिचे, शरद पाटील, मनीष गायकवाड, राम लंके, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा सूचना अधिकारी अरुण रणवीर,अधीक्षक गजेंद्र मालठाणे,    विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, पालकमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अरविंद माळवे, नायब तहसीलदार श्याम देशमुख यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   00000

अधिक विकासकामांसाठी भरीव निधी मिळण्यासाठी सर्वंकष प्रयत्न - पालकमंत्री यशोमती ठाकूर

Image
नियोजन समितीची बैठक                          ·          विविध नाविन्यपूर्ण कामांचा अंतर्भाव अमरावती, दि. 25 : ग्रामीण व शहरी भागातील विकासकामांसह विविध नाविन्यपूर्ण कामांचा अंतर्भाव जिल्हा नियोजनात करण्यात येईल. अधिकाधिक   विकासकामे व्हावीत यासाठी निधी वाढवून मिळण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करू. प्रशासनानेही गतिमान होत कामे राबवावीत, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले. जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली येथील नियोजनभवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, महापौर चेतन गावंडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, आमदार रवी राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार देवेंद्र भुयार, आमदार बळवंत वानखडे, आमदार प्रताप अडसड, आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त संजय निपाने आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजनेत सन 2020-21 साठी 219 कोटी 18 लाख रूपये नियतव्यय असून, अधिक विकासकामे व अपेक्